Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Sugar Export Ban : भारताच्या ‘या’ एका निर्णयाने नेपाळ हादरले; सरकारसमोर ‘कडू’ संकट; बालेन शाह यांच्यासाठी अग्निपरीक्षा

भारताने यावर्षी ३० सप्टेंबरपर्यंत साखर निर्यातीवर तात्काळ प्रभावाने बंदी घातली आहे. यामागे साखरेच्या किमतींवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न असल्याचे म्हटले जात आहे. या निर्णयामुळे शेजारील नेपाळमध्ये चिंता वाढली आहे.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: May 15, 2026 | 01:52 PM
india sugar export ban nepal balen shah crisis festival shortage 2026

india sugar export ban nepal balen shah crisis festival shortage 2026

Follow Us
Close
Follow Us:
  • नेपाळमध्ये खळबळ
  • सणासुदीच्या काळात संकट
  • महागाईचा भडका

India Sugar Export Ban Nepal Impact : जागतिक बाजारपेठेत भारत हा साखरेचा दुसरा सर्वात मोठा निर्यातदार देश आहे. अशातच, केंद्र सरकारने देशांतर्गत किमती नियंत्रित करण्यासाठी साखरेच्या निर्यातीवर ३० सप्टेंबर २०२६ पर्यंत कडक बंदी घातली आहे. भारताच्या या एका निर्णयाचा सर्वात मोठा तडाखा शेजारील देश नेपाळला (Nepal) बसला आहे. नेपाळमधील राजकीय वर्तुळात आणि बाजारपेठेत यामुळे चिंतेचे वातावरण असून, काठमांडूचे महापौर बालेन शाह आणि नेपाळ सरकारसमोर आता सणासुदीच्या काळात जनतेला साखर कशी पुरवायची, हा सर्वात मोठा प्रश्न उभा राहिला आहे.

सणासुदीचा गोडवा होणार कडू?

नेपाळमध्ये दसरा, दिवाळी आणि छठ पूजा हे सण अत्यंत उत्साहात साजरे केले जातात. या काळात साखरेची मागणी कित्येक पटीने वाढते. मात्र, भारताने घातलेल्या बंदीमुळे नेपाळच्या अन्नपुरवठा साखळीला मोठा हादरा बसला आहे. ‘काठमांडू पोस्ट’च्या वृत्तानुसार, भारताच्या या निर्णयामुळे नेपाळी बाजारपेठा विस्कळीत होण्याची दाट शक्यता आहे. भविष्यात उद्भवू शकणाऱ्या ‘एल निनो’च्या संकटामुळे उत्पादनात घट होण्याची भीती भारताला आहे, ज्यामुळे भारताने स्वतःची सुरक्षा आधी पाहिली आहे. मात्र, नेपाळसाठी ही चिंतेची बाब ठरली आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Gaza Blockade Break: डझनभर जहाजे निघाली गाझाच्या दिशेने! इस्रायली नाकेबंदीला आव्हान देण्याच्या तयारीत, नेमकं काय घडणार?

नेपाळची भारतावरील हतबलता

नेपाळचे उद्योग आणि वाणिज्य मंत्रालयाचे सहसचिव नेत्र प्रसाद सुबेदी यांनी कबूल केले आहे की, साखर बंदीमुळे नेपाळच्या अडचणी वाढल्या आहेत. त्यांनी स्पष्ट केले की, सध्या चहा निर्यातीच्या नियमांवर चर्चा सुरू असतानाच साखरेचा हा झटका बसला आहे. जर भारताकडून साखरेचा पुरवठा झाला नाही, तर नेपाळला इतर देशांकडून साखर आयात करावी लागेल. मात्र, इतर देशांतून साखर मागवणे नेपाळसाठी आर्थिकदृष्ट्या परवडणारे नाही. वाढता वाहतूक खर्च आणि परकीय चलन साठ्यावरील दबाव यामुळे नेपाळची अर्थव्यवस्था अडचणीत येऊ शकते.

Indian traders along the Nepal border have strongly protested the Nepal government’s decision to impose a tax on goods worth over NPR 100 brought from India. 😮 The traders have organized rallies, demanding that the Nepal government reverse its decision and help them. pic.twitter.com/Ni8GyapR4H — No Next Question (@NoNext_Question) May 15, 2026

credit – social media and Twitter

बालेन शाह आणि सरकारसमोर मोठे आव्हान

तज्ज्ञांच्या मते, नेपाळला आपली अन्नसुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी आतापासूनच पावले उचलणे गरजेचे आहे. संकेत भट्टराई यांच्यासारख्या अधिकाऱ्यांनी इशारा दिला आहे की, जरी सध्या साखरेचा साठा असला तरी, सणांच्या काळात मागणी वाढल्यास किमतींवर नियंत्रण ठेवणे कठीण होईल. जर खाजगी व्यापार्‍यांनी साठेबाजी सुरू केली, तर सामान्य नेपाळी जनतेला साखरेसाठी अवाढव्य किंमत मोजावी लागेल. अशा परिस्थितीत बालेन शाह सरकारला केंद्र सरकारशी चर्चा करून ‘जी-टू-जी’ (सरकार-ते-सरकार) कराराद्वारे साखर मिळवण्यासाठी प्रयत्न करावे लागतील.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :  BRICS 2026: ‘आता अमेरिका दादागिरी करत आहे…’ भारत भूमीवर पोहोचताच इराणच्या संतापाचा स्फोट; अराघची यांनी व्यक्त केला रोष

तज्ज्ञांचा इशारा: अन्नसुरक्षा धोक्यात?

व्यापार तज्ज्ञ रवी शंकर सैंजू यांनी म्हटले आहे की, नेपाळ अन्नपुरवठ्यासाठी भारतावर मोठ्या प्रमाणावर अवलंबून आहे. भारताच्या प्रत्येक व्यापार धोरणाचा थेट परिणाम नेपाळच्या स्वयंपाकघरावर होतो. यापूर्वी २०२३ मध्येही भारताने साखर निर्यात थांबवली होती, तेव्हा नेपाळला मोठी कसरत करावी लागली होती. आता पुन्हा एकदा तीच परिस्थिती निर्माण झाली असून, जर वेळीच उपाययोजना केल्या नाहीत, तर नेपाळमध्ये साखरेचा काळाबाजार होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

💡

Frequently Asked Questions

  • Que: भारताच्या साखर निर्यात बंदीचा नेपाळवर काय परिणाम होईल?

    Ans: नेपाळमध्ये साखरेचा तुटवडा निर्माण होऊ शकतो आणि सणासुदीच्या काळात साखरेच्या किमती प्रचंड वाढण्याची शक्यता आहे.

  • Que: नेपाळ साखरेसाठी भारतावर किती अवलंबून आहे?

    Ans: नेपाळ आपल्या साखरेच्या एकूण गरजेपैकी मोठा हिस्सा भारताकडून आयात करतो, कारण इतर देशांकडून आयात करणे महाग पडते.

  • Que: बालेन शाह सरकार या संकटावर काय उपाय करू शकते?

    Ans: नेपाळ सरकार भारताशी थेट चर्चा करून विशेष कोट्यांतर्गत साखर मिळवण्याचा किंवा पर्यायी बाजारपेठा शोधण्याचा प्रयत्न करू शकते.

Web Title: India sugar export ban nepal balen shah crisis festival shortage 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 15, 2026 | 01:52 PM

Topics:  

  • Balen Shah
  • nepal
  • Sugar Price

संबंधित बातम्या

Modi Government: आधी आमची जनता, मग जग! केंद्र सरकारने साखरेची निर्यात केली ‘बॅन’; 15 लाख टन निर्यातीचा परवाना रद्द?
1

Modi Government: आधी आमची जनता, मग जग! केंद्र सरकारने साखरेची निर्यात केली ‘बॅन’; 15 लाख टन निर्यातीचा परवाना रद्द?

Balen Shah: नेपाळचे पंतप्रधान झाल्यावर बालेन शाह यांचा खरा चेहरा आला समोर; 45 दिवसांत घेतले भारत विरोधी ‘हे’ चार निर्णय
2

Balen Shah: नेपाळचे पंतप्रधान झाल्यावर बालेन शाह यांचा खरा चेहरा आला समोर; 45 दिवसांत घेतले भारत विरोधी ‘हे’ चार निर्णय

Lipulekh Dispute: बालेन शाह यांची आक्रमक भूमिका! भारतीय परराष्ट्र सचिवांचा नेपाळ दौरा रखडला; ‘या’ निर्णयामुळे दोन्ही देशांत खळबळ
3

Lipulekh Dispute: बालेन शाह यांची आक्रमक भूमिका! भारतीय परराष्ट्र सचिवांचा नेपाळ दौरा रखडला; ‘या’ निर्णयामुळे दोन्ही देशांत खळबळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.