Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bihar Assembly Election Result |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘400 किमीची रेंज, लक्ष्य होईल नष्ट…’ भारताचा इस्रायलसोबत ‘LORA’ क्षेपणास्त्राचा करार; पाकिस्तान चिंतेत

India–Israel LORA deal : भारत सरकार लवकरच इस्रायलसोबत LORA (Long Range Artillery) क्षेपणास्त्र प्रणाली खरेदीसंदर्भात महत्त्वपूर्ण करार करू शकते, असा दावा एका आंतरराष्ट्रीय संरक्षण अहवालात करण्यात आला आहे.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Jul 07, 2025 | 10:02 AM
India-Israel LORA deal Pakistan's worries rise major boost to Indian Air Force strength

India-Israel LORA deal Pakistan's worries rise major boost to Indian Air Force strength

Follow Us
Close
Follow Us:

India–Israel LORA deal : भारत आणि इस्रायल यांच्यातील संरक्षण सहकार्याला आणखी एक नवे परिमाण मिळण्याची शक्यता आहे. भारत सरकार लवकरच इस्रायलसोबत LORA (Long Range Artillery) क्षेपणास्त्र प्रणाली खरेदीसंदर्भात महत्त्वपूर्ण करार करू शकते, असा दावा एका आंतरराष्ट्रीय संरक्षण अहवालात करण्यात आला आहे. या करारामुळे भारतीय हवाई दलाची दीर्घ पल्ल्याच्या लक्ष्यांवर अचूक आणि जलद हल्ला करण्याची क्षमता लक्षणीय वाढणार आहे, ज्यामुळे पाकिस्तानसारख्या शत्रूराष्ट्रांची झोप उडाली आहे.

LORA क्षेपणास्त्र म्हणजे काय?

LORA हे Israel Aerospace Industries (IAI) या आघाडीच्या संरक्षण कंपनीने विकसित केलेले प्रगत बॅलिस्टिक क्षेपणास्त्र आहे. यामध्ये 400 किलोमीटरची मारक क्षमता आहे आणि ते हवेतून, जमीनवरून किंवा समुद्रातून डागता येते. या क्षेपणास्त्रात GPS आधारित मार्गदर्शन प्रणाली, अँटी-जॅमिंग तंत्रज्ञान, आणि दुर्गम भागात लक्ष्य भेदण्यासाठी सुसज्ज वॉरहेड देण्यात आले आहे. त्यामुळे कोणतेही लक्ष्य अत्यंत अचूकतेने आणि वेगाने उद्ध्वस्त करण्याची क्षमता यामध्ये आहे.

भारतीय हवाई दलाला मिळणार घातक अस्त्र

अहवालानुसार, भारत हे LORA क्षेपणास्त्र ‘Air-Launched’ स्वरूपात आपल्या हवाई दलात समाविष्ट करण्याचा विचार करत आहे. या क्षेपणास्त्रामुळे भारताच्या ‘डिप स्ट्राइक’ क्षमतेत मोठा वाढ होणार असून, कोणत्याही आकस्मिक किंवा नियोजित युद्ध परिस्थितीत शत्रूच्या संरचना, रडार केंद्रे, आणि कमांड पोस्ट लक्ष्य करण्याची क्षमता अधिक मजबूत होईल. LORA चा सामावेश केल्यास, भारताच्या लष्करी धोरणात ‘सर्जिकल स्ट्राइक’ आणि ‘प्रोऍक्टिव्ह रेस्पॉन्स’ यांसारख्या संकल्पनांना अधिक ताकद मिळणार आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : ‘त्याचे भारतावर प्रेम… ! हाफिज सईदच्या प्रत्यार्पणावरून पाकिस्तानात वादळ; भुट्टोंच्या विधानावर पेटलं राजकारण

‘ऑपरेशन सिंदूर’चा संदर्भ आणि पाकिस्तानची चिंता

अहवालात असेही नमूद करण्यात आले आहे की ‘ऑपरेशन सिंदूर’ दरम्यान पाकिस्तानने भारतातील अनेक शहरांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु भारतीय लष्कर आणि हवाई दलाने त्या सर्व हल्ल्यांना यशस्वीपणे परतवले. त्या पार्श्वभूमीवर भारत आता आपल्या हवाई क्षमतेमध्ये अधिक सुधारणा करत आहे. LORA क्षेपणास्त्राच्या खरेदीमुळे पाकिस्तानला थेट धोका वाटू लागला आहे. 400 किमीच्या रेंजमुळे पाकिस्तानातील अनेक महत्त्वाच्या लष्करी आणि औद्योगिक ठिकाणे आता भारतीय क्षेपणास्त्रांच्या टप्प्यात येणार आहेत.

इस्रायलसोबतची सामरिक भागीदारी आणखी मजबूत

भारत आणि इस्रायल यांच्यातील सैन्य सहकार्य दिवसेंदिवस बळकट होत आहे. याआधीही इस्रायलकडून भारताने हेरगिरी उपकरणे, अडव्हान्स ड्रोन्स, आणि क्षेपणास्त्र संरक्षण प्रणाली खरेदी केली आहे. LORA क्षेपणास्त्र करार ही त्या संबंधांचीच पुढची पायरी मानली जात आहे. इस्रायलचे LORA क्षेपणास्त्र अनेक आंतरराष्ट्रीय चाचण्यांमध्ये यशस्वी ठरले आहे, आणि त्याच्या अचूकतेमुळे हे प्रणाली जगातील सर्वोत्कृष्ट बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांपैकी एक मानली जाते.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Elon Musk America Party : नवा पक्ष, नवा वाद! अमेरिकन राजकारणात ‘एलोन मस्क विरुद्ध डोनाल्ड ट्रम्प’ महासंग्राम

भारताची हवाई ताकद नव्या उंचीवर

LORA सारख्या प्रगत क्षेपणास्त्र प्रणालीचा भारतीय हवाई दलात समावेश झाल्यास, भारताची सामरिक क्षमता ‘हिट फर्स्ट, हिट हार्ड’ या धोरणानुसार अधिक सक्षम होईल. पाकिस्तान किंवा इतर कोणत्याही शत्रूराष्ट्राने भारताच्या सीमेलगत कारवाया करण्याआधी आता अनेक वेळा विचार करावा लागेल. या निर्णयामुळे भारत ‘स्मार्ट आणि स्वावलंबी संरक्षण व्यवस्था’ घडविण्याकडे आणखी एक महत्त्वाचे पाऊल टाकत आहे, जे भविष्यातील युद्धांमध्ये निर्णायक ठरू शकते.

Web Title: India israel lora deal pakistans worries rise major boost to indian air force strength

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 07, 2025 | 10:02 AM

Topics:  

  • india
  • Israel
  • Nuclear missiles
  • World news

संबंधित बातम्या

Trump-Mamdani : ममदानींच्या विजयाने ट्रम्प दबावात? न्यूयॉर्क मेयरशी भेटची इच्छा केली व्यक्त
1

Trump-Mamdani : ममदानींच्या विजयाने ट्रम्प दबावात? न्यूयॉर्क मेयरशी भेटची इच्छा केली व्यक्त

Shaikh Hasina ICT News: ‘बांगलादेशातील शांतता आणि लोकशाहीसाठी…’; शेख हसीना यांच्या शिक्षेवर भारताची पहिलीच प्रतिक्रिया
2

Shaikh Hasina ICT News: ‘बांगलादेशातील शांतता आणि लोकशाहीसाठी…’; शेख हसीना यांच्या शिक्षेवर भारताची पहिलीच प्रतिक्रिया

“डॉक्टर शरीराला RDX बांधून स्वतःला उडवत आहेत, देश असुरक्षितेच्या हातात…, मेहबूबा मुफ्तींचा केंद्र सरकारवर हल्लाबोल
3

“डॉक्टर शरीराला RDX बांधून स्वतःला उडवत आहेत, देश असुरक्षितेच्या हातात…, मेहबूबा मुफ्तींचा केंद्र सरकारवर हल्लाबोल

NTPC Nuclear Project: एनटीपीसीची मोठी झेप! देशभर नवीन १,६०० मेगावॅटपर्यंतचे अणुऊर्जा प्रकल्प मंजुरीच्या मार्गावर
4

NTPC Nuclear Project: एनटीपीसीची मोठी झेप! देशभर नवीन १,६०० मेगावॅटपर्यंतचे अणुऊर्जा प्रकल्प मंजुरीच्या मार्गावर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.