Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • बजेट
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • बजेट 2026
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • ajit pawar plane crash |
  • Gold Rate |
  • budget 2026 |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Israel Visit : Epstein Files मध्ये PM Modi यांचे नाव; भारताने अमेरिकेला सुनावले खडेबोल; जाणून घ्या काय आहे ‘त्या’ ईमेलचे सत्य

Israel Visit : Epstein Filesने जगभरात खळबळ माजवली आहे. या फाईल्समध्ये PM Modi यांचे नाव समाविष्ट केल्याने देशात राजकीय गोंधळ निर्माण झाला आहे. भारताने अमेरिकेला सुनावले; काँग्रेस आणि भाजपमध्ये जुंपली, नेमकं सत्य काय?

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Feb 01, 2026 | 12:37 PM
india rejects pm modi mention in epstein files israel visit mea statement

india rejects pm modi mention in epstein files israel visit mea statement

Follow Us
Close
Follow Us:
  • भारताचे सडेतोड उत्तर
  • राजकीय रणकंदन
  • नक्की काय आहे प्रकरण?

PM Modi mention in Epstein files 2026 : जगभरातील बड्या हस्तींची झोप उडवणाऱ्या ‘जेफ्री एपस्टाईन’ (Jeffrey Epstein) फाइल्सने आता भारतीय राजकारणात मोठे वादळ निर्माण केले आहे. अमेरिकेच्या न्याय विभागाने ३० जानेवारी २०२६ रोजी तब्बल ३५ लाख पानांचा दस्तऐवज आणि हजारो व्हिडिओ सार्वजनिक केले. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi)  यांच्या २०१७ च्या ऐतिहासिक इस्रायल भेटीचा उल्लेख असलेला एक ईमेल समोर आल्याने खळबळ उडाली आहे. भारत सरकारने यावर अत्यंत तीव्र प्रतिक्रिया दिली असून, हे सर्व दावे ‘बिनबुडाचे’ असल्याचे स्पष्ट केले आहे.

भारताची आक्रमक भूमिका: “गुन्हेगाराचे फालतू विचार”

परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी शनिवारी (३१ जानेवारी) रात्री उशिरा एक निवेदन प्रसिद्ध केले. त्यांनी म्हटले की, “आम्ही तथाकथित एपस्टाईन फाइल्समधील ईमेलचे वृत्त पाहिले आहे. पंतप्रधान मोदींची २०१७ ची इस्रायल भेट ही अधिकृत आणि ऐतिहासिक होती, हे सत्य आहे. मात्र, त्या ईमेलमधील इतर सर्व दावे हे एका शिक्षा झालेल्या गुन्हेगाराच्या (एपस्टाईन) फालतू विचारांपेक्षा (Trashy Ruminations) जास्त काही नाहीत. अशा विधानांना आम्ही तिरस्काराने फेटाळून लावतो.”

Statement by the Official Spokesperson to clarify certain reports: We have seen reports of an email message from the so-called Epstein files that has a reference to the Prime Minister and his visit to Israel. Beyond the fact of the Prime Minister’s official visit to Israel in… pic.twitter.com/ZOZSwE1AZA — Randhir Jaiswal (@MEAIndia) January 31, 2026

credit – social media and Twitter

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : भारताचे तेल धोरण Trump ठरवणार का? ‘व्हेनेझुएला डील’वरून काँग्रेसचा Modi सरकारवर घणाघात; ‘ऑपरेशन सिंदूर’वरही विचारले बोचरे प्रश्न

काँग्रेस विरुद्ध भाजप: राजकीय युद्ध पेटले

या प्रकरणावरून देशात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये मोठा वाद सुरू झाला आहे. काँग्रेस नेते पवन खेरा यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत म्हटले की, “एका बाललैंगिक अत्याचार करणाऱ्या आणि गुन्हेगाराने भारतीय पंतप्रधानांबद्दल असे लिहिणे ही देशासाठी राष्ट्रीय लज्जास्पद बाब आहे. सरकारने यावर मौन न बाळगता स्पष्टीकरण द्यावे.”

यावर भाजपने तात्काळ प्रत्युत्तर दिले. भाजप नेते संबित पात्रा यांनी पत्रकार परिषदेत काँग्रेसवर ‘ईमेलमध्ये फेरफार’ केल्याचा आरोप केला. पात्रा म्हणाले की, “काँग्रेसने मूळ ईमेलमध्ये ‘his advice’ (त्याचा सल्ला) हे शब्द स्वतःहून टाकले आहेत, जे मूळ दस्तऐवजात नाहीत. हा काँग्रेसचा ‘फ्रॉड’ असून पंतप्रधानांची प्रतिमा मलीन करण्याचा हा जाणीवपूर्वक केलेला प्रयत्न आहे.”

It is a matter of national shame that Jeffery Epstein – a convicted human trafficker, child sex offender and serial rapist from the USA – wrote that the Prime Minister Narendra Modi took his “advice and danced and sang in Israel for the benefit of the US president. They had met a… pic.twitter.com/3jRXjGLNsS — Pawan Khera 🇮🇳 (@Pawankhera) January 31, 2026

credit – social media and Twitter

ईमेलमध्ये नक्की काय म्हटले होते?

मिळालेल्या माहितीनुसार, जेफ्री एपस्टाईनने २०१७ मध्ये एका कतारी अधिकाऱ्याला ईमेल पाठवला होता. त्यात त्याने दावा केला होता की, “पंतप्रधान मोदींनी इस्रायल भेटीचे नियोजन करण्यासाठी सल्ला घेतला होता आणि त्यांनी इस्रायलमध्ये अमेरिकन अध्यक्षांच्या फायद्यासाठी ‘गाणे आणि नृत्य’ (Danced and Sang) केले.” अमेरिकन तपास यंत्रणांनी स्पष्ट केले आहे की, एपस्टाईन अनेकदा बड्या लोकांशी आपले संबंध असल्याचे ‘बढाया’ मारत असे आणि हे ईमेल त्याच प्रवृत्तीचा भाग असू शकतात.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Scandal : Epstein Filesचा महास्फोट! 30 लाख कागदपत्रात मीरा नायर सहित ‘या’ दिग्गजांची नावे; इलॉन मस्कचेही गुपित उघड

पंतप्रधानांची इस्रायल भेट का महत्त्वाची होती?

पंतप्रधान मोदींची जुलै २०१७ मधील इस्रायल भेट ही स्वतंत्र भारताच्या इतिहासात कोणत्याही भारतीय पंतप्रधानांची पहिलीच इस्रायल भेट होती. या भेटीमुळे भारत आणि इस्रायलमधील संबंध एका नवीन उंचीवर पोहोचले होते. संरक्षणापासून कृषी क्षेत्रापर्यंत अनेक महत्त्वाचे करार यावेळी झाले होते. आता नऊ वर्षांनंतर एका गुन्हेगाराच्या ईमेलमुळे या भेटीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात असल्याने भारताने यावर कठोर पवित्रा घेतला आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: एपस्टाईन फाइल्समध्ये पंतप्रधान मोदींचा उल्लेख कशासाठी आहे?

    Ans: एका २०१७ मधील ईमेलमध्ये जेफ्री एपस्टाईनने दावा केला होता की पंतप्रधानांनी इस्रायल दौऱ्यासाठी सल्ला घेतला होता. भारताने हा दावा एका गुन्हेगाराचा बडबडाट असल्याचे सांगून फेटाळला आहे.

  • Que: यावर भारत सरकारची अधिकृत भूमिका काय आहे?

    Ans: परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्ट केले आहे की पंतप्रधान मोदींचा इस्रायल दौरा पूर्णपणे अधिकृत होता आणि ईमेलमधील इतर सर्व दावे चुकीचे आणि निंदनीय आहेत.

  • Que: जेफ्री एपस्टाईन कोण होता?

    Ans: तो एक अमेरिकन अब्जाधीश आणि सिद्धदोष लैंगिक गुन्हेगार होता, ज्याचा २०१९ मध्ये न्यूयॉर्कच्या तुरुंगात मृत्यू झाला.

Web Title: India rejects pm modi mention in epstein files israel visit mea statement

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 01, 2026 | 12:37 PM

Topics:  

  • Israel
  • Jeffrey Epstein
  • PM Narendra Modi
  • World news

संबंधित बातम्या

एकाग्र लक्ष, ठाम हावभाव; अर्थसंकल्पीय भाषणात PM मोदींच्या टेबल थापांनी वेधलं सर्वांचं लक्ष; Video Viral
1

एकाग्र लक्ष, ठाम हावभाव; अर्थसंकल्पीय भाषणात PM मोदींच्या टेबल थापांनी वेधलं सर्वांचं लक्ष; Video Viral

पाकिस्तानात गृहयुद्धाला सुरुवात? BLA चा एकाच वेळी १४ शहरात हल्ला, ८० हून अधिकांचा बळी
2

पाकिस्तानात गृहयुद्धाला सुरुवात? BLA चा एकाच वेळी १४ शहरात हल्ला, ८० हून अधिकांचा बळी

Budget 2026 : मुंबई-पुणे, पुणे-हैद्राबाद प्रवास जलद गतीने होणार! निर्मला सीतारमण यांची मोठी घोषणा
3

Budget 2026 : मुंबई-पुणे, पुणे-हैद्राबाद प्रवास जलद गतीने होणार! निर्मला सीतारमण यांची मोठी घोषणा

Oil Politics: तेल खरेदीवरुन पुन्हा उडणार भडका? भारताचा अर्थसंकल्प सादर होत असताना डोनाल्ड ट्रम्प यांची मोठी घोषणा
4

Oil Politics: तेल खरेदीवरुन पुन्हा उडणार भडका? भारताचा अर्थसंकल्प सादर होत असताना डोनाल्ड ट्रम्प यांची मोठी घोषणा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.