'India should emulate UAE'; Global Imams Council statement on country's Waqf Board controversy
नवी दिल्ली: सध्या देशात वक्फ बोर्डवरुन मोठा वाद सुरु आहे. संसदेत वक्फ बोर्ड सुधारणा विधेयकास मंजुरी मिळाली आहे. लवकरच वक्फ बोर्ड सुधारणा विधेयकाचे कायद्यांत रुपांतर होणार आहे. जगभरात मुस्लिम देशांमध्ये वक्फ मंडळाची महत्वाची भूमिका आहे. दरम्यान हा वाद देशात पेटत असून आणखी एक विधान समोर आले आहे. ग्लोबल इमाम्स कौन्सिल (GIC) चे गव्हर्निंग सदस्य मोहम्मद तौहिदी यांनी वक्फ बोर्डावर एक महत्वपूर्ण विधान केले आहे.
तौहिदी यांनी भारतात सरु असलेल्या वक्फ बोर्डाच्या वादाच्या पार्श्वभूमीवर आपले मत मांडले आहे. त्यांनी म्हटले आहे की, प्रत्येकाने कायद्याचे पालन करण आवश्यक आहे. तसेच वक्फ बोर्डाने इस्लाम, मुस्लिम समाज आणि मानवतेच्या सेवेकडे लक्ष दिले पाहिजे. यासाठी UAE चे अनुकरण करावे.
मिळालेल्या माहितीनुसार, UAE ची वक्फ बोर्ड संस्था व्यावसायिक संस्था आहे. ही संस्था कायदेशीररित्या समाजात कार्यरत आहे. ही संस्था समाजात मान्यता आणि सन्मान प्राप्त आहे. ही संस्था धार्मिक स्थळांचे पारदर्शकपणे व्यवस्थापन करण्याचे कार्य करते. केवळ मुस्लिमांसाठीच नव्हे तर मंदिरे, चर्च आणि इतर उपासना स्थळांच्या व्यवस्थापनाचे कामकाजही ही संस्था पाहते. या सरकारी संस्थेकडून सर्व धर्मस्थळांची निगा राखली जाते. कोणत्याही धर्माला विशेष प्राधान्य दिले जात नाही. हे UAE च्या वक्फ बोर्डाचे वैशिष्ट्ये आहे.
तौहिदी यांच्या म्हणण्यानुसार, वक्फ बोर्ड एका प्रगतिशील, उदार आणि मानवतावादी दृष्टीकोनाने काम केले पाहिजे. त्यांनी स्पष्टपण म्हटले की, “धर्माच्या आधारावर हा कायदा वेगळा नसावा, सर्वांसाठी एक कायदा हवा,” काही देशांमध्ये वक्फ बोर्ड कट्टपंथ्यांच्या प्रभावाथाली आहेत. यामुळे धार्मिक स्थळ ध्रवीकरणाचे साधन बनले आहे. तौहीदी यांचे विधान हे प्रशासकीय स्वरुपाचचे नव्ह, तर एक वैचारिक भूमिका देखी मांडते.
तौहिदी यांनी भारतात देखील UAE च्या मॉडेलचा अवलंब करण्याचा सल्ला दिला आहे. यामध्ये सर्व धर्मांना समान अधिकार, समान जबाबदाऱ्या आणि कायद्याचे समान पालन आवश्यक आहे. समाजाच्या सेवेसाठी व पारदर्शक व्यवस्थापनासाठी वक्फ संस्थांनी एक व्यापक भूमिका बजावणे गरजेचे असल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले.