Indiscriminate shooting in Bangkok killed six
बॅंकॉक : कंबोडिया-थायलडंमध्ये सुरु असलेल्या सीमेवरील संघर्षादरम्यान एक मोठी बातमी समोरी आली आहे. थायलंडची राजधानी बॅंकॉकमध्ये भीषण गोळीबाराची घटना घडली आहे. यामध्ये किमान सहा जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. बॅंकॉकच्या ऑर टोर कोर मार्केटमध्ये ही घटना घडली आहे. या घटनेने परिसरात भीती निर्माण झाली आहे. बॅंकॉकचे हे मार्केट सतत पर्यटक आणि स्थानिकांनी गजबजलेले असते. यामुळे परिसरात मोठा गोंधळ उडाला आहे.
बॅंकॉकच्या इमरजन्सी मेडिकल सेंटरने या घटनेची माहिती दिली आहे. सेंटरने दिलेल्या माहितीनुसार, समोवरी २८ जुलै रोजी ही घटना घडली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृतांमध्ये चार सुरक्षा रक्षक आणि एका महिलेचा समावेश आहे. धक्कादायक बाब म्हणजे गोळीबारानंतर हल्लेखोराने स्वत:लाही गोळी झाडली आहे.
सध्या या घटनेचा तपास सुरु आहे. हल्लेखोराची ओळख पटवण्याचे कार्य सुरु करण्यात आले आहे. तसेच हल्लेखोराने स्वताला संपवले असल्याने हल्ल्यामागचे कारणही सध्या अस्पष्ट आहे. या घटनेकडे सामूहिक गोळीबार म्हणून पाहिले जात आहे. बॅंक सुए जिल्ह्याचे उपलपोलिसाध्यक्ष व्होरापत सुकथाई यांनी या घटनेमागील कारणांचा शोधाचे काम सुरु असल्याचे म्हटले आहे.
थायलंडमध्ये गोळीबाराच्या घटना काही नवीन नाहीत. यापूर्वी देखील अशा अनेक घटना घडल्या आहेत. थायलंडमध्ये बंदुका खरेदी-विक्री करणे अत्यंत सोपे आहे. सीमावर्ती भागातील लढाईमुळे येथे कोणतेही नियंत्रित कायदे नाहीत. यामुळे गेल्या अनेक काळांपासून अशा घटना सतत घडत आहे. सध्या नुकत्याच घडलेल्या घटनेचा तपास सुरु आहे. मृतहेद शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहे. संबंधित घटनेवर सर्व पैलूंची तपासणी केली जात आहे.
थायलंड आणि कंबोडियातील वादाशी संबंध असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. मात्र अद्याप यावर कोणताही ठोस पुरवठा मिळालेला नाही. सध्या या प्रकरणाची चौकशी सुरु आहे. थायलंड आणि कंबोडियातील सीमा वाद अनेक दशकापासून सुरु आहे. प्रेह विहार या हिंदू मंदिरावरुन हा वाद सुरु आहे. १९६२ मध्ये आंतरराष्ट्रीय न्यायालयाने हे मंदिर कंबोडियाचे असल्याचा निकाल दिला होता. परंतु थायलंडने याचा काही भागा त्यांचा प्रदेशात असल्याचा दावा केला आहे. यावरुन या भागामध्ये दोन्ही देशांच्या सैन्य अनेक वेळा आमनेसामने आले आहेत.