Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 12 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पाकिस्तानसह ‘या’ सहा देशांना मोठा झटका! ब्रिटनमध्ये व्हिसा बंदीची तयारी; लाखो लोकांना हद्दपारही करणार?

UK Immigration Policy : ब्रिटनच्या रिफॉर्म पार्टीने एक मोठी घोषणा केली आहे. पाकिस्तानसह ६ मुस्लिम देशांच्या व्हिसावर बंदी घालण्याचा निर्णय पक्षाने घेतला आहे. या देशांच्या नागरिकांना ब्रिटनमधून हद्दपारही केले जाणार आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Feb 24, 2026 | 11:02 AM
Reform UK Visa Ban announcement

Reform UK Visa Ban announcement

Follow Us
Follow Us:
  • ब्रिटनच्या युके रिफॉर्म पार्टीची मोठी घोषणा
  • पाकिस्तानसह सहा देशांच्या व्हिसावर बंदी घालणार
  • मास डिपोर्टेशनही होणार?
UK Visa Ban Proposal : लंडन : एक मोठे खळबळजनक वृत्त मिळाले आहे. येत्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ब्रिटनच्या रिफॉर्म युके पक्षाने मोठी घोषणा केली आहे. पक्षाने सत्तेत आल्यानंतर देशातील बेकायदेशीर स्थलांतर रोखण्यासाठी कठोर उपाययोजनांचे आश्वासन दिले आहे. ब्रिटनची सीमा सुरक्षा मजबूत करणे आणि अवैध स्थलांतरितांना हद्दपार करणे याचा उद्देश असणार आहे.

UK ने स्टडी व्हिसा नियमांमध्ये केले ‘हे’ मोठे बदल; भारतीय विद्यार्थ्यांना फायदा होणार की नुकसान?

अमेरिकेच्या प्रणालीवर आधारित नवीन संस्थेचा स्थापना

रिफॉर्म युके पक्षाने ब्रिटनमध्ये अमेरिकन एजन्सी ICE वर आधारित युके डिपोर्टेशन कमांड नावाची संस्था स्थापन करण्याचा प्रस्ताव मांडला आहे. या संस्थेअंतर्गत दरवर्षी सुमारे २,८८,००० बेकायदेशीर स्थलांतरितांना त्यांच्या मायदेशात पत पाठवण्यात येणार आहे.

पाकिस्तानसह सहा देशांवर व्हिसा बंदीचा प्रस्ताव

रिफॉर्म युकेने पक्षाने पाकिस्तानसह काही देशांवर व्हिसा बंदीचाही प्रस्तावर मांडला आहे. यामध्ये पाकिस्तान, समोलिया, इरीट्रिया, अफगाणिस्तान, सीरिया आणि सूडान या देशाचा समावेश आहे. या देशांमधून ब्रिटनमध्ये अनेक बेकायदेशीर स्थलांतरित प्रवेश करतात असे पक्षाने म्हटले आहे. यामुळे या देशांच्या व्हिसावर निर्बंध लादण्याचा प्रस्तावर पक्षाने मांडला आहे.

मोठा आर्थिक खर्च

याशिवाय पक्षाने या योजनेसाठी दरवर्षी सुमारे दोन अब्ज पाऊंड खर्च अपेक्षित असल्याचे म्हटले आहे. रिफॉर्म युकेच्या म्हणण्यांनुसार, स्थलांतरितांच्या निवास आणि कल्याण योजनांमधील निधी कपात करुन ही योजना राबवली जाईल. विशेष विमानांनी दररोज डिपोर्टेशन केले जाईल असे पक्षाने म्हटले आहे.

मानवाधिकार कायद्यांमध्ये बदल

याशिवाय रिफॉर्म युके पक्षाने ब्रिटनला European Convention on Human Rights (ECHR) प्रस्तावातून बाहेर काढण्याचे देखील म्हटले आहे. पक्षाच्या मते ब्रिटनमधील सध्याच्या मानवाधिकार कायदे राष्ट्रीय सुरक्षा नियंत्रणात अडथळा ठरत आहेत. यामुळे बेकायदेशीर स्थलांतरांचे सामूहिक निर्वासन कायदा आमंलात आणण्याची योजना आहे. यामुळे राष्ट्रीय सीमा सुरक्षेतील अडथळे दूर होती असा पक्षाचा विश्वास आहे.

देशांतर्गत टिका

सध्या रिफॉर्म युके पक्षाच्या या प्रस्तावर विरोधी पक्षांकडून तीव्र टीका केली जात आहे. रिफॉर्म युकेचे हे धोरण समाजात फूट पाडणारे असल्याचे विरोधकांनी म्हटले आहे. सध्या या प्रस्तावरुन ब्रिटनच्या राजकारणात मोठा वाद रंगला आहे.

ब्रिटनमध्ये शिक्षण महागणार, प्रवास खर्चही वाढणार; सरकारने व्हिसा शुल्कात केली वाढ

💡

Frequently Asked Questions

  • Que: रिफॉर्म युके पक्षाने कोणती घोषणा केली आहे?

    Ans: रिफॉर्म युके पक्षाने सत्तेत आल्यानंतर कडक इमिग्रेशन धोरण राबवणार असल्याचे म्हटले आहे. पक्षाने देशातील बेकायदेशीर स्थलांतराला आळा घालण्यासाठी मोठ्या प्रमाणावर डिपोर्टेशनची योजना राबवणार आणि काही देशांवर व्हिसा बंदी घालण्याचे म्हटले आहे.

  • Que: कोणत्या देशांवर व्हिसा बंदी घालण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे?

    Ans: रिफॉर्म युके पक्षाच्या प्रस्तावानुसार, पाकिस्तान, समोलिया, इरीट्रिया, अफगाणिस्तान, सीरिया आणि सूडान या देशांच्या नागरिकांवर व्हिसा निर्बंध लागू करण्याचा प्रस्ताव मांडला आहे.

Web Title: Reform uk visa ban announcement promises to removal of illegal immigrant

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 24, 2026 | 11:02 AM

Topics:  

  • britain
  • Illegal immigration
  • Visa Rule
  • World news

संबंधित बातम्या

Colombia Earthquake : कोलंबियाला 7.4 तीव्रतेच्या भूकंपाचा तडाखा; 160 हून अधिक जणांचा मृत्यू, हजारो बेपत्ता
1

Colombia Earthquake : कोलंबियाला 7.4 तीव्रतेच्या भूकंपाचा तडाखा; 160 हून अधिक जणांचा मृत्यू, हजारो बेपत्ता

Ebola Virus: खतरनाक! ४,३८१ रुग्ण, २,०११ मृत्यू…; काँगोमध्ये इबोलाचा विक्रमी वेगाने फैलाव, आरोग्य यंत्रणेसमोर मोठे आव्हान
2

Ebola Virus: खतरनाक! ४,३८१ रुग्ण, २,०११ मृत्यू…; काँगोमध्ये इबोलाचा विक्रमी वेगाने फैलाव, आरोग्य यंत्रणेसमोर मोठे आव्हान

Netanyahu Vs Trump: इस्रायलचा युद्धाबाबत कठोर पवित्रा! गाझा करारावरून Israel-US आमनेसामने; नेतान्याहूंच्या एका निर्णयाने खळबळ
3

Netanyahu Vs Trump: इस्रायलचा युद्धाबाबत कठोर पवित्रा! गाझा करारावरून Israel-US आमनेसामने; नेतान्याहूंच्या एका निर्णयाने खळबळ

Mecca Pact :एकाच वेळी सहा-बाजूंनी ‘युद्धात’ अडकला आहे पाकिस्तान; करारानंतरही सौदीचा पैसा अन् तुर्कीची लष्करी मदतही ठरणार निष्फळ
4

Mecca Pact :एकाच वेळी सहा-बाजूंनी ‘युद्धात’ अडकला आहे पाकिस्तान; करारानंतरही सौदीचा पैसा अन् तुर्कीची लष्करी मदतही ठरणार निष्फळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.