
INS Trishul : फ्रान्समध्ये दाखल झाला आयएनएस त्रिशूल, 'वरुण' युद्धसरावात दिसणार भारतीय नौदलाची ताकद
भारतीय नौदलाची युद्धनौका आयएनएस त्रिशुल (INS Trishul) फ्रान्सच्या टूलॉन नौदल बंदरावर दाखल झाली आहे. ही युद्धनौका आयएनएस त्रिशूल भारत व फ्रान्स यांच्यात होणाऱ्या द्विपक्षीय समुद्री युद्धसराव ‘वरुण’च्या 24 व्या उपक्रमात भाग घेईल.
दोन्ही देशांतील नौसैनिक येथील समुद्रात युद्धसराव करतील. या दरम्यान ते आपला अनुभव एकमेकांना सांगण्यासह समुद्र परिस्थितींमध्ये एकमेकांसह सवोत्तम ताळमेळ कसा राखता यावा याचाबाबतही प्रयत्न यावेळी केले जातील. भारतीय नौदलाच्या माहितीनुसार, या युद्धसरावाचा उद्देश दोन्ही नौदलांमधील सागरी सहकार्य, परस्पर समन्वय आणि कार्यक्षमतेला अधिक बळकटी देणे हा आहे.
भारत आणि फ्रान्सच्या नौदलांदरम्यान होणाऱ्या ‘वरुण’ युद्धसरावातील उपक्रम केवळ समुद्रापुरते मर्यादित राहणार नाहीत. टूलॉन बंदरात दोन्ही देशांच्या नौसैनिकांमध्ये व्यावसायिक चर्चा होणार आहे. तसेच एकमेकांच्या युद्धनौकांना भेट देऊन मोहिमांची माहिती घेणे आणि विविध क्रीडा उपक्रमांचाही यात समावेश असेल.
त्यानंतर दोन्ही देशांचे सैन्य एकत्रितपणे युद्धसराव करतील. आपले अनुभव, आपली कार्यपद्धती एकमेकांना सांगण्यात येईल. या युद्धसरावाची महत्त्वाची बाब अशी की, यात बंदरापासून खोल समुद्रापर्यंत दोन्ही नौदलांमधील संपर्क व प्रक्षिणाची व्याप्ती वाढवण्यात येते. याचा हेतू फक्त युद्धसरावापुरता नसून दोन्ही सैन्य दलातील एकमेकांच्या कार्यप्रणालीला समझणे आणि संयुक्त मोहिमांदरम्यान सवोत्तम ताळमेळ विकसित करणे आहे.
टूलॉनमध्ये दाखल झालेली आयएनएस त्रिशून ही तलवार श्रेणीतील गाइडेड मिसाइल (क्षेपणास्त्र) युद्धनौका आहे. ही बहुउद्देशीय युद्धनौका असून त्यावर आधुनिक शस्त्रास्त्रे आणि सेन्सर बसवण्यात आले आहेत. या भारतीय युद्धनौकेवर हेलिकॉप्टरच्या संचालनाचीही सुविधा आहे.
अलीकडच्या काही वर्षांत आयएनएस त्रिशूलमध्ये अनेक महत्त्वपूर्ण आधुनिकीकरण करण्यात आले आहे. त्यात स्वदेशी प्रणाली आणि नवीन सेन्सरचा समावेश आहे. तसेच युद्धनौकेवर आधुनिक इलेक्ट्रॉनिक सहाय्यक आणि संचार प्रणालीही बसविण्यात आल्या आहेत.
दुसरीकडे, या सरावादरम्यान फ्रान्स नौदल हे आपल्याकडील फोरबिन आणि ला फेयेतसारख्या युद्धनौकांचा वापर करणार आहेत.