पृथ्वीवर तर आली पण प्रकृतीचे काय? सुनीता विल्यम्सची प्रकृती चिंताजनक, फोटो आले समोर (फोटो सौजन्य: एक्स अकाउंट/@marylynnjuszcza)
वॉशिंग्टन: भारतीय वंशांच्या अमेरिकन अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि त्यांचे सहकारी बुच विल्मोर तसेच क्र-9 चे दोन सदस्य 19 मार्च रोजी पृथ्वीवर सुखरुप परतले आहेत. त्यांना परत आणण्यात नासा आणि एलॉन मस्क यांच्या स्पेसएक्सला मोठे यश मिळाले आहे. खरं तरं 5 जून रोजी सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर आठ दिवसांच्या मोहीमेवर आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर गेले होते. मात्र, बोईंगच्या तांत्रिक अडचणीमुळे त्यांचा हा 8 दिवसांचा प्रवास 9 महिन्यांच्या लांबणीवर पडला. दरम्यान अंतराळात जास्त काळा राहिल्याने त्यांच्या प्रकृतीवर गंभीर परिणाम होण्याची शक्यता आहे. यामुळे त्या परतल्यावर त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली होती. सध्या त्या आनंदी आणि निरोगी आहेत.
मात्र याच दरम्यान नासाने शेअर केलेल्या सुनीता विल्यम्स यांच्या फोटोवरुन काही तज्ज्ञांनी त्यांच्या प्रकृती विषयी गंभीर चिंता व्यक्त केली आहे. नासाने शेअर केलेल्या फोटोमध्ये सुनीता विल्यम्स आनंदी दिसत आहे. परंतु त्यांच्या शरीरात कमकुवतपणा दिसून येत आहे. नासा दोन्ही अंतराळवीरांच्या आरोग्यावर लक्ष ठेवून आहे. दीर्घकाळ अंतराळात राहिल्याने वजन कमी होणे, स्नायूंमध्ये कमकुवतपण जाणवणे आणि हाडे ठिसुळ होणे यांरख्या गंभीर समस्या उद्भुवू शकतात. दीर्घकाळ अंतराळात राहिल्यानंतर पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणशी जुळवून घेण्यास अंतराळवीरांना काही काळा लागतो. यामुळे त्यांच्या प्रकृतीकडे नासा लक्ष ठेवून आहे.
Doctors raise concerns about Sunita Williams as photo of NASA astronaut emerges https://t.co/8dmxVFMQ9U
Shared via the Google App
— marylynnjuszczak (@marylynnjuszcza) March 21, 2025
अंतराळात जास्त काळ राहिल्यामुळे मानसिक आरोग्यावरही गंभीर परिणाम होण्याची शक्यता असते. अंतराळ आणि पृथ्वीवरील वातावरण अतिशय वेगळे आहे. या वातावरणात शरीराचा समतोल राखणे अतिशय कठीण होते. यामुळे झोपेच्या गुणवत्तेत बदल होतो. दीर्घकाळ झोप न आल्यामुळे शरीरावर नकारात्मक परिणाम होतात. अंतराळ मोहिमांमुळे अंतराळवीरांच्या विचार करण्याची क्षमता, प्रतिक्रिया वेळ आणि मानसिक आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता असते.
दरम्यान सुनीता विल्यम्स यांच्या आरोग्यावर काही तज्ज्ञांनी चिंता व्यक्त केली असून त्यांच्या पांढऱ्या केसांवर आणि चेहऱ्यावरील सुरुकुत्यांवर लक्ष दिले आहे. काही तज्ञांचे मत आहे की, शारीरिक आणि मानसिक बदलांमुळे सुनीता विलियम्सच्या शरीरावर अंतराळ यात्रा आणि त्यासंबंधित ताणांचे परिणाम दिसून येत आहेत.
या 9 महिन्यांदरम्यान सुनीता विल्यम्स आणि बुच यांनी अनेक महत्त्वपूर्ण प्रकल्पांवर कार्य केले. यामध्ये अंतराळस्थानकाची देखभाल करणे, स्पेसवॉकचा विक्रम, नवीन रिएक्टर आणि अंतराळात पाणाच्या पुनर्वापराचा शोध आणि बायोन्यूट्रिएंट्स प्रकल्पावर दोन्ही अंतराळवीरांना महत्त्वपूर्ण कामगिरी केली आहे.