Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bihar Assembly Election Result |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

अमेरिकेचे दावे ठरले फोल; भारताच्या IACCS ने ‘F-35’ स्टेल्थ लढाऊ विमान पकडले अन् जग झाले थक्क

UK F‑35B emergency landing India : अमेरिकेने ज्याला अदृश्य, ‘स्टेल्थ’ तंत्रज्ञानाचा शिखर मानले, त्या इंग्लंडच्या F-35B लाइटनिंग-II लढाऊ विमानाला भारताच्या IACCS प्रणालीने सहजपणे शोधून काढले.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Jun 16, 2025 | 04:09 PM
India's IACCS discovers England's F-35B stealth aircraft US claims are in shock

India's IACCS discovers England's F-35B stealth aircraft US claims are in shock

Follow Us
Close
Follow Us:

UK F‑35B emergency landing India : अमेरिकेने ज्याला अदृश्य, ‘स्टेल्थ’ तंत्रज्ञानाचा शिखर मानले, त्या इंग्लंडच्या F-35B लाइटनिंग-II लढाऊ विमानाला भारताच्या IACCS प्रणालीने सहजपणे शोधून काढले, ओळखले आणि त्यावर त्वरित कारवाई केली. ही घटना त्रिवेंद्रम (केरळ) येथे इमर्जन्सी लँडिंगच्या वेळी घडली असून, जगभरात संरक्षण क्षेत्रात एकच खळबळ माजली आहे.

या घटनेनंतर अमेरिकेच्या आणि इंग्लंडच्या ‘स्टेल्थ’ तंत्रज्ञानावरील दाव्यांवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. कारण हे विमान पाचव्या पिढीतील, रडारला टाळणारे आणि शत्रूच्या नजरेपासून लपणारे म्हणून जगभरात प्रसिद्ध आहे. मात्र भारताने दाखवून दिले की आपली हवाई संरक्षण प्रणाली आता त्या पातळीवर पोहोचली आहे जिथे अशा अदृश्य लढाऊ विमानांनाही टिपता येते.

घटना नेमकी काय घडली?

शनिवारी रात्री उशिरा, इंग्लंडच्या रॉयल नेव्हीच्या HMS वेल्स विमानवाहू जहाजावरून उड्डाण केलेले F-35B लढाऊ विमान एकाएकी अरबी समुद्रातून वळले आणि भारतीय हवाई क्षेत्राच्या दिशेने आले. हे घडताच भारतीय वायुदलाच्या IACCS प्रणालीने विमानाला टिपले आणि त्याची ओळख पटवली.

IACCS म्हणजेच इंटिग्रेटेड एअर कमांड अँड कंट्रोल सिस्टम ही प्रणाली भारतीय हवाई क्षेत्रात येणाऱ्या कोणत्याही वस्तूचे निरीक्षण करते, त्याची ओळख पटवते आणि आवश्यक ते संरक्षणात्मक उपाय करते. या प्रणालीच्या मदतीने सुखोई-30MKI लढाऊ विमान तात्काळ उड्डाणासाठी रवाना करण्यात आले. F-35B च्या पायलटनं इमर्जन्सी लँडिंगचे कारण स्पष्ट केल्यावर त्याला त्रिवेंद्रम विमानतळावर उतरू दिलं गेलं. सध्या त्याच्या तांत्रिक मदतीसाठी भारतीय पथक कार्यरत आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :  Israel Iran War : इस्रायलवर हल्ला करण्यापूर्वी फातिमा झहराने काय घोषणा दिल्या? इराणी सैनिकांचा VIDEO VIRAL

F-35B स्टेल्थ तंत्रज्ञान खरोखरच अदृश्य?

F-35B हे अमेरिका आणि इंग्लंडकडून विकसित करण्यात आलेलं स्टेल्थ फाईटर आहे. याचं रडार क्रॉस सेक्शन इतकं कमी आहे की, रडारवर हे विमान सापडतच नाही असा दावा केला जातो. यासाठी याचं इंजिन, टर्बाइन मास्क केलं जातं आणि क्षेपणास्त्रं व शस्त्रसाठा आतल्या भागात ठेवले जातात. पण भारताच्या IACCS प्रणालीने या तंत्रज्ञानाचा भेद केला, जे जगासाठी मोठं आश्चर्य ठरलं आहे. यापूर्वी ऑपरेशन सिंदूर दरम्यानही IACCS ने पाकिस्तानच्या हवाई हल्ल्यांचा यशस्वी मुकाबला केला होता.

फ्रान्सचे राफेल अधिक प्रगत असल्याचे वक्तव्य आणि भारताचा अभिमान

केवळ दोन दिवसांपूर्वी डसॉल्ट कंपनीचे सीईओ एरिक ट्रॅपियर यांनी फ्रेंच राफेल लढाऊ विमान F-35 पेक्षा अधिक सक्षम आणि प्रभावी असल्याचे सांगितले होते. यावर भारतातील तज्ज्ञांनी भाष्य करताना म्हटलं आहे की, भारतीय तंत्रज्ञानाने आता F-35 सारख्या स्टेल्थ विमानाला सुद्धा ओळखून दाखवलं आहे, ही गोष्ट भारताच्या हवाई संरक्षण प्रणालीसाठी ऐतिहासिक आहे.

आंतरराष्ट्रीय राजकीय संदर्भ आणि सुरक्षा संकेत

F-35B ही घटना फक्त तांत्रिक बाब नसून जिओपॉलिटिकल दृष्टिकोनातूनही अत्यंत महत्त्वाची आहे. यामुळे भारताची जागतिक संरक्षण क्षमतेतील भूमिका अधिक ठळक झाली आहे. अमेरिका आणि इंग्लंड जे तंत्रज्ञान गुप्त ठेवण्याचा प्रयत्न करतात, ते भारताच्या तंत्रज्ञानाने उघड करून दाखवलं आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Israel Iran War : महायुद्ध अटळ! ‘इराणने इस्रायलसाठी नरकाचे दरवाजे उघडले’; प्रचंड क्षेपणास्त्र हल्ल्याने तणाव शिगेला

भारताची IACCS प्रणाली – नव्या संरक्षण युगाची सुरुवात

भारतीय वायुदलाची IACCS प्रणाली आता केवळ स्टँडर्ड रडार ट्रॅकिंगपुरती मर्यादित राहिलेली नाही. ती स्टेल्थ लढाऊ विमानांना शोधून काढू शकते, त्यांची ओळख पटवू शकते, आणि आवश्यक त्या क्षणी मजबूत प्रतिसाद देऊ शकते. ही घटना केवळ तांत्रिक कौशल्याचा पुरावा नाही, तर भारताच्या संरक्षण स्वावलंबनाची आणि जागतिक पातळीवरील प्रगतीची स्पष्ट साक्ष आहे. F-35B चा भारतात लँडिंग ही बाब जगाच्या संरक्षण व्यूहनीतीला नव्या दृष्टिकोनातून पाहण्यास भाग पाडणार आहे.

Web Title: Indias iaccs discovers englands f 35b stealth aircraft us claims are in shock

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 16, 2025 | 04:05 PM

Topics:  

  • Iran Israel Conflict
  • Israel Iran war

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.