
Indian Stundents die in UK Car Crash, Essex
यामध्ये आणखीही ९ विद्यार्थी होते. हे विद्यार्थी गंभीर जखमी झाले असून सध्या त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहे. मृतांमध्ये २३ वर्षी चैतन्य तारे, आणि २१ वर्षीय ऋषितेजा रापोलू या हैद्राबादच्या विद्यार्थ्यांचा समावेश आहे. १ सप्टेंबर २०२५ रोजी ब्रिटनच्या एसेक्समध्ये ही घटना घडली.
‘मी खूप ॲक्टिव होतो’ ; डोनाल्ड ट्रम्पने सोशल मीडियावरील आजाराच्या अफवांना दिला पूर्णविराम
अपघातात चैतन्यचा जागीच मृत्यू झाला होता, तर ऋषितेजाचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेने त्यांच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. इतर जखमी विद्यार्थ्यांना रॉयल लंजन रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यामझ्ये दोन जणांची प्रकृती गंभीर आहे. साई गौतम रवुल्ला हिला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे, तर नूतन थॅटिकायाला नावाच्या विद्यार्थीनीला अर्धांगवायू झाला आहे. इतर विद्यार्थ्यांना किरकोळ जखमा झाल्या आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कार चालवणाऱ्या दोन विद्यार्थ्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. गोपीचंद बटमेकला आणि मनोहर सबानी अशी त्यांची ओळख पटवण्यात आली आहे. एसेक्सच्या पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्थानिक वेळेनुसार, १ सप्टेंबर रोजी पहाचटे ४ च्या सुमारास ही घटना घडली. घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले होते. वाहन वेगाने चालवल्याने हा अपघात घडल्याच्या संशयावरुन चालकांना अटक करण्यात आली आहे.
दरम्यान घटनेची माहिती मिळताच चैतन्य आणि ऋषितेजाचे कुटुंबीय देखील सोमवारी २ सप्टेंबर रोजी पोहोचले. दोन्ही विद्यार्थ्यांच्या कुटुंबावर शोकाकुल पसरला आहे. कुटुंबियांनी केंद्र आणि राज्य सरकारला अत्यंसंस्कारासाठी मृतदेह लवकरात लवकर भारतात आणण्याचे आवाहन केले आहे. चैतन्य ८ महिन्यांपूर्वी बी. टेक पूर्ण करुन पुढचे पदव्युत्तर शिक्षण घेण्यासाठी लंडनला गेला होता. याच वेळी नॅशनल इंडियन स्टुडंट्स अँड ॲल्युमनी युनियन युकेने या घटनेवर शोक व्यक्त केला आहे.