Iran Explosion Death toll from Iran’s port blast reaches 65
तेहरान: अब्बास बंदरावरील स्फोटाने इराण हादरला आहे. मृतांचा आकडा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. इराणच्या सरकारी माध्यांनी दिलेल्या वृत्तानुसार, इराणच्या स्फोटातील मृतांचा आकडा 40 वरुन 65 वर पोहोचला आहे. तसेच यामध्ये हजारहून अधिक लोक जखमी झाले आहेत. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. परंतु रुग्णलयातील अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, काहींची प्रकृती अत्यंत गंभीर आहे.
सध्या या स्फोटामागील कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. इराणी संसदेेचे अध्यक्ष मोहम्मद बाघेर गालिबाफ यांनी स्फोटांच्या चौकशीसाठीराजाई बंदराला भेट देण्याचे ठरवले आहे. यासाठी संसदीय समिती स्थापन करण्यात आली आहे. याच वेळी इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांनी, “इराण सध्या या स्फोटामागील कारणाचा शोध घेत आहे, हा हल्ला असल्यास याला प्रत्युत्तर देण्यासाठी आमच्या सुरक्षा व्यवस्था सज्ज आणि सतर्क आहोत असे म्हटले आहे.” हा स्फोट झाला त्यावेळी रॉकेट इंधनाचा एक कंटेनर जहाज बंदरावर आले होते.
अब्बास बंदर हे इराणच्या प्रमुख बंदरापैकी एक आहे. तेल उत्पादनांचा व्यापर आणि वाहतूकीमध्ये हे बंदर महत्वाची भूमिका बजावते. या भीषण स्फोटानंतर देशात तीन दिवसांचा शोक जाहीर करण्यात आला आहे. या स्फोटाने संपूर्ण बंदराला वेढले आहे. इराणच्या राजधानी तेहरापासून 1 हजार 50 किलोमीटर अंतरावर होर्मुझच्या सामुद्रधुनीवर अब्बास बंदर स्थित आहे. होर्मुझ पर्शियन आखातामधील एक अरुंद मार्ग आहे. या मार्गाने इराणचा 20% तेल व्यापर होतो.
याच दरम्यान अमेरिकेचे अधिकारी इराणच्या अणु कार्यक्रमावर चर्चा करण्यासाठी तिसऱ्यांदा ओमानच्या भेटीस आसे होते. हा स्फोट इतका भीषण होता की, यामुळे आसपासच्या इमारतींच्या खिडक्यांच्या काचा फुटल्या, तसेच स्फोटापासून दूर शिपिंग कंटेनरवरील स्टीलच्या सळई देखील तुटल्या यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
याआधी 2020 मध्ये देखील इराणच्या अब्बास बंदरावर सायबर हल्ला झाला होता. तसेच इराणच्या बेरुत बंदरावर देखील असाच एक भीषण स्फोट झाला होता. या स्फोटात 200 हून अधिक लोकांचा बळी गेला होता, तर 6 हजाराहून अधिक लोक जखमी झाले होते.