Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 12 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Gurbhej Singh : लंडनमध्ये 26 वर्षीय भारतीय तरुणाची चाकूने भोसकून हत्या; पोलिसांनी 7 जणांना केली अटक

लंडनमध्ये गुरभेज सिंग या २६ वर्षीय भारतीय वंशाच्या तरुणाची चाकूने वार करून हत्या करण्यात आली. हा हल्ला साउथॉल परिसरात झाला. पोलिसांनी या हत्येप्रकरणी सात जणांना ताब्यात घेतले होते, त्यापैकी सहा जणांना नंतर सोडून देण्यात आले आहे.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Jun 14, 2026 | 03:20 PM
indian origin man gurbhej singh stabbed to death southall london 7 arrested

indian origin man gurbhej singh stabbed to death southall london 7 arrested

Follow Us
Follow Us:
  • लंडनमध्ये भारतीय तरुणाची हत्या
  • ७ संशयितांना अटक
  • कुटुंबावर दुःखाचा डोंगर

Gurbhej Singh Southall London murder : लंडनमधून ( London) एक अत्यंत हृदयद्रावक आणि धक्कादायक बातमी समोर आली आहे. पश्चिम लंडनच्या साउथॉल (Southall) या प्रामुख्याने आशियाई आणि भारतीय नागरिक राहत असलेल्या भागात एका २६ वर्षीय भारतीय वंशाच्या तरुणाची चाकूने भोसकून निर्घृण हत्या करण्यात आली आहे. या मृत तरुणाची ओळख ‘गुरभेज सिंग’ (Gurbhej Singh) म्हणून झाली असून तो मूळचा पंजाबमधील तरनतारन (Tarn Taran) जिल्ह्यातील मेहदीपूर गावचा रहिवासी होता. या भीषण हल्ल्यात आणखी एक तिशीतील तरुण गंभीर जखमी झाला असून त्याला उपचारांनंतर रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. या घटनेमुळे लंडनमध्ये राहणाऱ्या अनिवासी भारतीयांमध्ये (NRIs) भीतीचे आणि चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

ही घटना बुधवार, १० जून रोजी मध्यरात्रीच्या सुमारास घडली. लंडन मेट्रोपॉलिटन पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रात्री अंदाजे १२:३० वाजताच्या सुमारास साउथॉलमधील नॉर्थ रोड आणि डॉर्मर्स वेल्स लेनच्या (North Road and Dormers Wells Lane) जंक्शनवर असलेल्या एका दुकानाबाहेर गुरभेज सिंगवर काही अज्ञात व्यक्तींनी हल्ला केला. प्रत्यक्षदर्शींनी आणि स्थानिक सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एका खानावळीत (Eating Joint) पंजाबी वंशाच्याच काही मुलांशी गुरभेजचा किरकोळ वाद झाला होता. हा वाद इतका विकोपाला गेला की, हॉटेलबाहेर पडताच एका टोळीने गुरभेजला घेरले आणि धारदार शस्त्राने थेट त्याचा गळा चिरला.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : MT Celestial : पाण्याच्या थंड बाटल्या अन मृतदेह! युद्धाच्या आगीत ओमान बंदरातील ‘त्या’ जहाजावरील थरकाप उडवणारी भीषण वास्तवता

घटनास्थळीच मृत्यू आणि पोलिसांची मोठी कारवाई

घटनेची माहिती मिळताच लंडन ॲम्ब्युलेन्स सर्व्हिस आणि मेट्रोपॉलिटन पोलिसांचे पथक रात्री १२:४१ वाजता घटनास्थळी दाखल झाले. डॉक्टरांनी आणि पॅरामेडिक्सच्या पथकाने गुरभेजला वाचवण्याचे आटोकाट प्रयत्न केले. मात्र, शरीरातून अतिरक्तस्राव झाल्यामुळे त्याचा घटनास्थळावरच मृत्यू झाला होता. पोलिसांनी तात्काळ कारवाई करत हत्येच्या संशयावरून घटनास्थळावरून आणि आसपासच्या परिसरातून २० ते ३० वयोगटातील ७ जणांना ताब्यात घेतले.

मेट्रोपॉलिटन पोलिसांच्या विशेष गुन्हे शाखेच्या (Specialist Crime Command) डिटेक्टिव्ह चीफ इन्स्पेक्टर ॲलिसन फॉक्सवेल (Alison Foxwell) यांनी या प्रकरणाचा सखोल तपास सुरू केला आहे. प्राथमिक चौकशी आणि पुराव्यांच्या अभावामुळे अटक करण्यात आलेल्या ७ जणांपैकी ६ संशयितांना कोणतीही पुढील कारवाई न करता सोडून देण्यात आले आहे. तर एका मुख्य संशयिताला सध्या जामिनावर सोडण्यात आले असून, पुढील तपास पूर्ण होईपर्यंत त्याची कडक चौकशी केली जाणार आहे. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले असून प्रत्यक्षदर्शींना पुढे येऊन साक्ष देण्याचे आवाहन केले आहे.

Who Was Gurbhej Singh? Indian-Origin Man Killed In London Knife Attackhttps://t.co/JlQAD4sgAT — NDTV Profit (@NDTVProfitIndia) June 14, 2026

credit – social media and Twitter

२४ लाखांचे कर्ज आणि एकाुलत्या एक मुलाचा अंत

गुरभेज सिंगच्या मृत्यूची बातमी पंजाबमधील त्याच्या मेहदीपूर गावी पोहोचताच संपूर्ण गावाला धक्का बसला असून त्याच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. गुरभेज हा तीन बहिणींचा एकुलता एक भाऊ होता. त्याचे वडील मुख्तियार सिंग हे केवळ ५ एकर शेती असलेले अल्पभूधारक शेतकरी आहेत. आपल्या मुलाचे भविष्य उज्ज्वल व्हावे आणि कुटुंबाची गरिबी दूर व्हावी यासाठी वडिलांनी स्वतःची शेती गहाण ठेवून आणि खासगी सावकारांकडून तब्बल २४ लाख रुपयांचे कर्ज काढून २०२२ मध्ये गुरभेजला लंडनला पाठवले होते.

लंडनमध्ये गेल्या चार वर्षांपासून गुरभेज हा मजूर म्हणून काम करत होता आणि अत्यंत कष्टाने पैसे कमावून पंजाबमध्ये आपल्या आई-वडिलांना कर्जाचे हप्ते फेडण्यासाठी पाठवत होता. कुटुंबाला आशेचा किरण असलेला हा तरुण अचानक एका हिंसेचा बळी ठरल्याने संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त झाले आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : VIRAL VIDEO : मृत्यूच्या दाढेतून परतले 233 प्रवासी! कोलंबोहून सिडनीला जाणाऱ्या विमानावर कोसळली वीज; थरार कॅमेऱ्यात कैद

मृतदेह मायदेशी आणण्यासाठी भारत सरकारकडे याचना

गुरभेजच्या हत्येनंतर आता त्याचे पार्थिव भारतात परत आणण्यासाठी त्याचे कुटुंब आणि गावातील लोक अत्यंत हतबल झाले आहेत. त्यांच्याकडे मृतदेह भारतात आणण्यासाठी आवश्यक असलेला मोठा खर्च करण्याची आर्थिक क्षमता नाही. त्यामुळे गुरभेजच्या वडिलांनी आणि नातेवाईकांनी भारत सरकार, परराष्ट्र मंत्रालय आणि दुबईतील प्रसिद्ध समाजसेवक एस. पी. एस. ओबेरॉय यांच्या संस्थेकडे आर्थिक व प्रशासकीय मदतीची आर्त हाक मारली आहे. ‘भारतीय किसान युनियन’ देखील यासाठी प्रशासनाशी संपर्क साधून आहे. लंडन पोलीस सध्या या हत्येमागचा मुख्य हेतू काय होता, हा वर्णद्वेषी हल्ला होता की वैयक्तिक वैमनस्य, याचा कसून शोध घेत आहेत.

Web Title: Indian origin man gurbhej singh stabbed to death southall london 7 arrested

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 14, 2026 | 03:20 PM

Topics:  

  • crime news
  • Indian
  • London

संबंधित बातम्या

बारामतीत ‘बुलेट’ चोरट्यांचा धुमाकूळ, तीन बुलेट लंपास; CCTV फुटेज पोलिसांच्या हाती
1

बारामतीत ‘बुलेट’ चोरट्यांचा धुमाकूळ, तीन बुलेट लंपास; CCTV फुटेज पोलिसांच्या हाती

Shocking News: ‘त्या’ रात्री टेरेसवर गेली आणि… पुढे जे घडलं त्याने PG हॉस्टेल हादरलं; गार्डवर गंभीर आरोप!
2

Shocking News: ‘त्या’ रात्री टेरेसवर गेली आणि… पुढे जे घडलं त्याने PG हॉस्टेल हादरलं; गार्डवर गंभीर आरोप!

धक्कादायक ! पती-पत्नीमधील वाद गेला टोकाला; पत्नीची हत्या करून पती फरार
3

धक्कादायक ! पती-पत्नीमधील वाद गेला टोकाला; पत्नीची हत्या करून पती फरार

Pune Crime: पुण्यात खळबळ! भाचा गेला, सून माहेरी निघून गेली… मामाच्या मनात पेटला संताप, पुढे घडलं धक्कादायक
4

Pune Crime: पुण्यात खळबळ! भाचा गेला, सून माहेरी निघून गेली… मामाच्या मनात पेटला संताप, पुढे घडलं धक्कादायक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.