Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • Gudi Padwa |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Hormuz Strait: ‘आम्ही होर्मुझची सामुद्रधुनी…’ इराणची ‘या’ देशांना परवानगी तर ‘यांना’ नाही; India-Iran नात्याचे गूढ कायम

Hormuz Strait : इराणने आतापर्यंत केवळ निवडक देशांच्या जहाजांनाच होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जाण्याची परवानगी दिली आहे, मात्र तेहरानचा असा आग्रह आहे की त्यांनी हा सागरी मार्ग सर्व राष्ट्रांसाठी बंद केलेला नाही.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Mar 18, 2026 | 12:28 PM
iran allows indian ships strait of hormuz global oil crisis marathi news update

iran allows indian ships strait of hormuz global oil crisis marathi news update

Follow Us
Close
Follow Us:
  • इराणची विशेष सवलत
  • भारतीय जहाजांना दिलासा
  • जागतिक ऊर्जेचे संकट

Iran Permission for Indian Ships Hormuz : मध्यपूर्वेतील रणसंग्राम (US-Israel Iran War) शिगेला पोहोचलेला असतानाच, जगाची ‘आर्थिक रक्तवाहिनी’ मानल्या जाणाऱ्या होर्मुझच्या सामुद्रधुनीतून (Strait of Hormuz) एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. इराण आणि इस्रायल-अमेरिका यांच्यातील वाढत्या लष्करी संघर्षामुळे हा सागरी मार्ग बंद होण्याची भीती व्यक्त केली जात होती. मात्र, इराणने आता आपली भूमिका स्पष्ट केली असून, भारत, पाकिस्तान आणि तुर्की यांसारख्या मित्रराष्ट्रांच्या जहाजांना या मार्गावरून जाण्याची मुभा दिली आहे.

इराणचा मोठा खुलासा: कुणाला प्रवेश आणि कुणाला मज्जाव?

इराणचे उप परराष्ट्र मंत्री सईद खतीबजादा यांनी एका विशेष मुलाखतीत माहिती दिली की, इराणचा हा सागरी मार्ग पूर्णपणे बंद करण्याचा कोणताही इरादा नाही. मात्र, जे देश इस्रायल किंवा अमेरिकेच्या लष्करी आघाडीशी थेट जोडलेले आहेत, त्यांच्या जहाजांना कडक निर्बंधांचा सामना करावा लागेल. इराणच्या या निर्णयामुळे भारतीय तेलवाहू जहाजांना (Oil Tankers) मोठा दिलासा मिळाला आहे. विशेष म्हणजे, भारताचे दोन मोठे एलपीजी टँकर्स या सामुद्रधुनीतून सुखरूप बाहेर पडल्याची पुष्टी झाली आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Cluster Bomb: ‘आधी त्यांनी शोक व्यक्त केला मग…’ इराणने तेल अवीवपासून दोहापर्यंत केला ‘असा’ भेदक प्रहार; इस्रायलवर भीतीचे ढग दाट

भारताची जहाजे अजूनही वेटिंगवर!

इराणचे भारतातील राजदूत मोहम्मद फथाली यांनी स्पष्ट केले की, तेहरानने काही भारतीय जहाजांना विशेष परवानगी दिली आहे. मात्र, परिस्थिती अजूनही पूर्णपणे निवळलेली नाही. सूत्रांच्या माहितीनुसार, अद्याप २० हून अधिक भारतीय जहाजे होर्मुझच्या बाहेर नांगर टाकून उभी आहेत आणि त्यांना इराणच्या लष्करी कमांडकडून हिरव्या कंदील मिळण्याची प्रतीक्षा आहे. इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांनी स्पष्ट केले आहे की, अंतिम निर्णय हा केवळ लष्कराच्या (IRGC) हातात असेल.

Iran has allowed some Indian vessels to sail through the Strait of Hormuz, Tehran’s Ambassador to India Mohammad Fathali says, confirming a rare exception to the blockade that has disrupted global energy supplies. pic.twitter.com/htUjV4aZLb — Al Arabiya English (@AlArabiya_Eng) March 14, 2026

credit – social media and Twitter

होर्मुझ सामुद्रधुनीचे जागतिक महत्त्व आणि भारतावर परिणाम

केवळ ५४ किलोमीटर रुंद असलेली ही सामुद्रधुनी जगातील २० टक्क्यांहून अधिक ऊर्जा निर्यातीसाठी जबाबदार आहे. जर हा मार्ग पूर्णपणे बंद झाला, तर जागतिक अर्थव्यवस्था कोलमडू शकते. भारतामध्ये गेल्या काही दिवसांत एलपीजीच्या पुरवठ्यावरून लोकांमध्ये मोठी घबराट पाहायला मिळाली आहे. अनेक शहरांमध्ये गॅस सिलिंडरचा तुटवडा निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात असल्याने इराणचा हा सकारात्मक पवित्रा भारतासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Crude Oil: उच्चस्तरीय जागतिक रणनीती! चार टँकर, लाखो बॅरल तेल गुप्त मार्गाने पाठवून ‘या’ मुस्लिम देशाने जिंकले भारताचे मन

ट्रम्प यांचा पुढाकार आणि इतर राष्ट्रांची भूमिका

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी होर्मुझची सामुद्रधुनी सुरक्षित करण्यासाठी चीन, जपान, ब्रिटन आणि फ्रान्स यांसारख्या देशांना आपल्या युद्धनौका तैनात करण्याचे आवाहन केले होते. मात्र, इराणशी थेट पंगा घेण्यास बहुतांश देशांनी नकार दिला आहे. अशा परिस्थितीत भारताचे इराणशी असलेले राजनैतिक संबंध फळाला येताना दिसत आहेत. भारताने आपले परराष्ट्र धोरण अत्यंत संतुलित ठेवल्यानेच भारतीय ध्वज असलेल्या जहाजांना आज या ‘डेथ झोन’ मधून बाहेर पडता येत आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: इराणने कोणत्या देशांच्या जहाजांना होर्मुझमधून जाण्याची परवानगी दिली आहे?

    Ans: इराणने प्रामुख्याने भारत, पाकिस्तान आणि तुर्की या देशांच्या जहाजांना जाण्याची मुभा दिली आहे, ज्यांचा इस्रायल-अमेरिका लष्करी आघाडीशी संबंध नाही.

  • Que: होर्मुझची सामुद्रधुनी बंद झाल्याचा भारतावर काय परिणाम झाला आहे?

    Ans: यामुळे भारताचा ऊर्जा पुरवठा विस्कळीत झाला असून अनेक शहरांत एलपीजीचा तुटवडा आणि तेलाच्या किमती वाढण्याची भीती निर्माण झाली आहे.

  • Que: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची यावर काय भूमिका आहे?

    Ans: ट्रम्प यांनी हा मार्ग पुन्हा उघडण्यासाठी जागतिक शक्तींना एकत्र येण्याचे आवाहन केले आहे आणि या प्रदेशात युद्धनौका तैनात करण्याची विनंती केली आहे.

Web Title: Iran allows indian ships strait of hormuz global oil crisis marathi news update

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 18, 2026 | 12:28 PM

Topics:  

  • Strait of Hormuz
  • US-Israel Iran War

संबंधित बातम्या

ऊर्जा सुरक्षेसाठी सरकारच्या मोठ्या हालचाली! पंतप्रधानांच्या निवासस्थानी उच्चस्तरीय बैठकीत पेट्रोलियम, वीज, खत क्षेत्रांचा आढावा
1

ऊर्जा सुरक्षेसाठी सरकारच्या मोठ्या हालचाली! पंतप्रधानांच्या निवासस्थानी उच्चस्तरीय बैठकीत पेट्रोलियम, वीज, खत क्षेत्रांचा आढावा

US Iran War : अमेरिकेला कोटींचा फटका! इराणने पाडले सर्वात शक्तिशाली F-15 फायटर जेट; पहा थरारक VIDEO
2

US Iran War : अमेरिकेला कोटींचा फटका! इराणने पाडले सर्वात शक्तिशाली F-15 फायटर जेट; पहा थरारक VIDEO

Iran war strategy : खामेनेईंनी मृत्यूपूर्वीच रचले होते चक्रव्यूह? इराणच्या सूडाने ट्रम्प-नेतन्याहूंची उडाली झोप; जगाला मोठा इशारा
3

Iran war strategy : खामेनेईंनी मृत्यूपूर्वीच रचले होते चक्रव्यूह? इराणच्या सूडाने ट्रम्प-नेतन्याहूंची उडाली झोप; जगाला मोठा इशारा

World War III: युद्ध आर्क्टिकमध्ये! इराण USच्या शत्रूसोबत करणार हातमिळवणी; ‘या’ एका प्रस्तावाने ट्रम्पच्या स्वप्नांना लागणार ग्रहण
4

World War III: युद्ध आर्क्टिकमध्ये! इराण USच्या शत्रूसोबत करणार हातमिळवणी; ‘या’ एका प्रस्तावाने ट्रम्पच्या स्वप्नांना लागणार ग्रहण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.