Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Israel Iran War : इस्रायलच्या हल्ल्यात ७८ नागरिकांचा मृत्यू; संतप्त इराणने रद्द केली अमेरिकेसोबतची अणुचर्चा

मध्यपूर्वेत युद्धसदृश परिस्थिती निर्माण झाली असून, इजरायलने इराणच्या राजधानीवर केलेल्या हवाई हल्ल्यामुळे दोन्ही देशांतील तणाव कमालीचा वाढला आहे. या भीषण हल्ल्यात किमान ७८ नागरिकांचा मृत्यू झाला आहे.

  • By संदीप गावडे
Updated On: Jun 13, 2025 | 08:38 PM
इस्रायलच्या हल्ल्यात ७८ नागरिकांचा मृत्यू; संतप्त इराणने रद्द केली अमेरिकेसोबतची अणुचर्चा

इस्रायलच्या हल्ल्यात ७८ नागरिकांचा मृत्यू; संतप्त इराणने रद्द केली अमेरिकेसोबतची अणुचर्चा

Follow Us
Close
Follow Us:

मध्यपूर्वेत युद्धसदृश परिस्थिती निर्माण झाली असून, इजरायलने इराणच्या राजधानीवर केलेल्या हवाई हल्ल्यामुळे दोन्ही देशांतील तणाव कमालीचा वाढला आहे. या भीषण हल्ल्यात किमान ७८ नागरिकांचा मृत्यू झाला असून, ३२९ हून अधिक लोक जखमी झाले आहेत. यामुळे संतप्त इराणने अमेरिकेसोबत सुरू असलेली अणुचर्चा थांबवली असून संघर्ष पेटण्याची शक्यता आहे.

Mohammad Bagheri : इराणचे लष्करप्रमुख मोहम्मद बघेरी नक्की कोण होते? इस्रायलच्या हल्ल्यात झालाय मृत्यू

योजनाबद्ध हल्ले

इराणच्या सरकारी माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, इजरायलने आतापर्यंत पाच टप्प्यांमध्ये तेहरानसह अनेक महत्त्वाच्या लष्करी व सरकारी ठिकाणांवर हवाई हल्ले केले. विशेषतः उत्तरी इराणमधील तबरीज येथे १० ठिकाणी बॉम्बहल्ला केला. इजरायलच्या माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, या कारवाईत २० हून अधिक वरिष्ठ इराणी लष्करी अधिकाऱ्यांचा मृत्यू झाला असून, यात रिव्होल्युशनरी गार्ड्सचे प्रमुख व एअरोस्पेस फोर्स कमांडर अमीर अली हाजीजादेह यांचा समावेश आहे.

अणुचर्चेवर परिणाम

हल्ल्यानंतर इराणने अमेरिकेसोबत सुरू असलेल्या अणुचर्चेवर तात्काळ पूर्णविराम दिला आहे. इराणी परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्ट केले की, “अशा आक्रमक आणि उकसवणाऱ्या कृतींनंतर कोणतीही चर्चा शक्य नाही.” यावर अमेरिकेचे माजी राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी प्रतिक्रिया देताना ” जक करार करायचा असेल तर इराणकडे अजूनही एक संधी आहे” असं म्हटलं आहे. आंतरराष्ट्रीय विश्लेषकांनी मात्र ट्रम्प यांच्या वक्तव्याने परिस्थिती अधिक चिघळू शकते, असा अंदाज व्यक्त केला आहे.

वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांचा मृत्यू आणि नव्या नियुक्त्या

या हल्ल्यात इराणच्या तीन प्रमुख लष्करी अधिकाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये रिव्होल्युशनरी गार्ड्सचे प्रमुख, रणनीती प्रमुख आणि एअर डिफेन्स प्रमुख यांचा समावेश आहे. यानंतर सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई यांनी तात्काळ या पदांवर नव्या नियुक्त्या जाहीर केल्या असून, हे सर्व अधिकारी पूर्वीही पाश्चिमात्य देशांविरोधात कठोर भूमिका घेत असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.

Israel Iran war : खामेनेईंच्या इराणला एका रात्रीत हादरवले; इस्रायलचे RAAM, SOUFA और ADIR ठरले बाहुबली

आंतरराष्ट्रीय प्रतिक्रिया

या घटनेवर संयुक्त राष्ट्रसंघाने गंभीर चिंता व्यक्त करत दोन्ही देशांना संयम ठेवण्याचे आवाहन केलं आहे. रशिया आणि चीनने इजरायलच्या कारवाईवर टीका केली असून, त्यांनी इराणच्या समर्थनार्थ भूमिका घेतली आहे. क्षेत्रीय विश्लेषकांच्या मते, हा हल्ला केवळ एक सामरिक कृती नसून, भविष्यातील दीर्घकालीन संघर्षाचे संकेत देतो. त्यामुळे पश्चिम आशियात तणाव आणखी वाढण्याची शक्यता आहे.

Web Title: Iran enraged after 78 people died in israeli attack nuclear talks with america cancelled

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 13, 2025 | 08:38 PM

Topics:  

  • Iran-Israel War
  • Israel Attack
  • Israel Iran war

संबंधित बातम्या

इस्रायलच्या हल्ल्यानंतर चवताळले इराण सरकार; हेरगिरीच्या आरोपाखाली तब्बल २१ हजार नागरिकांना तुरुंगवास
1

इस्रायलच्या हल्ल्यानंतर चवताळले इराण सरकार; हेरगिरीच्या आरोपाखाली तब्बल २१ हजार नागरिकांना तुरुंगवास

इराणचे अणु स्वप्न भंगणार? युद्धबंदीच्या एक दिवस आधी इस्रायलने वरिष्ठ अणुशास्त्रज्ञाची केला होती हत्या
2

इराणचे अणु स्वप्न भंगणार? युद्धबंदीच्या एक दिवस आधी इस्रायलने वरिष्ठ अणुशास्त्रज्ञाची केला होती हत्या

इस्रायल, अमेरिका नव्हे… ‘या’ तीन देशांच्या धमकीने थरथरला इराण; अणु चर्चा पुन्हा सुरु करण्यास दर्शवली सहमती
3

इस्रायल, अमेरिका नव्हे… ‘या’ तीन देशांच्या धमकीने थरथरला इराण; अणु चर्चा पुन्हा सुरु करण्यास दर्शवली सहमती

Middle East News: इराण न्यूक्लिअर साईटसंबंधित मोठा खुलासा, कुठे झाले जास्त हल्ले; केवळ फोर्दोचे अधिक नुकसान
4

Middle East News: इराण न्यूक्लिअर साईटसंबंधित मोठा खुलासा, कुठे झाले जास्त हल्ले; केवळ फोर्दोचे अधिक नुकसान

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.