Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Iran-Israel War : पश्चिम आशियात युद्धाचं चित्र आणखी बदलतंय; इराणचा बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांनी हल्ला, बगदाद विमानतळावर स्फोट

इराणने हिंद महासागरातील अमेरिका आणि ब्रिटनचा संयुक्त लष्करी तळ असलेल्या डिएगो गार्सियावर दोन मध्यम पल्ल्याची बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे डागली. ही माहिती अनेक अमेरिकन अधिकाऱ्यांनी दिली.

  • By कृपादान आवळे
Updated On: Mar 21, 2026 | 07:18 AM
Iran-Israel War : पश्चिम आशियात युद्धाचं चित्र आणखी बदलतंय; इराणचा बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांनी हल्ला, बगदाद विमानतळावर स्फोट

Iran-Israel War : पश्चिम आशियात युद्धाचं चित्र आणखी बदलतंय; इराणचा बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांनी हल्ला, बगदाद विमानतळावर स्फोट

Follow Us
Close
Follow Us:

बगदाद : सध्या इराणवर अमेरिका आणि इस्त्रायल या दोन्ही देशांकडून हल्ले केले जात आहेत. त्याला इराणकडूनही जोरदार प्रत्युत्तर देण्यात येत आहे. पश्चिम आशियामध्ये सुरू असलेला संघर्ष दिवसेंदिवस अधिक धोकादायक होत आहे. अमेरिका आणि इस्रायलच्या तीव्र हल्ल्यांना चिथावणी देत इराणदेखील इस्रायल आणि आखाती देशांमधील अमेरिकेच्या लष्करी तळांवर जोरदार प्रत्युत्तर देत आहे.

इराणने हिंद महासागरातील अमेरिका आणि ब्रिटनचा संयुक्त लष्करी तळ असलेल्या डिएगो गार्सियावर दोन मध्यम पल्ल्याची बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे डागली. ही माहिती अनेक अमेरिकन अधिकाऱ्यांनी दिली. एकही क्षेपणास्त्र तळावर आदळले नाही. सूत्रांनुसार, दोनपैकी एक क्षेपणास्त्र हवेतच निकामी झाले, तर दुसऱ्या क्षेपणास्त्राला रोखण्यासाठी अमेरिकेच्या एका युद्धनौकेने एसएम-३ इंटरसेप्टर डागला. क्षेपणास्त्र रोखण्यात आले की नाही, याची माहिती अद्याप मिळू शकली नाही.

हेदेखील वाचा : Iran US War: श्रीलंकेने अमेरिकेला दाखवले ‘तेवर’! अमेरिकन फायटर जेटला लँडिंग नाकारले; राष्ट्राध्यक्षांनी ठणकावून सांगितले…

इस्रायलने लेबनॉनची राजधानी बेरूतवर हवाई हल्ले केल्याचे समोर आले आहे. लष्कराने सांगितले की, ते शहराच्या विशिष्ट भागांना लक्ष्य करत होते. २ मार्चपासून लेबनॉनमधील इस्रायली हल्ल्यांमध्ये १००० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे, ज्यात मोठ्या संख्येने महिला आणि मुलांचा समावेश आहे. बेरूतच्या दाट लोकवस्तीच्या दक्षिण भागातील सहा भागांसाठी नुकताच स्थलांतराचा इशारा जारी करण्यात आला होता.

तेहरान आणि आसपासच्या परिसरात स्फोट

इराणची राजधानी तेहरानमध्ये शनिवारी पहाटे दोन मोठे स्फोट झाले. स्थानिक माध्यमांच्या वृत्तानुसार, शहरावर हवाई संरक्षण यंत्रणा सक्रिय करण्यात आली होती. तेहरानच्या दक्षिणेकडील शहर-ए-रे, पश्चिमेकडील करज आणि मध्य इराणमधील ऐतिहासिक शहर इस्फहान येथेही हवाई हल्ले झाल्याचे वृत्त समोर आले आहे. यावेळी कोणत्याही नुकसानीची किंवा जीवितहानीची पुष्टी झालेली नाही.

सौदी अरेबियामध्ये हाणून पाडले ड्रोन हल्ले

पश्चिम आशियातील सध्याच्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, सौदी अरेबियाने आपल्या पूर्व भागात आणखी पाच ड्रोन पाडल्याचा दावा केला आहे. संरक्षण मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, हे ड्रोन हवेतच नष्ट करण्यात आले. मात्र, त्यांचा स्रोत किंवा झालेल्या नुकसानीबद्दल माहिती उघड करण्यात आलेली नाही. यापूर्वी तीन ड्रोन रोखण्यात आले होते.

Web Title: Iran launches ballistic missile attack explosions at baghdad airport

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 21, 2026 | 07:12 AM

Topics:  

  • international news
  • Iran-Israel War

संबंधित बातम्या

युद्धाच्या परिस्थितीत Trump यांना मोठा धक्का…,10 % Tarrif कोर्टाकडून रद्द! काय परिणाम होणार?
1

युद्धाच्या परिस्थितीत Trump यांना मोठा धक्का…,10 % Tarrif कोर्टाकडून रद्द! काय परिणाम होणार?

Indian Navy: व्हिएतनाममध्ये भारताच्या फ्लोटिंग लॅबोरेटरी ‘INS Sagardhwani’चे जंगी स्वागत; सागरी विज्ञानाचे नवे रहस्य उलगडणार
2

Indian Navy: व्हिएतनाममध्ये भारताच्या फ्लोटिंग लॅबोरेटरी ‘INS Sagardhwani’चे जंगी स्वागत; सागरी विज्ञानाचे नवे रहस्य उलगडणार

Maharashtra Breaking News Updates Today: महाराष्ट्रात दहावीचा निकाल जाहीर! मुलींनी पुन्हा मारली बाजी
3

Maharashtra Breaking News Updates Today: महाराष्ट्रात दहावीचा निकाल जाहीर! मुलींनी पुन्हा मारली बाजी

Maharashtra Breaking News Updates Today:  भाजप नेते सुवेंदू अधिकारी यांच्या पीएची गोळ्या झाडून हत्या
4

Maharashtra Breaking News Updates Today: भाजप नेते सुवेंदू अधिकारी यांच्या पीएची गोळ्या झाडून हत्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.