Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 23 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharastra Politics |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

MEA India H1BVisa : जे. डी. व्हान्स यांच्या ‘गुलाम’ वक्तव्यावर भारताचा पलटवार; परराष्ट्र मंत्रालयाकडून अधिकृत निवेदन जारी

MEA India : एच-१बी व्हिसाबाबत जेडी व्हान्स यांच्या वक्तव्यावर भारताने कठोर भूमिका घेतली; परराष्ट्र मंत्रालयाने वेठबिगारीवरील वक्तव्य आक्षेपार्ह असल्याचे म्हटले असून, एक सूचना जारी केली आहे.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Oct 09, 2026 | 02:47 PM
JD Vance H1B Visa statement MEA India response to JD Vance

JD Vance H1B Visa statement MEA India response to JD Vance

Follow Us
Follow Us:
  • भारताचा तीव्र आक्षेप
  • अमेरिकन अर्थव्यवस्थेतील योगदान
  • PERM आणि H-1B मधील फरक स्पष्ट

अमेरिकेचे उपराष्ट्रपती जे. डी. व्हान्स यांनी एच-१बी (H-1B) व्हिसाधारकांबाबत केलेल्या वादग्रस्त विधानावर भारताने अत्यंत कठोर आणि आक्रमक भूमिका घेतली आहे. भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने (MEA India) शुक्रवारी एक अधिकृत निवेदन जारी करत जे. डी. व्हान्स यांच्या वक्तव्याचा तीव्र निषेध केला. एच-१बी व्हिसावर अमेरिकेत काम करणाऱ्या भारतीय तंत्रज्ञांना आणि कुशल व्यावसायिकांना ‘गहाण मजूर’ किंवा ‘गुलाम’ (Indentured Labor) संबोधणे हे अत्यंत आक्षेपार्ह, अयोग्य आणि वसाहतवादी शोषणाच्या वेदनादायक इतिहासाची आठवण करून देणारे आहे, अशा शब्दांत भारताने अमेरिकन प्रशासनाला सुनावले आहे.

परराष्ट्र मंत्रालयाकडून आक्षेपार्ह विधानाचा तीव्र निषेध

अमेरिकेत पार पडलेल्या एका पत्रपरिषदेदरम्यान जे. डी. व्हान्स यांनी व्हिसा फसवणूक आणि रोजगाराच्या मुद्द्यावर बोलताना एच-१बी व्हिसाधारकांवर ताशेरे ओढले होते. परदेशी आउटसोर्सिंग कंपन्या अमेरिकन नागरिकांच्या नोकऱ्या हिसकावून घेत आहेत आणि परदेशातून स्वस्त मजूर आणून अमेरिकन कामगारांचे वेतन कमी करत आहेत, असा आरोप व्हान्स यांनी केला होता. त्यांच्या या विधानामुळे अमेरिकेत कार्यरत असलेल्या लाखो भारतीय आयटी व्यावसायिक, अभियंते आणि तंत्रज्ञांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले होते. मात्र, भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने तात्काळ ढाल बनत या संपूर्ण प्रकरणावर आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

भारतीय व्यावसायिकांचे अमेरिकन अर्थव्यवस्थेतील मोलाचे योगदान

परराष्ट्र मंत्रालयाने आपल्या निवेदनात स्पष्ट केले की, अमेरिकेचा इतिहास हा जगभरातून आलेल्या स्थलांतरितांच्या कठोर परिश्रमाने, समर्पणाने आणि नवनिर्मितीने घडलेला आहे. आज अमेरिकेत राहणारे भारतीय व्यावसायिक हे अत्यंत उच्चशिक्षित, कुशल आणि आपापल्या क्षेत्रात तज्ज्ञ आहेत. ते केवळ नोकऱ्या करत नाहीत, तर अमेरिकेच्या आर्थिक विकासात, टेक इकोसिस्टममध्ये आणि नवोन्मेष परिसंस्थेत (Innovation Ecosystem) महत्त्वपूर्ण योगदान देतात. अशा कुशल तंत्रज्ञांची तुलना वेठबिगारांशी करणे ही अत्यंत दुर्दैवी गोष्ट असून यामुळे त्यांच्या कष्टाचा आणि प्रतिभेचा अनादर होतो.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : US PERM Suspended: इन्फोसिस, TCS, विप्रोसह दिग्गज आयटी कंपन्यांवर अमेरिकेची मोठी कारवाई; भारतीयांची ग्रीन कार्ड प्रक्रिया रोखली

भारतीय परराष्ट्र मंत्रालयाच्या निवेदनानुसार, “गुणवत्ता आणि प्रतिभेची गतिशीलता (Talent Mobility) ही दोन्ही देशांसाठी फायदेशीर ठरते. यामुळे भारतीयांना जागतिक पातळीवर संधी मिळतात, तर दुसरीकडे अमेरिकन कंपन्यांना जगभरातील सर्वोत्तम प्रतिभा आपल्याकडे आकर्षित करता येते. यामुळे अमेरिकेत संशोधन, उत्पादकता, आंतरराष्ट्रीय स्पर्धात्मकता आणि नवीन रोजगार निर्मितीला चालना मिळते. तसेच तेथील भागधारकांची (Shareholders) संपत्ती वाढण्यासही मदत होते.”

Statement on announcement made by the US Department of Labour ⬇️ 🔗 https://t.co/FZawXUTqcl https://t.co/67vMRyJ5EF — Randhir Jaiswal (@MEAIndia) October 9, 2026

credit – social media and Twitter

जे. डी. व्हान्स यांचा नक्की काय होता आरोप?

अमेरिकेचे उपराष्ट्रपती जे. डी. व्हान्स यांनी आपल्या दाव्यात म्हटले होते की, “जर तुम्ही अमेरिकेत एच-१बी व्हिसावर काम करत असाल, तर त्याच पदावर काम करणाऱ्या अमेरिकन नागरिकापेक्षा तुम्हाला २०,००० डॉलर्स कमी वेतन दिले जाते. आणि जर तुम्ही एखाद्या परदेशी आउटसोर्सिंग कंपनीद्वारे नियुक्त झाला असाल, तर हा फरक ४८,००० डॉलर्सपर्यंत पोहोचतो. कंपन्या अमेरिकन कामगारांना कामावरून काढून टाकतात आणि त्यांच्या जागी कमी वेतनावर काम करणाऱ्या परदेशी मजुरांना ठेवतात.” व्हान्स यांच्या या विधानाला भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने तथ्यहीन आणि वास्तवाकडे दुर्लक्ष करणारे म्हटले आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Elon Musk: ‘अंबानीच आहेत का भारताचे खरे बॉस?’ स्टारलिंकवरून मस्क आणि Indian Gov. मध्ये जुंपली; सरकारच्या उत्तराकडे लक्ष

PERM आणि H-1B मधील फरक भारताने केला स्पष्ट

याच निवेदनात परराष्ट्र मंत्रालयाने एका अत्यंत महत्त्वाच्या तांत्रिक मुद्द्यावरही प्रकाश टाकला. अमेरिकेच्या कामगार विभागाने काही कंपन्यांच्या कायमस्वरूपी कामगार प्रमाणपत्र (PERM) कार्यक्रमाबाबत घेतलेल्या निर्णयाची भारताला पूर्ण माहिती आहे. मात्र, PERM आणि H-1B व्हिसा या दोन पूर्णपणे वेगवेगळ्या गोष्टी आहेत. PERM अर्जांच्या निलंबनाचा सध्या अमेरिकेत वैध H-1B व्हिसावर राहणाऱ्या भारतीय कर्मचाऱ्यांच्या किंवा त्यांच्या कुटुंबीयांच्या सद्यस्थितीवर कोणताही परिणाम होत नाही.

तथापि, यामुळे प्रभावित कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या ग्रीन कार्ड (Green Card) प्रक्रियेला काही प्रमाणात उशीर होऊ शकतो. या संपूर्ण विषयावर भारत सरकार अमेरिकन प्रशासनाच्या संपर्कात असून, भारतीय नागरिकांच्या हक्कांचे संरक्षण करण्यासाठी कटिबद्ध आहे, असेही परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.

Web Title: India responds to jd vance h1b visa statement mea press release hp

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 09, 2026 | 02:47 PM

Topics:  

  • America
  • MEA
  • World news

संबंधित बातम्या

Saryu Kamla Express: प्रभू रामांची अयोध्या ते माता सीतेचे जनकपूर फक्त 19 तासांत; भारत-नेपाळ दुसरी थेट रेल्वे सुरू, वाचा नियम
1

Saryu Kamla Express: प्रभू रामांची अयोध्या ते माता सीतेचे जनकपूर फक्त 19 तासांत; भारत-नेपाळ दुसरी थेट रेल्वे सुरू, वाचा नियम

Bangladesh : चीनकडून बांगलादेशला जाणारे जहाज पकडले; 405 टन स्फोटक रसायन जप्त, 100 क्षेपणास्त्रे बनण्याची शक्यता
2

Bangladesh : चीनकडून बांगलादेशला जाणारे जहाज पकडले; 405 टन स्फोटक रसायन जप्त, 100 क्षेपणास्त्रे बनण्याची शक्यता

Turkey Climate Summit : हवामानाची कोणालाच चिंता नाही? तुर्कस्तानमधील COP31 परिषद कराराशिवाय अपयशी; वाचा 4 मोठी कारणे
3

Turkey Climate Summit : हवामानाची कोणालाच चिंता नाही? तुर्कस्तानमधील COP31 परिषद कराराशिवाय अपयशी; वाचा 4 मोठी कारणे

Indonesia : इंडोनेशियात कँडी कारखान्याला भीषण आग; बेपत्ता 34 कामगारांपैकी 24 जणांचे अवशेष सापडले, DNA चाचणीतून होणार ओळख
4

Indonesia : इंडोनेशियात कँडी कारखान्याला भीषण आग; बेपत्ता 34 कामगारांपैकी 24 जणांचे अवशेष सापडले, DNA चाचणीतून होणार ओळख

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.