India's action on Azerbaijan, a friend of Pakistan.
बाकू: भारत आणि पाकिस्तानमध्ये गेल्या काही आठवड्यांपासून तणावाचे वातावरण आहे. भारताने ऑपरेशन सिंदूर मोहीम राबवत पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमध्ये दहशतवाद्यांविरोधात कारवाई केली. या कारवाईने पाकिस्तान संतप्त झाला होता. दरम्यान या काळात चीन, तुर्की आणि अझरबैजान वगळता इतर देशांना पाकिस्तानला पाठिंबा दिला होता. दरम्यान भारताने आता पाकिस्तानला मदत करणाऱ्यांविरोधातही कारवाई सुरु केली आहे. भारताने अझरबैजानविरोधात मोठी कारवाई केली आहे.
भारताने तुर्काच्या ग्राऊंड हॅंडलिंग कंपनी सेलेबीसोबतचा करार रद्द केला आहे. तसेच अझबैजानलाही मोठा झटका देण्याची तयारी भारताने केली आहे. भारत सरकाने पाकिस्तानच्या बाजूने उभ्या राहिलेल्या देशांना कड इशार दिला आहे. भारताने अझरबैजावनच्या शत्रू देश आर्मोनियाला शस्त्र विकण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे अझबैजानची चिंता वाढली आहे.
भारत आणि पाकिस्तानच्या तणावादरम्यान तुर्की आणि अझरबैजानने पाकिस्तानला उघडपणे पाठिंबा दर्शवला होता. यामुळे भारताने दोन्ही देशांविरोधात कडक कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार भारताने अझरबैजानचा शत्रू आर्मेनियाला ७२० दशलक्ष डॉलर्सची शस्त्रे विकण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये आकाश-१एस हवाई संरक्षण प्रणालीच्या १५ युनिट्सचा समावेश आहे. हा अझरबैजानसाठी मोठा धोका आहे. आर्मिनिया अझरबैजानचा मोठा शत्रू आहे.
तसेच भारत अझरबैजानसोबत व्यापार संबंधही कमी करण्याची शक्यता आहे. भारत अझरबैजानमधून सर्वाधिक कच्चे तेल आयात करतो. अझरबैजानच्या ९८% निर्यातीपेक्षा जास्त भारता निर्यात केले जाते. परंतु भारताने अझरबैजानकडून तेल खरेदी करणे बंद केल्यास अझरबैजानच्या अर्थव्यवस्थेला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. यामुळे भारताला मोठे नुकसान होणार नाही.
भारत आणि अझरबैजानमधील व्यापर थांबला तर याचा परिणाम भारतीय बाजापेठांवर दिसीन येईल. भारत झरबैजानमधून सेंद्रिय रसायने, तेले, परफ्यूम, चामडे आणि कच्चे कातडे देखील आयात करतो. या वस्तूंचा पुरवठा कमी झाल्यास किंमतींमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. तसेच अझरबैजाने भारतातून कॉफी, धान्य आणि प्लॅस्टिक उत्पादनांची आयात करतो. यांच्या किंमतींवरही परिणाम होण्याची शक्यता आहे.
भारत आणि अझरबैजानच्या तणावाचा परिणाम पर्यटनावरीह होण्याची शक्यता आहे. अझरबैजानला दरवर्षी हजारो भारतीय सुट्ट्यांच्या काळात भेट देतात. परंतु सध्याची भारत आणि पाकिस्तानच्या तणावादरम्या अझरबैजानच्या पाकला खुल्या पाठिंब्याने अनेक भारतीय पर्यटकांनी तिकीटे रद्द केली आहेत. यामुळे अझरबैजानच्या पर्यटनाला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. पाकिस्तानला पाठिंबा देणे अझरबैजानला महागात पडणार आहे.