Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pahalgam Terror Attack: भारताकडून हवाई क्षेत्र बंद तर पाकिस्तानकडून जॅमर आणि चिनी ‘ड्रॅगन’ क्षेपणास्त्रांची तैनाती

Pakistan Installed Jammers: दोन्ही देशांनी एकमेकांच्या हवाई क्षेत्रासाठी बंदी घालण्याचा निर्णय घेतला असून, आता पाकिस्तानकडून आणखी आक्रमक हालचाली करण्यात येत आहेत.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: May 01, 2025 | 11:03 AM
India-Pak tensions spike Pak deploys jammers Dragon missiles India shuts airspace

India-Pak tensions spike Pak deploys jammers Dragon missiles India shuts airspace

Follow Us
Close
Follow Us:

Pakistan Installed Jammers : पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारत आणि पाकिस्तानमधील तणाव अधिकच गडद झाला आहे. दोन्ही देशांनी एकमेकांच्या हवाई क्षेत्रासाठी बंदी घालण्याचा निर्णय घेतला असून, आता पाकिस्तानकडून आणखी आक्रमक हालचाली करण्यात येत आहेत. भारताकडून हवाई हल्ल्याची शक्यता गृहित धरून, पाकिस्तानने आपल्या हवाई क्षेत्रात जॅमर तंत्रज्ञान बसवले असून, चिनी बनावटीची ‘ड्रॅगन’ हवाई संरक्षण क्षेपणास्त्र प्रणालीही तैनात केली आहे.

हवाई क्षेत्र बंद, परस्परविरोधी निर्णय

सुरुवातीला पाकिस्तानने भारतीय विमानांसाठी आपले हवाई क्षेत्र बंद केले होते. या प्रत्युत्तरात भारतानेही पाकिस्तानच्या मालकीच्या व संचालनाखालील सर्व विमानांसाठी ३० एप्रिल ते २३ मे २०२५ पर्यंत आपले हवाई क्षेत्र बंद करण्याची अधिकृत घोषणा केली. या निर्णयासंदर्भात NOTAM (Notice to Airmen) जारी करण्यात आले असून, या कालावधीत पाकिस्तानी विमानांना भारतीय हवाई हद्दीत प्रवेशबंदी करण्यात आली आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : पाकिस्तानात नेमकं चाललंय काय? कराचीत मोठा स्फोट अन् उरलेले पाणीही गेले नाल्यांमध्ये वाहून

जॅमर आणि क्षेपणास्त्र तैनातीमागे हवाई हल्ल्याची भीती

पाकिस्तानच्या लष्करी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भारतीय लढाऊ विमानांचा संभाव्य प्रवेश रोखण्यासाठी नियंत्रण रेषेजवळ (LOC) जॅमर यंत्रणा बसवण्यात आल्या आहेत. या जॅमर्सद्वारे भारतीय विमाने आणि ड्रोनचे नेव्हिगेशन, कम्युनिकेशन व रडार सिग्नल्स अडवण्याचा प्रयत्न होणार आहे. याशिवाय, पाकिस्तानने चिनी बनावटीची अत्याधुनिक विमानविरोधी क्षेपणास्त्र प्रणाली ‘FD-2000B’ (ड्रॅगन सिस्टीम) LOC जवळील संवेदनशील भागांमध्ये तैनात केली आहे. ही प्रणाली हाय-अल्टिट्यूडवरून येणाऱ्या लढाऊ विमानांवर अचूक हल्ला करण्यास सक्षम असल्याचे मानले जाते.

Pakistan deploys fighter planes near the Indian Territory big war move amid fears of all out war just 5 minute distance Pak Air Force on new deployment mobilizes fleet as India gears up for response JF 17 thunder and F16 aircraft deployed different aircrafts,at Skardu airport pic.twitter.com/Y58ABHVx3E — Steve Adams (@SteveAd13487346) April 30, 2025

credit : social media

शस्त्रसंधीचे सातत्याने उल्लंघन

दरम्यान, पाकिस्तानी सैन्याने सातव्या दिवशी सलग शस्त्रसंधीचे उल्लंघन केले आहे. जम्मू-कश्मीरमधील कुपवाडा, उरी आणि अखनूर भागांत रात्रीच्या सुमारास गोळीबार झाला. लष्कराच्या माहितीनुसार, या गोळीबारामध्ये कोणतीही पूर्वचेतावणी देण्यात आलेली नव्हती. भारतीय लष्कराने तत्काळ प्रत्युत्तर दिले असून, सीमा भागांत तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. गेल्या शुक्रवारी सुरु झालेल्या या गोळीबारांच्या मालिकेमुळे सीमावर्ती गावांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

पहलगाम हल्ल्यामुळे तणावाला उधाण

या सर्व घडामोडींचा उगम पहलगाम येथे झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यात आहे, ज्यात अनेक भारतीय जवान शहीद झाले. या घटनेनंतर भारत सरकारने पाकिस्तानला कठोर इशारा देत कारवाईचे संकेत दिले होते. यानंतरच दोन्ही देशांमध्ये हवाई क्षेत्र बंदी आणि सीमारेषेवर तणाव वाढवणाऱ्या हालचाली सुरू झाल्या.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : कोरडा पडलाय पाकिस्तान; भारताच्या जलनीतीचा कसा पडला प्रभाव? पाहा Satellite Image

 संघर्षाच्या उंबरठ्यावर भारत-पाक?

भारत आणि पाकिस्तानमधील सध्या सुरु असलेल्या घडामोडी उपद्रवी तणावातून सरळ सैनिकी संघर्षाकडे वळत आहेत का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. भारताने आपले हवाई क्षेत्र पाकिस्तानी विमानांसाठी बंद करणे, आणि पाकिस्तानकडून जॅमर व क्षेपणास्त्रांची तैनाती ही परिस्थिती आणखी गंभीर करत आहे. अशा वेळी दोन्ही देशांनी संयमाने आणि मुत्सद्देगिरीने मार्ग काढणे गरजेचे आहे, अन्यथा छोट्या चिंगाऱ्यापासून मोठ्या आगीचा भडका उडण्यास वेळ लागणार नाही.

Web Title: India pak tensions spike pak deploys jammers dragon missiles india shuts airspace

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 01, 2025 | 11:03 AM

Topics:  

  • India pakistan Dispute
  • india pakistan war
  • international news
  • Pahalgam Terror Attack

संबंधित बातम्या

China News: चीनमध्ये माकडे खरेदी करण्यासाठी मोठी धावपळ, ‘हे’ आहे कारण; किंमत ऐकून होतील डोळे पांढरे
1

China News: चीनमध्ये माकडे खरेदी करण्यासाठी मोठी धावपळ, ‘हे’ आहे कारण; किंमत ऐकून होतील डोळे पांढरे

Yemen Conflict : तेलसमृद्ध प्रांतासाठी संघर्ष! येमेनच्या रणांगणात Saudi-UAE फुंकणार युद्धाचे रणशिंग
2

Yemen Conflict : तेलसमृद्ध प्रांतासाठी संघर्ष! येमेनच्या रणांगणात Saudi-UAE फुंकणार युद्धाचे रणशिंग

Trump Threatens Iran: अमेरिका हल्ला करण्यास तयार! ट्रम्प यांची ‘ती’ पोस्ट आणि इराणमधील झाला आंदोलनाचा भडका
3

Trump Threatens Iran: अमेरिका हल्ला करण्यास तयार! ट्रम्प यांची ‘ती’ पोस्ट आणि इराणमधील झाला आंदोलनाचा भडका

Cyclone Ditwah : भारतच आमचा खरा मित्र! चक्रीवादळाने उद्ध्वस्त झालेल्या श्रीलंकेसाठी जयशंकर बनले ‘तारणहार’
4

Cyclone Ditwah : भारतच आमचा खरा मित्र! चक्रीवादळाने उद्ध्वस्त झालेल्या श्रीलंकेसाठी जयशंकर बनले ‘तारणहार’

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.