Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 9 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Middle East War: मध्यपूर्वेतील युद्धात भारतीय कर्मचाऱ्याचा मृत्यू, 10 सैनिकही जखमी; दूतावासाकडून शोक व्यक्त

Iran US War Indian: कुवैती वीज प्रकल्पावर झालेल्या इराणी हल्ल्यात एक भारतीय कामगार ठार झाला असून, त्यामुळे मध्य पूर्वेतील संघर्षातील भारतीय मृतांची एकूण संख्या आठ झाली आहे, ज्यामुळे भारतीय समुदायात चिंता वाढली आहे.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Mar 30, 2026 | 02:23 PM
indian worker killed kuwait power plant attack iran middle east war 2026

indian worker killed kuwait power plant attack iran middle east war 2026

Follow Us
Follow Us:
  • कुवेतमध्ये रक्ताचा सडा
  • मृतांचा आकडा वाढला
  • इराणवर गंभीर आरोप

Indian worker killed in Kuwait Iran attack : मध्य-पूर्वेतील रणांगण (US-Israel Iran War) आता केवळ दोन देशांपुरते मर्यादित राहिले नसून, पोटाची खळगी भरण्यासाठी गेलेल्या भारतीय कामगारांसाठी ते मृत्यूचा सापळा बनत चालले आहे. सोमवारी कुवेतमध्ये झालेल्या एका भीषण हल्ल्याने पुन्हा एकदा संपूर्ण देशाला हादरवून सोडले आहे. इराणने कुवेतच्या (Kuwait) ऊर्जा क्षेत्राला लक्ष्य करत केलेल्या हल्ल्यात एका भारतीय कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला असून, यामुळे कुवेत आणि इराणमधील तणाव आता टोकाला पोहोचला आहे.

पाणी आणि वीज प्रकल्पावर ‘इराणी’ निशाणा

कुवेतच्या विद्युत मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, हा हल्ला एका अत्यंत संवेदनशील वीज आणि पाणी शुद्धीकरण प्रकल्पावर करण्यात आला. इराणकडून आलेले क्षेपणास्त्र थेट प्रकल्पाच्या एका सेवा इमारतीवर आदळले. या इमारतीत काम करत असलेला एक भारतीय नागरिक जागीच ठार झाला. प्रकल्पाच्या इमारतीचे इतके मोठे नुकसान झाले आहे की, कुवेतच्या अनेक भागांतील वीज आणि पाणी पुरवठा विस्कळीत होण्याची भीती निर्माण झाली आहे. मंत्रालयाच्या प्रवक्त्या फातिमा अब्बास जवाहेर हयात यांनी या हल्ल्याला इराणचे थेट आक्रमक कृत्य म्हटले आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Ishaq Dar : पाकिस्तानात ‘पडझड’! इराण युद्धाच्या चर्चेत उपपंतप्रधानांची मोठी फजिती; रेड कार्पेटवर पसरले, VIDEO VIRAL

भारतीय दूतावास सक्रिय; कुटुंबावर कोसळला दुःखाचा डोंगर

या घटनेची माहिती मिळताच कुवेत येथील भारतीय दूतावासाने तात्काळ निवेदन जारी केले. दूतावासाने मृत भारतीय नागरिकाबद्दल तीव्र शोक व्यक्त केला असून, “आम्ही मृताच्या कुटुंबाच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत,” असे म्हटले आहे. दूतावासाचे अधिकारी सध्या कुवेती प्रशासनाच्या सतत संपर्कात असून, मृतदेह लवकरात लवकर भारतात पाठवण्यासाठी आणि पीडित कुटुंबाला नुकसानभरपाई मिळवून देण्यासाठी प्रयत्न करत आहेत. गेल्या काही दिवसांपूर्वीच अबू धाबीमध्ये अशाच एका हल्ल्यात एका भारतीयाचा मृत्यू झाला होता, त्या जखमा ताज्या असतानाच ही दुसरी घटना घडली आहे.

कुवेतचे इराणवर कडक प्रहार; १० सैनिकही जखमी

कुवेतने या हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध केला आहे. कुवेतचे परराष्ट्र मंत्री शेख जर्राह जाबेर अल-सबाह यांनी म्हटले आहे की, इराण जाणीवपूर्वक संपूर्ण प्रदेशात अस्थिरता निर्माण करत आहे. केवळ नागरिकच नाही, तर कुवेती लष्कराचे १० सैनिकही या क्षेपणास्त्र हल्ल्यांमध्ये जखमी झाले आहेत. इराण आपला राजकीय प्रभाव वाढवण्यासाठी दहशतवादाचा आणि अराजकतेचा वापर करत असल्याचा आरोप कुवेतने केला आहे. या हल्ल्यामुळे आता कुवेत देखील उघडपणे इराणविरोधी गटात सामील होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : India Nepal Border: नेपाळमध्ये सत्तांतर होताच भारतीय सीमेवर हालचालींना वेग; बालेन शाह सरकारचा मोठा ‘बॉर्डर प्लॅन’, वाचा सविस्तर

निष्कर्ष: भारतीयांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

मध्य-पूर्वेत सुरू असलेल्या या युद्धात आतापर्यंत ८ भारतीयांचा बळी गेला आहे. लाखो भारतीय आजही तिथे कामा निमित्त वास्तव्यास आहेत. इराण आणि अमेरिका-इस्रायल यांच्यातील या लढाईत निष्पाप भारतीयांचा बळी जात असल्याने भारतातही चिंतेचे वातावरण आहे. केंद्र सरकार आता या देशांमधील भारतीयांच्या सुरक्षेसाठी काय पावले उचलते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: कुवेतमध्ये झालेल्या हल्ल्यात नक्की काय घडले?

    Ans: इराणने कुवेतच्या वीज आणि पाणी प्रकल्पावर हल्ला केला, ज्यात एका भारतीय कामगाराचा मृत्यू झाला आणि इमारतीचे नुकसान झाले.

  • Que: मध्य-पूर्वेतील युद्धात आतापर्यंत किती भारतीय ठार झाले आहेत?

    Ans: सरकारी आकडेवारीनुसार, या संघर्षात आतापर्यंत एकूण ८ भारतीय नागरिक ठार झाले आहेत.

  • Que: कुवेतने इराणवर कोणते आरोप केले आहेत?

    Ans: कुवेतने इराणवर जाणीवपूर्वक दहशतवाद पसरवण्याचा आणि प्रदेशात अस्थिरता निर्माण करण्याचा गंभीर आरोप केला आहे.

Web Title: Indian worker killed kuwait power plant attack iran middle east war 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 30, 2026 | 02:23 PM

Topics:  

  • Middle East War Impact
  • US-Israel Iran War
  • World War 3

संबंधित बातम्या

Marco Rubio: ‘ट्रम्प इराणला अणुबॉम्ब बनवू देणार नाहीत’; मार्को रुबियो यांनी आखली ‘लक्ष्मणरेषा’, क्षेपणास्त्रे-ड्रोनवरही मोठे विधान
1

Marco Rubio: ‘ट्रम्प इराणला अणुबॉम्ब बनवू देणार नाहीत’; मार्को रुबियो यांनी आखली ‘लक्ष्मणरेषा’, क्षेपणास्त्रे-ड्रोनवरही मोठे विधान

World News:तेलाचा भाव १०० डॉलरपार,जगाला महागाईचा झटका; पेट्रोल-डिझेलपासून वाहतुकीपर्यंत वाढणार दबाव
2

World News:तेलाचा भाव १०० डॉलरपार,जगाला महागाईचा झटका; पेट्रोल-डिझेलपासून वाहतुकीपर्यंत वाढणार दबाव

US-Iran War: 60% संवर्धित इंधन कशासाठी? अन्यथा युद्ध सुरूच राहणार…; जेडी व्हान्स यांच्या अटींनी युद्धात शांततेच्या आशांना धक्का
3

US-Iran War: 60% संवर्धित इंधन कशासाठी? अन्यथा युद्ध सुरूच राहणार…; जेडी व्हान्स यांच्या अटींनी युद्धात शांततेच्या आशांना धक्का

War Alert : ताजिक-अफगाण सीमेवर रशियाकडून अति-आधुनिक शस्त्रास्त्रांची तैनाती; आज मॉस्कोमध्ये महत्त्वाची आंतरराष्ट्रीय बैठक
4

War Alert : ताजिक-अफगाण सीमेवर रशियाकडून अति-आधुनिक शस्त्रास्त्रांची तैनाती; आज मॉस्कोमध्ये महत्त्वाची आंतरराष्ट्रीय बैठक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.