Iran launches missiles on Tel Aviv : इस्रायलच्या अणुविरोधी कारवाईनंतर इराणने इस्रायलवर जोरदार प्रत्युत्तरात्मक बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांचा मारा करून जगाला हादरवून सोडले आहे. इराणने एकाचवेळी २०० हून अधिक क्षेपणास्त्रे आणि ड्रोन डागले असून, यामध्ये १५० पेक्षा अधिक मध्यम पल्ल्याची बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे होती. त्यातील काही क्षेपणास्त्रे इस्रायलच्या अत्याधुनिक संरक्षण यंत्रणेला भेदून गेली असून, देशांतर्गत मोठा विनाश झाला आहे. इराणने अनेक वर्षांपासून विकसित केलेल्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्र क्षमतेचा हा परिणाम असून, इस्रायलसाठी हे युद्ध ‘नरकाचे दरवाजे’ उघडणारे ठरत आहे.
इराणने आपल्या लष्करी सामर्थ्याचा सर्वात महत्त्वाचा आधार असलेल्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्र कार्यक्रमावर गेल्या ३० वर्षांत विशेष भर दिला आहे. फतेह-११०, झुल्फिकार, शहाब-३, खोरमशहर यांसारख्या क्षेपणास्त्रांद्वारे इराण आता इस्रायलवर उच्च-परिशुद्धतेने आघात करू शकतो. इस्रायली सैन्याने यातील बहुतेक क्षेपणास्त्रे पाडली असली, तरी ५ ते ७ क्षेपणास्त्रे संरक्षण रेषा ओलांडून देशात घुसली आणि मोठ्या प्रमाणावर हानी केली.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Shehbaz Sharif Wives: ‘मॉडेल ते लेखक…’ पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांचे लग्न का बनले आहेत चर्चेचा विषय?
इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड्स कॉर्प्सने (IRGC) खुलासा केला आहे की, इस्रायलवर १००० क्षेपणास्त्रे डागण्याची त्यांच्या कडे तयारी होती, पण इस्रायली हल्ल्यामुळे त्यात अडथळा आला. या खुलाशामुळे इराणच्या क्षेपणास्त्र क्षमतेचा खतरनाक स्तर अधोरेखित होतो. संरक्षण तज्ज्ञांच्या मते, जगात कोणतीही हवाई संरक्षण यंत्रणा एका वेळी १००० क्षेपणास्त्रांचा सामना करू शकत नाही.
इराणने गेल्या काही वर्षांत शेकडो कमी, मध्यम व लांब पल्ल्याची बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे साठवली आहेत. त्यांच्या क्षेपणास्त्रांमध्ये आता फक्त पारंपरिकच नव्हे तर अण्वस्त्र नेण्याची क्षमता असलेल्या ICBM (इंटरकॉन्टिनेंटल बॅलिस्टिक मिसाईल्स) चा देखील समावेश आहे. अमेरिकेच्या गुप्तचर अहवालानुसार, इराणकडे सुमारे ३००० क्षेपणास्त्रे आहेत आणि त्यांचा क्षेपणास्त्र साठा मध्यपूर्वेतील सर्वात मोठा आहे.
इस्रायलच्या आयर्न डोम, डेव्हिड स्लिंग, अॅरो-२, अॅरो-३ व पॅट्रियट संरक्षण यंत्रणेमुळे मोठे नुकसान टळले असले तरी, काही क्षेपणास्त्र यशस्वीपणे घुसल्याने त्यांचे अपरिहार्य परिणाम दिसून येत आहेत. इस्रायलने जरी इराणचा अणुप्रकल्प वर्षभर मागे फेकण्याची क्षमता सिद्ध केली, तरी इराणने इस्रायलला मोठ्या प्रमाणावर आर्थिक, सामाजिक व मनोवैज्ञानिक नुकसान पोहोचवले आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Israel Iran War : इराणचे सर्वोच्च नेते खामेनेईंनी कुटुंबासह सोडले घर; वाचा नेमकं कारण काय?
संरक्षण विश्लेषकांच्या मते, हे युद्ध अल्पकालीन न राहता दीर्घकाळ चालू शकते. इस्रायलकडे तांत्रिक व सामरिक प्रावीण्य आहे, पण इराणची क्षेपणास्त्र शक्ती आणि आत्मघातकी जिद्द ही चिंता वाढवणारी बाब आहे. तज्ज्ञांच्या मते, शेवटी अमेरिका या युद्धात उडी घेण्यास भाग पडेल. दुसरीकडे, इराणच्या आताच्या नेतृत्वावर संभाव्य हल्ला होऊन सत्तांतराचा मार्गही मोकळा होऊ शकतो. हे युद्ध केवळ दोन देशांपुरते न राहता संपूर्ण मध्यपूर्वेत भडका उडवण्याची शक्यता निर्माण झाली आहे.