
फोटो सौजन्य सोशल मीडिया
त्याच्या दुसऱ्याच दिवशी म्हणजे आज १२ नोव्हेंबरला इस्रायल मधून एक बातमी समोर आली आहे . यामुळे मध्यपूर्वेतील तणाव पुन्हा एकदा वाढण्याची चिन्हे दिसू लागली आहेत . इस्रायलने इराणवर संभाव्य लष्करी कारवाई करण्यासाठी आपल्या सैन्याची सज्जता वाढवण्याचे आदेश दिले आहेत .
अशा प्रकारची बातमी बाहेर आली . तर दुसरीकडे इराणनेही आक्रमक भूमिका घेतली असून , आपल्यावर हल्ला झाल्यास युद्ध केवळ पश्चिम आशियापुरते मर्यादित राहणार नाही , असा इशारा दिला आहे . त्यामुळे इस्रायल आणि इराण यांच्यात परत एकदा जोरदार हल्ले आणि प्रतिहल्ले होणार असल्याची भीती व्यक्त केली जात आहे .
सध्याचे इस्रायलचे काळजीवाहू पंतप्रधान नेतान्याहू यांच्या अध्यक्षतेखाली सुरक्षा मंत्रिमंडळाने इरांविरोधात संभाव्य लष्करी कारवाईसाठी सैन्याची तयारी वाढवण्याचे आदेश दिल्याचे इस्रायली बातम्यांनी दिले आहे . सार्वजनिक प्रसारक KAN च्या वृत्तानुसार मंत्रिमंडळाने दिलेले आदेश अशा लष्करी हालचालींना कारणीभूत ठरू शकतात ,ज्यामुळे पुन्हा युद्धाचा भडका उडण्याची शक्यता आहे .
यावर इस्रायलचे विरोधी पक्षनेते गादी आयझेनकोट यांनी काळजी व्यक्त केली आहे . तसेच थेट तातडीचा धोका नसताना काळजीवाहू सरकारने मोठी लष्करी कारवाई करू नये ,असे आवाहन सुद्धा त्यांनी नेतान्याहू यांना केले आहे .
इस्रायलच्या संभाव्य हल्ल्याच्या बातमीनंतर लगेचच इराणनेही आपली कठोर भूमिका जाहीर केली आहे . इराणचे सुरक्षा अधिकारी मोहसेन रझाई यांनी अमेरिकेला इशारा देताना , अमेरिकेने पुन्हा युद्ध सुरु केल्यास पश्चिम आशियापासून ते अगदी युरोपपर्यंत आक्रमणात सहभागी आलेले लष्करी तळ इराणच्या निशाण्यावर असतील असे म्हंटले आहे .
इराणच्या लष्करी नेत्तृत्वाने संभाव्य संघर्षाचा विस्तार या प्रदेशाच्या पलीकडे होऊ शकतो .असे स्पष्ट केले आहे . त्यामुळे अमेरिकेचे लष्करी तळ आणि इस्रायलशी संबंधित ठिकाणांच्या सुरक्षेचा प्रश्न अधिक गंभीर बनला आहे . इराणच्या या भूमिकेमुळे संघर्ष केवळ दोन देशांपुरता मर्यादित न राहता आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचण्याची भीती वाढली आहे .
एका बाजूला हल्ल्याच्या बातम्या येत असताना दुसऱ्या बाजूला हाच संघर्ष टाळण्यासाठी राजनैतिक प्रयत्नही सुरु आहेत . अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांनी कतारच्या मध्यस्तीने सुरु असलेल्या चर्चेतून तोडगा न निघाल्यास पुन्हा लष्करी कारवाईचा पर्याय खुला असल्याचे संकेत दिले आहेत .
मात्र अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री मार्को रुबिओ यांनी आर्थिक दबावामुळे मोठ्या प्रमाणात लष्करी कारवाईची गरज कमी असल्याचे सांगितले आहे . या चर्चेमधील मोठा अडथळा म्हणजे दोन्ही देशांचा एकमेकांवर नसलेला विश्वास हा आहे . सध्या तरी इस्रायलने हल्ला केल्याची पुष्टी झालेली नाही . तरीही लष्करी तयारीमुळे संपूर्ण जगाचे लक्ष मध्यपुर्वेकडे लागले आहे .