
येमेन, साना: मागील काही वर्षांपासूनगृहयुद्धाच्या विळख्यात सापडलेल्या येमेनमधून भारताबाबत आश्चर्यकारक बातमी समोर येत आहे. येमेनमध्ये एका भारतीय नर्सला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. केरळस्थित भारतीय परिचारिका निमिषा प्रिया हिला येमेनी नागरिकाची हत्या केल्याप्रकरणी फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. आता भारत सरकारच्या परराष्ट्र मंत्रालयानेही या प्रकरणी आपले निवेदन जारी केले आहे. या मुद्द्यावर परराष्ट्र मंत्रालयाने काय म्हटले आहे ते जाणून घेऊया.
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने मंगळवारी या संपूर्ण प्रकरणावर आपली भूमिका मांडली आणि परिचारिकेला सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले. येमेनमध्ये मृत्युदंडाची शिक्षा भोगत असलेल्या भारतीय परिचारिकेच्या बाबतीत आवश्यक पर्याय शोधण्यासाठी भारतातील केंद्र सरकारकडून सर्व शक्य सहकार्य करत केले जात असल्याचे परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे.
Pak-Afghan War : पाकिस्तानच्या लष्करी तळावर ‘तालिबान’चा कब्जा; TTP ने Video ही केला जारी
मंगळवारी एका माध्यमाच्या प्रश्नाला उत्तर देताना, भारतीय परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे अधिकृत प्रवक्ते रणधीर जैस्वाल म्हणाले, “येमेनमध्ये निमिषा प्रियाला ठोठावण्यात आल्याची आम्हाला माहिती आहे. प्रियाचे कुटुंब योग्य पर्याय शोधत असल्याचे आम्हाला समजले आहे. सरकार या प्रकरणात शक्य ती सर्व मदत करत आहे.”
कोण आहे निमिषा प्रिया?
निमिषा प्रिया ही भारतातील केरळची रहिवासी आहे. 2012 पासून ती येमेनमधील साना येथे काम करत आहे. निमिषा 2012 मध्ये नर्स म्हणून येमेनला गेली होती. 2015 मध्ये निमिषा आणि तलाल यांनी मिळून तिथे क्लिनिक सुरू केले. तलालने क्लिनिकमध्ये शेअरहोल्डर म्हणून नाव समाविष्ट करून आणि स्वतःला निमिषाचा पती म्हणून दाखवून फसवणूक करून अर्ध्या उत्पन्नाचा अपहार करण्याचा प्रयत्न केला. याबाबत निमिषाने विचारणा केली असता दोघांमध्ये वाद सुरू झाला. तलालने तिला मारहाण आणि लैंगिक अत्याचार करण्यास सुरुवात केली.
Hina Khan : कॅन्सरशी लढा देणाऱ्या हिना खानची नवीन पोस्ट पाहून चाहते भावूक
निमिषाला जुलै 2017 मध्ये येमेनी नागरिक तलाल अब्दो महदीच्या हत्येप्रकरणी दोषी ठरवण्यात आले होते. 2018 मध्ये निमिषाला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती. या शिक्षेविरुद्ध ती गेल्या सात-आठ वर्षापासून लढा दिला आहे. निमिषाच्या कुटुंबाने तिच्या सुटकेसाठी बरेच कायदेशीर आणि मुत्सद्दी प्रयत्न केले. येमेनचे राष्ट्राध्यक्ष रशाद अल-अलिमी यांनी नर्स निमिषा प्रियाच्या फाशीच्या शिक्षेला मंजुरी दिली आहे. निमिषाला महिनाभरात फाशी होणार असल्याची माहिती आहे.
या छळाला कंटाळून निमिषाने जुलै 2017 मध्ये तलालला नशेचे इंजेक्शन दिले, ज्यामुळे त्याचा मृत्यू झाला. निमिषा म्हणते की तिला मारण्याचा तिचा हेतू नव्हता आणि तिला फक्त तलालकडे असलेला तिचा पासपोर्ट परत मिळवायचा होता. निमिषाची आई प्रेमकुमार यांनी येमेनला जाऊन आपल्या मुलीला वाचवण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न केले पण येमेनच्या कनिष्ठ न्यायालयाने निमिषाला दोषी ठरवून फाशीची शिक्षा सुनावली. त्याचवेळी येमेनच्या सर्वोच्च न्यायालयानेही कनिष्ठ न्यायालयाचा निर्णय कायम ठेवला.
7 वर्षात 813 अपघात, 1473 मृत्यू…,विमान प्रवास कितपत सुरक्षित?