Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 7 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Indonesia Volcano Update : ज्वालामुखीचा तांडव! आकाशात ५० हजार फूट राख; हजारो विमानं जमिनीवर

Indonesia Volcano Update : इंडोनेशियातील अनाक क्राकाटोआ ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे राखेचे ढग ५० हजार फूट उंचीपर्यंत पोहोचले आहेत. यामुळे हजारो उड्डाणांवर परिणाम झाला असून अनेक विमानतळांवरील सेवा विस्कळीत झाली आहे. प्रशासनाकडून विमानसेवा आणि नागरिकांच्या सुरक्षेसाठी खबरदारी घेतली जात आहे.

  • By Chaitanya Pisal
Updated On: Sep 07, 2026 | 09:52 PM
फोटो सौजन्य AI

फोटो सौजन्य AI

Follow Us
Follow Us:
  • क्राकाटोआचा भयंकर उद्रेक
  • हजारो उड्डाणांवर परिणाम
  • नागरिकांनाही सतर्कतेचा इशारा
Indonesia Volcano Update : इंडोनेशियातील अनाक क्राकाटोआ ज्वालामुखीने पुन्हा एकदा रौद्ररूप धारण केले आहे. ज्वालामुखीतून बाहेर पडणारी राख तब्बल ५० हजार फूट उंचीपर्यंत पोहोचल्याने हवाई वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे. राखेचे ढग हवेत पसरल्यामुळे इंडोनेशियातीलअनेक विमानतळांवरील सेवा विस्कळीत झाली असून हजारो प्रवाशांना विमानतळांवर अडकून पडावे लागले आहे. परिस्थिती लक्षात घेता प्रशासनाने विमान कंपन्यांना विशेष खबरदारी घेण्याच्या सूचना दिल्या आहेत.

क्राकाटोआचा भयंकर उद्रेक

अनाक क्राकाटोआ ज्वालामुखीतून अचानक मोठ्या प्रमाणात राख आणि धुराचे लोट बाहेर पडू लागले. काही वेळातच राखेचा प्रचंड ढग आकाशात पसरला. हा ढग तब्बल ५० हजार फूट उंचीपर्यंत गेल्याने विमानांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

ज्वालामुखीची राख विमानांच्या इंजिनमध्ये गेल्यास इंजिनच्या कार्यक्षमतेवर गंभीर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे विमान कंपन्यांनी अनेक मार्गांवरील उड्डाणे रद्द केली किंवा पर्यायी मार्गाने वळवली आहेत.

Indus River Project : लडाखमध्ये सिंधू नदीवर भारताचा पहिला रॉक चेक डॅम; ४ कोटी लिटर पाणी साठवणार

हजारो उड्डाणांवर परिणाम

ज्वालामुखीच्या राखेमुळे इंडोनेशियातील अनेक विमानतळांवरील हवाई सेवा विस्कळीत झाली आहे. जकार्तासह विविध भागांमध्ये प्रवाशांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. अनेक उड्डाणे रद्द झाल्याने प्रवाशांना तासन्तास विमानतळावर प्रतीक्षा करावी लागत आहे.

काही विमान कंपन्यांनी प्रवाशांसाठी पर्यायी उड्डाणांची व्यवस्था करण्यास सुरुवात केली आहे. मात्र राखेचे ढग आणि वाऱ्याची दिशा यावर परिस्थिती मोठ्या प्रमाणात अवलंबून असल्याने हवाई सेवा पूर्णपणे सुरळीत होण्यासाठी वेळ लागू शकतो.

Gaza Crisis : गाझातील पॅलेस्टिनींना बाहेर काढण्याच्या योजनेवरून वाद

नागरिकांनाही सतर्कतेचा इशारा

ज्वालामुखीतून बाहेर पडणाऱ्या राखेचा परिणाम केवळ विमानसेवेवरच नाही, तर स्थानिक नागरिकांच्या आरोग्यावरही होऊ शकतो. काही भागांमध्ये हवेची गुणवत्ता खालावल्याने नागरिकांना घराबाहेर पडताना मास्क वापरण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

अनाक क्राकाटोआ हा इंडोनेशियातील सक्रिय ज्वालामुखी आहे. २०१८ मध्ये याच ज्वालामुखीच्या उद्रेकानंतर आलेल्या त्सुनामीने मोठी जीवितहानी केली होती. त्यामुळे सध्याच्या उद्रेकाकडे प्रशासन आणि स्थानिक नागरिक अत्यंत गांभीर्याने पाहत आहेत. ज्वालामुखीच्या हालचालींवर सातत्याने लक्ष ठेवले जात असून परिस्थितीनुसार पुढील निर्णय घेतले जात आहेत.

 

Web Title: Indonesia volcano volcanic fury ash reaches 50000 feet thousands of flights grounded

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 07, 2026 | 09:52 PM

Topics:  

  • airport
  • Flights
  • Indonesia

संबंधित बातम्या

Indonesia: इंडोनेशियात अनाक क्राकाटोआ ज्वालामुखीचा उद्रेक! 50 हजार फुटांपर्यंत राखेचे लोट; 209 उड्डाणे रद्द, 22 हजार प्रवासी अडकले
1

Indonesia: इंडोनेशियात अनाक क्राकाटोआ ज्वालामुखीचा उद्रेक! 50 हजार फुटांपर्यंत राखेचे लोट; 209 उड्डाणे रद्द, 22 हजार प्रवासी अडकले

IndiGo Flight Accident: मोठा अनर्थ टळला! प्रवासी विमानात असतानाच खांबाला धडकली इंडिगो फ्लाइट; पुढील भागाचे नुकसान
2

IndiGo Flight Accident: मोठा अनर्थ टळला! प्रवासी विमानात असतानाच खांबाला धडकली इंडिगो फ्लाइट; पुढील भागाचे नुकसान

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.