Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 18 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Amravati News: अमरावती-पुणे विमानसेवेचा मार्ग मोकळा! इंदूर सेवेसाठीही हालचाली; बेलोरा विमानतळाकडून अपेक्षा वाढल्या

Amravati News: अमरावती-बेलोरा विमानतळावरून इंदूरसाठी विमानसेवा सुरू करण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीने (एमएडीसी) पुढाकार घेतला आहे.लोरा विमानतळावरून मुंबई-अमरावती-मुंबई विमानसेवा आठवड्यातून चार दिवस सुरू आहे. पुणे, दिल्ली आणि इंदूरसाठीही नियमित विमानसेवा सुरू करण्याची प्रवाशांची मागणी आहे.

  • By सुरुची कदम
Updated On: Oct 18, 2026 | 11:45 AM
अमरावती-पुणे विमानसेवेचा मार्ग मोकळा! इंदूर सेवेसाठीही हालचाली; बेलोरा विमानतळाकडून अपेक्षा वाढल्या

अमरावती-पुणे विमानसेवेचा मार्ग मोकळा! इंदूर सेवेसाठीही हालचाली; बेलोरा विमानतळाकडून अपेक्षा वाढल्या

Follow Us
Follow Us:

Amravati News: अमरावतीकरांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. अमरावती-पुणे विमानसेवेच्या आशा पुन्हा उंचावल्या आहेत. सुधारित ‘उडान’ योजनेत या हवाई मार्गाचा समावेश करण्यात आल्याची माहिती प्रसिद्धी पत्रकात देण्यात आली आहे. राज्यसभा खा। डॉ. अनिल बोंडे यांनी या सेवेसाठी सातत्याने पाठपुरावा केल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, अमरावतीच्या विमानतळावरून इंदूरसाठीही विमानसेवा सुरू करण्याच्या हालचाली सुरू झाल्याने पश्चिम विदर्भाच्या हवाई संपर्काबाबत अपेक्षा वाढल्या आहेत. थेट विमानसेवा सुरू झाल्यास शिक्षण, व्यापार, पर्यटन आणि उद्योगाला चालना मिळण्यासोबतच पश्चिम विदर्भाच्या विकासालाही नवी दिशा मिळू शकते.

Amravati News: मेळघाटातील रस्त्यांचा प्रश्न ऐरणीवर! समस्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आदिवासी बांधव रस्त्यावर

पुणे प्रवास होणार अधिक सोयीचा:

पुणे हे शिक्षण, माहिती तंत्रज्ञान, उद्योग आणि व्यापाराचे महत्त्वाचे केंद्र आहे. अमरावतीसह पश्चिम विदर्भातील विद्यार्थी, व्यावसायिक, उद्योजक आणि नोकरदारांना विविध कामांसाठी पुण्याला जावे लागते. सध्या रेल्वे आणि खासगी बसगाड्यांवर अवलंबून राहावे लागते. सणासुदीच्या काळात गर्दीमुळे प्रवाशांची गैरसोय होते.थेट विमानसेवा सुरू झाल्यास प्रवासाचा वेळ वाचून नागरिकांना जलद आणि सोयीस्कर पर्याय उपलब्ध होऊ शकतो.

इंदूर सेवेसाठी तीन कंपन्यांशी पत्रव्यवहार

अमरावती-बेलोरा विमानतळावरून इंदूरसाठी विमानसेवा सुरू करण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीने (एमएडीसी) पुढाकार घेतला आहे. कंपनीचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक दीपक कपूर यांनी समाजमाध्यमाद्वारे दिलेल्या माहितीनुसार, इंडिगो, स्टार एअर आणि फ्लाय ९१ या तीन विमान कंपन्यांशी पत्रव्यवहार करण्यात आला आहे. मात्र, इंदूर विमानसेवा नेमकी कधी सुरू होणार, याची अधिकृत तारीख अद्याप जाहीर झालेली नाही.

आता अधिकृत घोषणेची प्रतीक्षा

सध्या बेलोरा विमानतळावरून मुंबई-अमरावती-मुंबई विमानसेवा आठवड्यातून चार दिवस सुरू आहे. पुणे, दिल्ली आणि इंदूरसाठीही नियमित विमानसेवा सुरू करण्याची प्रवाशांची मागणी आहे. अमरावती-पुणे मार्गाचा सुधारित ‘उडान’ योजनेत समावेश झाल्याची माहिती समोर आली असली, तरी प्रत्यक्ष सेवा सुरू होण्याची तारीख, विमान कंपनी, वेळापत्रक आणि तिकीटदर यांची अधिकृत घोषणा अद्याप अपेक्षित आहे. त्यामुळे हवाई संपर्क विस्ताराच्या पुढील निर्णयांकडे अमरावतीकरांचे लक्ष लागले आहे.

Melghat News : पक्क्या रस्त्यांसाठी आदिवासी बांधवांचा अमरावतीत मोर्चा; प्रशासनाला आंदोलनाचा इशारा

व्यापार, उद्योगासह उद्योजकांना मिळणार बळ

इंदूर हे मध्य भारतातील महत्त्वाचे व्यापारी केंद्र आहे. अमरावतीतील अनेक व्यापारी आणि उद्योजकांना इंदूरला ये-जा करावी लागते. सध्या रस्तेमार्गाचा वापर करावा लागतो, तर रेल्वेने प्रवास करताना मोठा फेरा पडतो. थेट विमानसेवा सुरू झाल्यास व्यापारी, उद्योजक आणि पर्यटकांचा वेळ वाचण्यासोबतच दोन्ही शहरांतील आर्थिक संबंध अधिक दृढ होण्यास मदत होऊ शकते.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

💡

Frequently Asked Questions

  • Que: अमरावती-पुणे विमानसेवा सुरू होण्याबाबत काय अपडेट आहे?

    Ans: अमरावती आणि पुणे यांच्यातील विमानसेवेचा मार्ग मोकळा होण्याबाबत हालचाली सुरू असल्याचे वृत्त आहे. मात्र, प्रत्यक्ष सेवा सुरू होण्याची तारीख आणि वेळापत्रक याबाबत अधिकृत घोषणेची खात्री करणे आवश्यक आहे.

  • Que: अमरावती-पुणे विमानसेवा कुठून सुरू होणार आहे?

    Ans: ही विमानसेवा अमरावतीतील बेलोरा विमानतळावरून सुरू होण्याची अपेक्षा आहे. अंतिम उड्डाण तपशील संबंधित विमानतळ प्रशासन किंवा विमान कंपनीच्या घोषणेनुसार स्पष्ट होतील.

  • Que: अमरावती-इंदूर विमानसेवाही सुरू होणार आहे का?

    Ans: अमरावती-इंदूर विमानसेवेसाठीही हालचाली सुरू असल्याचे वृत्त आहे. मात्र, सेवा सुरू होण्याची तारीख, उड्डाणांची संख्या आणि विमान कंपनीची माहिती अधिकृतरीत्या जाहीर झाल्यानंतरच निश्चित होईल.

Web Title: Amravati news path cleared for amravati pune flight service moves also underway for an indore connection sk

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 18, 2026 | 11:45 AM

Topics:  

  • airport
  • Amaravati
  • Amravati News

संबंधित बातम्या

Amravati News: धानपिकाला टँकरच्या पाण्याचा आधार! शेतकऱ्यांची धडपड, पीक करपण्याची भीती, आर्थिक फटका
1

Amravati News: धानपिकाला टँकरच्या पाण्याचा आधार! शेतकऱ्यांची धडपड, पीक करपण्याची भीती, आर्थिक फटका

Amravati News: अपुऱ्या पावसाचा रब्बी हंगामाला मोठा फटका! गहू-हरभरा पेरणीपूर्वीच शेतकऱ्यांसमोर संकट
2

Amravati News: अपुऱ्या पावसाचा रब्बी हंगामाला मोठा फटका! गहू-हरभरा पेरणीपूर्वीच शेतकऱ्यांसमोर संकट

Amravati News: सोयाबीन उत्पादन घटले; दर वधारले! अपुऱ्या पावसाचा फटका, बाजारात ६,८०० रुपये प्रतिक्विंटल दर
3

Amravati News: सोयाबीन उत्पादन घटले; दर वधारले! अपुऱ्या पावसाचा फटका, बाजारात ६,८०० रुपये प्रतिक्विंटल दर

Amravati News: दसरा-दिवाळीच्या तोंडावर शेतकऱ्यांमध्ये चिंता! सोयाबीन काढणीला लगबग, पावसाच्या धास्तीने धावपळ वाढली
4

Amravati News: दसरा-दिवाळीच्या तोंडावर शेतकऱ्यांमध्ये चिंता! सोयाबीन काढणीला लगबग, पावसाच्या धास्तीने धावपळ वाढली

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.