Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 22 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharastra Politics |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra Today’s Live News in Marathi: आशियाई खेळात भारताने नेमबाजीत दुसरे सुवर्णपदक जिंकले

आज २५ सप्टेंबर २०२६ संपूर्ण महाराष्ट्रात अनंत चतुर्दशीनिमित्त गणरायाला भावपूर्ण निरोप दिला जात असून, मुंबई आणि पुण्यात भव्य विसर्जन मिरवणुका सुरू आहेत. गर्दी नियंत्रणासाठी शाळांना सुट्टी देण्यात आली आहे. तर दुसरीकडे, पूर्व किनारपट्टीवर 'अर्णब' चक्रीवादळाचा फटका बसला आहे.

  • By anuradha sagar
Updated On: Sep 26, 2026 | 09:20 AM
Maharashtra Breaking News Today 21.11.2026

Maharashtra Breaking News Today 21.11.2026

Follow Us
Follow Us:

Maharashtra to World Breaking News : महाराष्ट्रासह देशभरात गणेशोत्सवाची सांगता; लालबागच्या राजासह मानाच्या गणपतींच्या विसर्जन मिरवणुका उत्तररात्रीपर्यंत उत्साहात सुरूवात झाली आहे.  रेल्वे बोर्डाकडून महाराष्ट्रासाठी नवीन ‘पुणे-बीड एक्सप्रेस’सह मध्य प्रदेश व गुजरातसाठी विशेष गाड्यांना मंजुरी देण्यात आली आहे.
२८ ते ३० सप्टेंबर दरम्यान प्रस्तावित तीन दिवसीय बँक संपाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय कर्मचाऱ्यांचे वेतन २५ सप्टेंबरलाच जमा करण्याचे आदेश जारी करण्यात  आले आहेत.

हैदराबाद आणि तेलंगणातील प्रमुख शहरांमध्ये गणेश विसर्जन मिरवणुकीनिमित्त २५ सप्टेंबर रोजी शाळा-कॉलेजांना अधिकृत सुट्टी घोषित करण्यात आली आहे.  महाराष्ट्रात दुष्काळाच्या परिस्थितीची आढावा अधिसूचना जारी करण्यात आली असून मदत प्रक्रियेला गती देण्याचे प्रशासनाचे आदेशही  राज्य सरकारने दिले आहेत.

The liveblog has ended.
  • 25 Sep 2026 05:00 PM (IST)

    25 Sep 2026 05:00 PM (IST)

    अरे देवा… मग Salary चं काय? Bank Strike मुळे पगारावर परिणाम? आता वाट बघावी लागणार

    Bank Strike Salary Date : जर तुमचा पगार महिन्याच्या शेवटच्या तारखेंना येत असेल, तर या महिन्यात तुमची काळजी वाढू शकते. २८ सप्टेंबर ते ३० सप्टेंबर या कालावधीत देशभरात तीन दिवसांचा बँक संप आहे. त्याआधी, २६ सप्टेंबर रोजी चौथा शनिवार आणि २७ सप्टेंबर रोजी रविवार आहे. याचा अर्थ, बँकेच्या कामकाजावर सलग पाच दिवस परिणाम होऊ शकतो. त्यामुळे या सगळ्यामध्ये तुमचा पगार अडकण्याची शक्यता आहे? नेमकी काय आहे परिस्थिती? ( Bank Strike Salary Date )

  • 25 Sep 2026 04:55 PM (IST)

    25 Sep 2026 04:55 PM (IST)

    Crime News: शेटफळमध्ये एका वादातून गाव पेटलं; जवानावर सत्तूरने वार, 100 जणांचा जमाव रस्त्यावर

    मोहोळ : तालुक्यातील शेटफळ गावात पूर्ववैमनस्य, धार्मिक प्रथा आणि शेळ्या शेतात गेल्याच्या कारणावरून दोन गटांमध्ये जोरदार हाणामारी झाल्याची घटना समोर आली आहे. या संघर्षात भारतीय सैन्यातील एका जवानासह दोन्ही बाजूंचे अनेक जण जखमी झाले आहेत. जखमींवर सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनेनंतर गावात तणाव निर्माण झाला असून मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

  • 25 Sep 2026 04:50 PM (IST)

    25 Sep 2026 04:50 PM (IST)

    Afghanistan-Pakistan Attack: मक्का करारातून पळ काढण्यासाठी पाकिस्तानचे युद्ध; तालिबानच्या झबिहुल्ला मुजाहिद यांचा गंभीर आरोप

    अफगाणिस्तान आणि पाकिस्तान (Afghanistan-Pakistan Attack) यांच्यातील राजनैतिक व लष्करी तणाव अत्यंत गंभीर वळणावर पोहोचला आहे. तालिबान सरकारचे मुख्य प्रवक्ते झबिहुल्ला मुजाहिद यांनी पाकिस्तानवर अत्यंत गंभीर आरोप करत इस्लामाबाद जाणीवपूर्वक अफगाणिस्तानसोबत युद्धाची परिस्थिती निर्माण करत असल्याचा दावा केला आहे. गुरुवारी अफगाणिस्तानमधील कंदहार येथे एका धार्मिक मदरशाच्या कार्यक्रमात उपस्थित जनसमुदायाला संबोधित करताना मुजाहिद यांनी पाकिस्तानच्या लष्करी धोरणांवर सडकून टीका केली.

  • 25 Sep 2026 04:45 PM (IST)

    25 Sep 2026 04:45 PM (IST)

    Goa Staff Selection Commission Recruitment 2026: गोव्यात २२२ सरकारी पदांची बंपर भरती! ऑनलाइन अर्ज सुरू, ‘या’ तारखेआधी करा अप्लाय

    सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. गोवा कर्मचारी निवड आयोगाने म्हणजेच Goa Staff Selection Commission ने मोठी भरती काढली आहे. राज्य सरकारच्या वेगवेगळ्या खात्यांमध्ये गट ‘क’ संवर्गातील एकूण 222 जागा भरल्या जाणार आहेत. यासाठी ऑनलाईन अर्ज मागवले आहेत आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख 2 ऑक्टोबर 2026 ठेवली आहे. त्यामुळे ज्यांना गोव्यात सरकारी नोकरी करायची आहे त्यांनी अजिबात वेळ वाया घालवू नका. Goa 

  • 25 Sep 2026 04:40 PM (IST)

    25 Sep 2026 04:40 PM (IST)

    Gyanesh Kumar Arrest Demand: वारं फिरलं! ज्ञानेश कुमारांविरोधात लखनऊपासून जम्मूपर्यंत काँग्रेस रस्त्यावर

    Congress Protest Against CEC Gyanesh Kumar: काँग्रेस पक्षाने मुख्य निवडणूक आयुक्त (सीईसी) ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात आपले आंदोलन तीव्र केले आहे. आज, त्यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी पक्ष देशभरात आंदोलन करत आहे. लखनऊ, पाटना, गुवाहाटी आणि जम्मू यांसारख्या अनेक प्रमुख शहरांमध्ये काँग्रेस कार्यकर्ते रस्त्यावर उतरले असून त्यांनी मुख्य निवडणूक आयुक्त व भाजपविरोधात घोषणाबाजी केली.

  • 25 Sep 2026 04:35 PM (IST)

    25 Sep 2026 04:35 PM (IST)

    Crime News: ‘DDR ची प्रत द्या’ म्हणत पोलीस ठाण्यात आला अन् अचानक विष प्यायलं; नेमकं काय घडलं?

    बरनाला : कारच्या नुकसानीची पोलिस नोंद मिळवण्यासाठी लाच मागितल्याचा आरोप करत एका तरुणाने थेट पोलीस ठाण्याच्या आवारात विषारी औषध प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना पंजाबमधील बरनाला जिल्ह्यात घडली. घटनेनंतर तरुणाला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

  • 25 Sep 2026 04:30 PM (IST)

    25 Sep 2026 04:30 PM (IST)

    Devendra Fadnavis: माथाडी कामगारांसाठी मोठी घोषणा! वडाळ्यात 3 हजार घरे; वाशी मार्केट यार्डचाही होणार पुनर्विकास

    ठाणे : माथाडी कामगारांना सामाजिक सुरक्षा आणि कायदेशीर संरक्षण देणारा ऐतिहासिक माथाडी कायदा कोणत्याही परिस्थितीत संपवला जाणार नसून तो कायम राहील, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे दिली. कष्टकरी कामगारांच्या हक्कांचे रक्षण करण्यासाठी आणि त्यांना सन्मानाचे जीवन मिळवून देण्यासाठी शासन पूर्णपणे कटिबद्ध असल्याचे सांगतानाच, वडाळा येथील गृहप्रकल्पात सुमारे तीन हजार माथाडी कामगारांना हक्काची घरे दिली जातील आणि वाशी एपीएमसी मार्केट यार्डचा पुढील 50 वर्षांचा विचार करून जागतिक दर्जाचा पुनर्विकास करण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली. माथाडी चळवळीचे संस्थापक स्वर्गीय आमदार अण्णासाहेब पाटील यांच्या 93 व्या जयंतीनिमित्त वाशी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत भव्य कामगार मेळावा आयोजित करण्यात आला होता, त्यावेळी ते बोलत होते.

  • 25 Sep 2026 04:25 PM (IST)

    25 Sep 2026 04:25 PM (IST)

    8,000mAh बॅटरी नवा Vivo स्मार्टफोन चीनमध्ये दाखल! फीचर्सही आहेत दमदार, जाणून घ्या किंमत

    Vivo Smartphone Launched: स्मार्टफोन कंपनी विवोने होम मार्केट चीनमध्ये Y-सीरीजमधील एक नवीन डिव्हाईस लाँच केले आहे. कंपनीचा नवीन स्मार्टफोन Vivo Y600i नावाने लाँच करण्यात आला आहे. हा कंपनीच्या वाय-सिरीजमधील तिसरा स्मार्टफोन आहे. यापूर्वी याच सिरीजअंतर्गत कंपनीने Vivo Y600 Turbo आणि Y600 Pro हे स्मार्टफोन्स लाँच केले होते. या स्मार्टफोन्समध्ये 9,020mAh आणि 10,200mAh बॅटरी दिली होती. नव्या डिव्हाईसमध्ये कंपनीने 8,000mAh बॅटरी ऑफर केली आहे.

    8,000mAh बॅटरी नवा Vivo स्मार्टफोन चीनमध्ये दाखल! फीचर्सही आहेत दमदार, जाणून घ्या किंमत

  • 25 Sep 2026 04:20 PM (IST)

    25 Sep 2026 04:20 PM (IST)

    Demand Dolby Systems: डॉल्बीसाठी गणेश मंडळांचा हट्ट; विसर्जन न करण्याचा प्रशासनाला इशारा….

    Demand Dolby Systems : आज आनंत चतुर्थी आहे, आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी सर्व गणेश भक्त मोठ्या जल्लोषात मिरवणुक काढतात, मिरवणुकी दरम्यान ढोल- ताशे, डीजे, डाॅल्बी साऊंड सिस्टम वाजवण्यासाठी वापर केला जातो. मुंबई – पुण्यात डीजे आणि डॅाल्बी साऊंड सिस्टम सरास वाजवले जातात. याच कारणावरुण बीडच्या सार्वजनिक मंडळानी सुद्धा डाॅल्बी साऊंड सिस्टमची मागणी केल्याचे दिसत आहे. बीड मध्ये प्रशासनाने डाॅल्बी साऊंड सिस्टम वर पूर्णपणे बंदी घातली असताना या निर्णयाच्या विरोधात आक्रमक पवित्रा घेतल्याचे दिसून येत आहे. तर डाॅल्बी लावू दिला नाही तर बाप्पाचे विसरजन होणार नाही, अशी धमकी मंडळाच्या कार्यकर्त्यांनी प्रशासनाला दिली आहे. बीड जिल्हा प्रशासन आणि पोलिस यंत्रणा ॲक्शन मोडमध्ये आली आहे. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आणि ध्वनिप्रदूषणाला आळा घालण्यासाठी प्रशासनाने यंदा डीजे आणि साऊंड सिस्टीमवर पूर्णपणे बंदी घातली आहे. हे आदेश केवळ गणेश विसर्जनासाठी नाही तर लग्न समारंभ आणि इतर शुभकार्यासाठी आहे. परवाना नसताना जर डीजे किंवा डाॅल्बी वाजवला तर थेट पोलिस कारवाई होणार.
  • 25 Sep 2026 04:15 PM (IST)

    25 Sep 2026 04:15 PM (IST)

    Toshisuke Kanazawa : ‘या’ व्यक्तीने वयाच्या 90 व्या वर्षी बॉडीबिल्डिंगमधून जिंकली पदके; ‘हा’ जपानी आहार ठरला अत्यंत प्रभावी

    आजच्या काळात जिथे वयाची पन्नाशी ओलांडल्यानंतर अनेक लोक विविध आजारांनी ग्रासले जातात किंवा शारीरिक थकव्याची तक्रार करतात, तिथे जपानमधील एका ९० वर्षीय वृद्धाने जगभरातील तरुणांना अवाक केले आहे. ९० वर्षे वय असलेल्या तोशिसुके कानाझावा (Toshisuke Kanazawa) यांनी ३१ ऑगस्ट रोजी पार पडलेल्या मास्टर्स बॉडीबिल्डिंग स्पर्धेत ८५ वर्षांवरील वयोगटात आपल्या प्रतिस्पर्ध्यांवर मात करत सुवर्णपदक पटकावले. ही केवळ एक स्पर्धा नव्हती, तर त्यांच्या जिद्दीची आणि शिस्तबद्ध जीवनशैलीची एक जिवंत साक्ष होती. या विजयासोबतच कानाझावा यांनी आपल्या कारकिर्दीतील १९ वे राष्ट्रीय विजेतेपद स्वतःच्या नावावर केले आहे.

    Toshisuke Kanazawa : ‘या’ व्यक्तीने वयाच्या 90 व्या वर्षी बॉडीबिल्डिंगमधून जिंकली पदके; ‘हा’ जपानी आहार ठरला अत्यंत प्रभावी

  • 25 Sep 2026 04:10 PM (IST)

    25 Sep 2026 04:10 PM (IST)

    Gaza War: ‘भारत इस्रायलचा सर्वात मजबूत मित्र आणि UN अविश्वासार्ह’; जेरुसलेमच्या माजी उपमहापौरांचे मोठे विधान

    गाझा युद्धावरून (Gaza War ) आंतरराष्ट्रीय स्तरावर मुत्सद्दी दबाव सतत वाढत आहे. या पार्श्वभूमीवर जेरुसलेमच्या माजी उपमहापौर फ्लूर हसन नाहूम यांनी जागतिक राजकारण, संयुक्त राष्ट्रांची भूमिका आणि मध्य पूर्वेतील तणावावर अतिशय रोखठोक मते व्यक्त केली आहेत. फ्लूर नाहूम यांच्या मते, गाझा युद्धाच्या काळात संयुक्त राष्ट्राने आपल्या मूळ तत्त्वांचा त्याग केला असून जागतिक स्तरावर आपली उरलीसुरली विश्वासार्हता पूर्णपणे गमावली आहे. त्यांनी आरोप केला की संयुक्त राष्ट्र इस्रायलविरोधात एकतर्फी भूमिका घेत आहे आणि गाझामधील उपासमारीचे खोटे दावे पसरवत आहे. जगात इतर अनेक प्राणघातक आणि भीषण संघर्ष सुरू असताना, संयुक्त राष्ट्र आणि इतर जागतिक संस्था केवळ इस्रायललाच लक्ष्य करत आहेत. तसेच, संयुक्त राष्ट्रांची संस्था ‘UNRWA’ वर भाष्य करताना त्यांनी सांगितले की, ७ ऑक्टोबर २०२३ रोजी झालेल्या भीषण हत्याकांडात या संस्थेच्या कर्मचाऱ्यांचा थेट सहभाग असल्याचे पुरावे मिळाले आहेत. दहशतवाद्यांना आपल्या यंत्रणेत आश्रय दिल्यामुळे UNRWA च्या तटस्थतेशी पूर्णपणे तडजोड झाली आहे.

  • 25 Sep 2026 03:59 PM (IST)

    25 Sep 2026 03:59 PM (IST)

    Gerbera Drone: इटली, जर्मनी आणि फ्रान्सवरही रशिया उगवणार सूड; अमेरिकन CIA संचालकांच्या मॉस्को भेटीनंतर युरोपमध्ये हाय-अलर्ट

    जागतिक भू-राजकारणात आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींमध्ये एका नव्या मोठ्या तणावाची ठिणगी पडल्याचे संकेत मिळत आहेत. अमेरिकेची प्रख्यात गुप्तचर संस्था ‘सीआयए’ने (CIA) युरोपीय देशांना एका संभाव्य आणि गंभीर धोक्याबद्दल सतर्क केले आहे. स्पॅनिश वृत्तपत्र ‘एल मुंडो’ (El Mundo) च्या एका स्फोटक अहवालानुसार, रशिया युरोपमधील प्रमुख नाटो (NATO) देशांमधील पर्यटन स्थळे, बंदरे आणि महत्त्वाच्या पायाभूत सुविधांना लक्ष्य करण्यासाठी व्यापारी जहाजांवरून छुप्या पद्धतीने ड्रोन (Gerbera Drone)  हल्ले करण्याची योजना आखत आहे. या इशाऱ्यानंतर स्पेन, फ्रान्स आणि इटलीसह संपूर्ण युरोपमध्ये उच्च पातळीवरील हाय-अलर्ट जारी करण्यात आला आहे.

  • 25 Sep 2026 03:45 PM (IST)

    25 Sep 2026 03:45 PM (IST)

    जादूटोण्याच्या संशयातून वृद्धाची हत्या; दोन अल्पवयीन मुलांसह दोनजण ताब्यात

    गोंदिया : मुंडीपार एमआयडीसी येथे रात्रपाळीच्या कामावर जात असलेल्या व्यक्तीची धारदार शस्त्राने हत्या केल्याच्या घटनेचा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अवघ्या २४ तासात उलगडा केला. जादूटोण्याच्या संशयातून हा खून केल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले आहे. याप्रकरणी जितेंद्र कोहळे (वय ४५) आणि कमलेश अशोक नेवारे (वय १९, दोघेही रा. टॉवरटोली, मुंडीपार) यांना ताब्यात घेण्यात आले. दोन विधिसंघर्षग्रस्त बालकांनाही ताब्यात घेण्यात आले आहे. ही कारवाई गुरुवारी करण्यात आली.

  • 25 Sep 2026 03:35 PM (IST)

    25 Sep 2026 03:35 PM (IST)

    CJP Demands Gyanesh Kumar Resignation: ज्ञानेश कुमार यांनी राजीनामा न दिल्यास…; अभिजीत दिपकेंकडून आंदोलनाची घोषणा

    Abhijeet Dipke Demand Gyanesh Kumar Resignation: कॉकरोच जनता पक्षाचे (CJP) अध्यक्ष अभिजीत दीपके यांनी मुख्य निवडणूक आयुक्त (CEC) ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. ज्ञानेश कुमार यांनी ४८ तासांत राजीनामा द्यावा, पण जर त्यांनी राजीनामा दिला नाही तर, कॉकरोच जनता पार्टीकडून देशव्यापी आंदोलन सुरू केले जाईल, असा इशारा अभिजीत दिपके यांनी दिला आहे.

  • 25 Sep 2026 03:25 PM (IST)

    25 Sep 2026 03:25 PM (IST)

    UNGA : संयुक्त राष्ट्र महासभेत हाफिज सईद प्रश्नावरून भारत-पाकिस्तानमध्ये बाचाबाची; पळून गेले गेले शहबाज शरीफ, VIDEO VIRAL

    अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरात सध्या संयुक्त राष्ट्र महासभेचे (UNGA) ८१ वे अधिवेशन अत्यंत महत्त्वाच्या जागतिक घडामोडींच्या पार्श्वभूमीवर पार पडत आहे. या उच्चस्तरीय जागतिक बैठकीदरम्यान एक अशी घटना घडली, ज्यामुळे पाकिस्तानचा दहशतवादाबाबतचा दुटप्पी चेहरा आणि गुप्त अजेंडा पुन्हा एकदा संपूर्ण जगासमोर उघडा पडला आहे. गुरुवारी संयुक्त राष्ट्रांच्या अधिवेशनात सहभागी होण्यासाठी आलेले पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांना आंतरराष्ट्रीय पत्रकारांनी दहशतवाद आणि कुख्यात दहशतवादी हाफिज सईद याच्यावर उघडपणे प्रश्न विचारले. मात्र, या प्रश्नांचे उत्तर देण्याचे धाडस न दाखवता शहबाज शरीफ मौन बाळगून वेगाने पुढे निघून गेले. या संपूर्ण प्रकाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड वेगाने व्हायरल होत असून जगभरातून पाकिस्तानवर टीकेची झोड उठत आहे.

  • 25 Sep 2026 03:15 PM (IST)

    25 Sep 2026 03:15 PM (IST)

    Raigad News: माणगावकरांच्या नळाला गढूळ पाणी! नागरिक नाराज, नगरपंचायतीकडून तातडीच्या सूचना

    उतेखोल / माणगाव: माणगाव नगरपंचायत हद्दीतील नागरिकांना सध्या मातीमिश्रित गढूळ रंगाचे पाणीपुरवठा होत असल्याने माणगावकर महिलांसह नागरिकांमध्ये नाराजीचा सूर उमटला आहे. या गढूळ पाण्याबाबत नगरपंचायतीकडून नागरिकांना माहिती अथवा दवंडी देण्यास विलंब झाल्यानेही नाराजी व्यक्त होत आहे.

  • 25 Sep 2026 03:01 PM (IST)

    25 Sep 2026 03:01 PM (IST)

    सर्वोच्च ₹75 लाखांचे पॅकेज अन् जागतिक मान्यता! SPJIMR कडून PGDM प्रवेशाची घोषणा; ‘ही’ आहे शेवटची तारीख

    SPJIMR PGDM Admission : भारतीय विद्या भवनच्या एस.पी. जैन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्चने शैक्षणिक सत्र २०२७-२०२९ साठी आपल्या Post Graduate Diploma in Management (PGDM) आणि Post Graduate Diploma in Management (Business Management) (PGDM (BM)) ) प्रोग्राम्सकरिता अर्ज प्रक्रिया सुरू केली आहे.  ( SPJIMR PGDM Admission) 

  • 25 Sep 2026 02:59 PM (IST)

    25 Sep 2026 02:59 PM (IST)

    राजकारणात जाणार का? विद्यानंद बापट म्हणाले, "आम्ही सर्व समविचारी एकत्र येऊन ठरवू..."

    भविष्यात जर राजकारणात जाण्याची संधी मिळाली किंवा इच्छा झाली, तर कोणत्या पक्षाचे काम करणार? या प्रश्नावर विद्यानंद बापट यांनी, "जर भविष्यात तसे ठरलेच, तर तो सामूहिक निर्णय असेल. आम्ही सर्व समविचारी एकत्र येऊन ठरवू. जर निर्णय झालाच, तर कोणत्या विशिष्ट पक्षाकडून लढायचे की अपक्ष लढायचे, कोणती निवडणूक आणि कोणत्या पातळीवर लढायची, हे सर्व मुद्दे त्याच वेळी ठरतील. सध्या तरी बापट राजकारणात जाणार नाहीत, तसा विचार नाही."

  • 25 Sep 2026 02:51 PM (IST)

    25 Sep 2026 02:51 PM (IST)

    MPSC पेपरफुटी प्रकरणात मुंबई गुन्हे शाखेकडून आणखी 4 जणांना अटक

    MPSC च्या औषध निरीक्षकपरीक्षा पेपरफुटी प्रकरणात मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने आणखी चार आरोपींना अटक केली आहे. SIT ने कारवाई करत दोन मध्यस्थ आणि दोन उमेदवारांना अटक केली आहे.

  • 25 Sep 2026 02:40 PM (IST)

    25 Sep 2026 02:40 PM (IST)

    गणेश विसर्जन मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील 'या' ठिकाणी 'नो-पार्किंग'

    पुणे शहराच्या मध्यवर्ती भागात आज गणेश विसर्जन मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर पुणे वाहतूक पोलिसांनी मोठ्या प्रमाणावर वाहतुकीत बदल केलेत. त्यानुसार शुक्रवारी (ता.२५) सकाळपासून विसर्जन मिरवणूक संपेपर्यंत शहरातील १७ प्रमुख रस्ते वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहेत. लक्ष्मी रोड, केळकर रोड, कुमठेकर रोड, टिळक रोड, बाजीराव रोड, शिवाजी रोड, शास्त्री रोड, जंगली महाराज रोड, कर्वे रोड आणि फर्ग्युसन कॉलेज रोड येथे नो-पार्किंग लागू करण्यात आलं आहे.

  • 25 Sep 2026 02:31 PM (IST)

    25 Sep 2026 02:31 PM (IST)

    'महानगर टेलिफोन निगम लिमिटेड'ला मुंबई उच्च न्यायालयाचा दणका

    भाईंदरमधील ६,९०० चौरस मीटर जमिनीचा भाग 'महानगर टेलिफोन निगम लिमिटेड'साठी (MTNL) संपादित केल्यानंतर ३७ वर्षांनी, या जागेसाठी जमीनमालकांना योग्य नुकसानभरपाई देण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने प्राधिकरणाला दिले आहेत. १९८९ पासून या जमिनीचा ताबा एमटीएनएलकडे होता आणि त्यांनीच जमीन मालकांना नुकसानभरपाई द्यावी, असेही न्यायालयाने स्पष्ट केले आहे.

  • 25 Sep 2026 02:20 PM (IST)

    25 Sep 2026 02:20 PM (IST)

    राज्यात दोन टप्प्यांत दुष्काळ जाहीर होण्याची शक्यता : पहिल्या टप्प्यातील 139 पात्र तालुक्यांची यादीच समोर

    पावसाअभावी राज्यातील १३७ लाख हेक्टरपैकी सुमारे ९० लाख हेक्टरवरील खरीप पिके वाया गेली. या पार्श्वभूमीवर पावसाचा २१ दिवसांपेक्षा जास्त खंड आणि सरासरीच्या ५० टक्क्यांपेक्षा कमी पाऊस झालेल्या १३९ तालुक्यांमध्ये दुष्काळाचा पहिला ट्रिगर लागू करण्यासारखी स्थिती आहे. कृषी विभागाने हा अहवाल सरकारला सादर केला आहे. दुसरीकडे, दुसरा ट्रिगर लागू करण्यासाठी या तालुक्यांची यादी 'एमएनसीएफसी'ला (महालनोबिस राष्ट्रीय पीक अंदाज केंद्र) दिली आहे.

  • 25 Sep 2026 02:11 PM (IST)

    25 Sep 2026 02:11 PM (IST)

    पुन्हा बॅलेट पेपरवरच निवडणूक घ्या - राज ठाकरे

    ज्ञानेश्वरांनी रेड्याकडून वेद वदवले होते. आता सत्तेतले रेडे या ज्ञानेशाकडून आपले वेद (?) वदवतायंत. असो, गेले २ दिवस ज्ञानेश कुमार हे गप्प झालेत आणि त्यांना बोलतं करणारे पण कुठेच दिसत नाहीयेत. ज्ञानेश कुमार यांच्यासारख्याना हाताशी धरून आपण कसे सत्तेचा अमरपट्टा घेऊन आलोत हे भारतीय जनता पक्ष सांगत होतं हे लक्षात आलं असेल. आणि यासाठी त्यांनी २०२५ पासून एसआयआर हे नवं अस्त्र हाती घेतलं आहे. एसआयआरमध्ये काय घोळ झालेत आणि यावर निवडणूक आयुक्तच बोलत आहेत हे बघितल्यावर, एकच पर्याय दिसतो तो म्हणजे ही एसआयआरची संपूर्ण प्रक्रियाच रद्द केली गेली पाहिजे. आणि यासाठी देशातील सर्व विरोधी पक्षांनी एकत्र यायला हवं.

  • 25 Sep 2026 01:55 PM (IST)

    25 Sep 2026 01:55 PM (IST)

    तब्बल 200 दिवसांची व्हॅलिडिटी अन् भरपूर डेटा… ‘या’ जिओ प्लॅनची यूजर्सना पडणार भूरळ

    तुम्ही देखील रिलाअंस जिओचे (Jio) सिमकार्ड वापरता का? तुम्ही देखील असा एखादा रिचार्ज प्लॅन शोधत आहात का, जो दिर्घकाळ व्हॅलिडीटी ऑफर करतो? तर आता तुमचा शोध संपणार आहे. कारण आता आम्ही तुम्हाला जिओच्या पोर्टफोलिओमध्ये उपलब्ध असलेल्या अशा एका रिचार्ज प्लॅनबद्दल सांगणार आहोत, जो तब्बल 200 दिवसांची व्हॅलिडीटी ऑफर करतो. म्हणजेच हा प्लॅन खरेदी केल्यानंतर तुम्हाला 6 ते 7 महिने रिचार्जची चिंता करण्याची गरज नाही. वाचा सविस्तर.

  • 25 Sep 2026 01:45 PM (IST)

    25 Sep 2026 01:45 PM (IST)

    शिक्षक भरतीचा बिगुल वाजला! 32,388 पदांसाठी आजपासून अर्ज सुरू

    जाहिरात आणि तारखा कोणत्या आहेत?

    BPSC ने यासाठी जाहिरात क्रमांक 15/2026 काढला आहे. याची पूर्ण माहिती आयोगाच्या साईटवर टाकली आहे.ऑनलाईन अर्ज कधीपासून सुरू होणार? तर अर्ज भरण्याची प्रोसेस 25 सप्टेंबर 2026 पासून सुरू झाली आहे. आणि शेवटची तारीख 26 ऑक्टोबर 2026 आहे. तुम्हाला जवळपास एक महिना वेळ मिळणार आहे. फी भरण्याची शेवटची तारीख 25 ऑक्टोबर आहे. आधी फी भरा आणि मग फॉर्म भरा, नाहीतर शेवटच्या दिवशी गडबड होईल.

    परीक्षा कधी होणार?

    आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न म्हणजे परीक्षा कधी होणार? तर आयोगाने अजून परीक्षेची तारीख जाहीर केलेली नाही. सध्या कॅलेंडर मध्ये TBD म्हणजे तारीख ठरवायची आहे असं लिहिलं आहे. आयोगाचं म्हणणं आहे की आधी जाहिरातीचा कालावधी संपेल, सगळ्यांचे फॉर्म आले की मग परीक्षेचं वेळापत्रक जाहीर करतील. त्यामुळे फॉर्म भरून तुम्ही अभ्यासाला लागा.

  • 25 Sep 2026 01:35 PM (IST)

    25 Sep 2026 01:35 PM (IST)

    मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची मोठी घोषणा; आता ईव्हीएमविरोधात करणार जनआंदोलन

    निवडणूक आयोगाच्या कारभाराबद्दल मी आणि माझा पक्ष गेल्या अनेक दिवसांपासून जे सांगत होतो ते आता स्पष्टपणे समोर आले आहे. आयोगाला हाताला धरून एसआयआर आणि मतदारयाद्या यात घोटाळे करून भाजपने निवडणुका कशा जिंकल्या हे आता दिसलेच आहे. मुख्य निवडणूक आयुक्तांचा राजीनामा हा तर व्हायलाच हवा, पण या असल्या कणाहीन निवडणूक आयोगाला हाताशी धरून जे सरकार निवडून आले त्या सरकारने राजीनामा द्यायला हवा, अशी मागणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली आहे.

  • 25 Sep 2026 01:22 PM (IST)

    25 Sep 2026 01:22 PM (IST)

    बनावट दारूचा गोरखधंदा उघडकीस! दोघांना घेतले ताब्यात; तब्बल ४ लाखांचा मुद्देमाल जप्त

    उमरगा तालुक्यातील येणेगुर परिसरात बनावट देशी-विदेशी दारू तयार करून तिची वाहतूक व विक्री केली जात असल्याचा प्रकार मुरूम पोलिसांच्या कारवाईत समोर आला आहे. सोलापूर-येणेगुर मार्गावर सापळा रचून पोलिसांनी बुधवारी रात्री दारू वाहतूक करणारे वाहन पकडले. या कारवाईत १९ बॉक्स व ८ बाटल्या दारूसह वाहन असा एकूण ४ लाख ३३ हजार ४० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी अमर प्रकाश येडगे (रा. येणेगुर) आणि काशीनाथ दिगंबर देवकर (रा. करवंजी) यांच्याविरुद्ध दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे.

  • 25 Sep 2026 01:13 PM (IST)

    25 Sep 2026 01:13 PM (IST)

    फक्त भारतातच नाही, UPI सेवा असलेल्या 11 देशांमध्येही लागणार चार्जेस

    नवीन यूपीआय मर्चंट डिस्काउंट रेट म्हणजेच MDR वरून भारतात सध्या बराच गदारोळ सुरू आहे. देशभरातील व्यापारी आणि व्यावसायिक संघटना यावर तीव्र नाराजी व्यक्त करत आहेत. परिस्थिती इतकी चिघळली आहे की, व्यापाऱ्यांनी २ ऑक्टोबर रोजी ‘No UPI Day’ पाळण्याचा निर्णय घेतला आहे. या काळात दुकानदार ग्राहकांकडून UPI द्वारे पेमेंट स्वीकारणार नाहीत आणि त्यांच्या दुकानांमधील UPI बोर्ड एकतर काढून टाकतील किंवा काळ्या कापडाने झाकून टाकतील.

  • 25 Sep 2026 12:59 PM (IST)

    25 Sep 2026 12:59 PM (IST)

    काळाचौकीच्या महागणपतीवर श्रॉफ बिल्डिंगकडून पुष्पवृष्टी

    काळाचौकीच्या महागणपतीवर श्रॉफ बिल्डिंगकडून पुष्पवृष्टी

    पुष्पवृष्टीची श्रॉफ बिल्डिंगची अनेक वर्षांची परंपरा

    महागणपती हजारो मुंबईकरांच्या उपस्थितीत विसर्जन मिरवणूक

  • 25 Sep 2026 12:56 PM (IST)

    25 Sep 2026 12:56 PM (IST)

    गिरगावाच्या राजाची विसर्जन मिरवणूक मार्गस्थ

    गिरगावाच्या राजाची विसर्जन मिरवणूक मार्गस्थ, रात्रीपर्यंत विसर्जन होणार

    पारंपरिक पद्धतीने गुलालाची उधळण करत मिरवणूक निघाली

    अंदाजे ४ टन गणेशाची पर्यावरणपूरक मूर्ती पाहण्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा गर्दी

  • 25 Sep 2026 12:42 PM (IST)

    25 Sep 2026 12:42 PM (IST)

    ४५ अंशात झुकलेली बॅलेन्सिंग गणपतीची मूर्ती पाहण्यासाठी भाविकांची गर्दी

    परळचा महाराजा, परळचा सम्राट आणि परळच्या लंबोदराची विसर्जन मिरवणूक तालवाद्यांच्या नादात

    ४५ अंशात झुकलेली बॅलेन्सिंग गणपतीची मूर्ती पाहण्यासाठी भाविकांची गर्दी

  • 25 Sep 2026 12:17 PM (IST)

    25 Sep 2026 12:17 PM (IST)

    लालबागचा राजा विसर्जन सोहळ्याला सुरुवात

    लालबागचा राजा विसर्जन सोहळ्याला सुरुवात झाली आहे. ढोल ताशांच्या गजरात विसर्जन सोहळ्याला सुरुवात झाली आहे. मंडपाबाहेर भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे.

  • 25 Sep 2026 11:50 AM (IST)

    25 Sep 2026 11:50 AM (IST)

    लालबागचा राजा मंडपाबाहेर पोलिसांचा बंदोबस्त

    लालबागच्या राजाची विसर्जन मिरवणूक थोड्याच वेळात सुरु होणार आहे. मिरवणूकीची तयारी पूर्ण झाली आहे. मंडपाबाहेर भाविकांची मोठी गर्दी झाली आहे. तसेच सर्वत्र पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त पाहायला मिळत आहे.

  • 25 Sep 2026 11:46 AM (IST)

    25 Sep 2026 11:46 AM (IST)

    लालबागचा राजा विसर्जन मिरवणुकीला थोड्याच वेळात होणार सुरुवात

    लालबागचा राजा विसर्जन मिरवणुकीला थोड्याच वेळात सुरुवात होणार आहे. मंडपाच्या बाहेर भाविकांची मोठी गर्दी झाली आहे. ढोल - ताशांच्या गजरात थोड्याच वेळात मिरवणुकीला सुरुवात होणार आहे.

  • 25 Sep 2026 11:45 AM (IST)

    25 Sep 2026 11:45 AM (IST)

    ‘माझ्याविरोधात प्लॅन आखला जातोय…’; राणी स्वर्णकारसोबतच्या अफेअरच्या चर्चांवर गोविंदाने सोडलं मौन

    बॉलिवूडचा ‘हिरो नंबर 1’ गोविंदा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. यावेळी त्याच्या कोणत्याही चित्रपटामुळे नव्हे, तर अभिनेत्री आणि सहकलाकार कोमल राणी स्वर्णकरसोबत लालबागच्या राजाच्या दर्शनाला गेल्यामुळे तो चर्चेत आहे. २२ सप्टेंबर रोजी गोविंदा आणि कोमल राणी मुंबईतील प्रसिद्ध लालबागच्या राजाच्या दरबारात एकत्र पोहोचले होते. दोघांचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर त्यांच्या कथित नात्याबाबत पुन्हा चर्चा सुरू झाली.

  • 25 Sep 2026 11:35 AM (IST)

    25 Sep 2026 11:35 AM (IST)

    दमदार फीचर्ससह MIVI ONE 5G ची भारतात एंट्री, स्वस्त पर्याय शोधणाऱ्यांसाठी ठरणार परफेक्ट! जाणून घ्या किंमत

    भारतीय इलेक्ट्रॉनिक्स ब्रँड MIVI ने बजेट फ्रेंडली स्मार्टफोन पर्याय शोधणाऱ्या ग्राहकांसाठी एक खास सरप्राईज आणले आहे. कंपनीने भारतात त्यांचा नवा स्मार्टफोन लाँच केला आहे. कंपनीचा हा स्मार्टफोन MIVI ONE 5G या नावाने लाँच करण्यात आला आहे. तुम्ही नवीन स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल आणि तुमचे बजेट 15 हजार रुपये असेल तर मिवी वन 5G तुमच्यासाठी एक चांगला पर्याय ठरू शकतो. कंपनीने लाँच केलेल्या या नव्या स्मार्टफोनचे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स जाणून घेऊया.

  • 25 Sep 2026 11:25 AM (IST)

    25 Sep 2026 11:25 AM (IST)

    भारतीय रणरागिणींचा धडाका! जपान चारीमुंड्या चीत; महिला कबड्डी संघाची शानदार विजयाची हॅट्ट्रिक

    जपानमध्ये सुरू असलेल्या एशियन गेम्स 2026 स्पर्धेत भारतीय महिला कबड्डी संघाने जपानला पराभूत केले आहे. तसेच यासह भारतीय संघाने ग्रुप ए मध्ये सलग तिसरा विजय प्राप्त केला आहे. भारतीय महिला कबड्डी संघाने जपानचा 50-25 असा पराभव केला आहे. याधीच भारताने सेमीफायनलमध्ये प्रवेश केला आहे.

  • 25 Sep 2026 11:16 AM (IST)

    25 Sep 2026 11:16 AM (IST)

    विसर्जन मिरवणुकीवर पोलिसांची करडी नजर! 6500 हून अधिक जवान तैनात; CCTV अन् Drone ने देखरेख

    गेले बारा दिवस मनोभावे सेवा केल्यानंतर लाडक्या गणरायाला निरोप देण्यासाठी वसई-विरार शहर पूर्णपणे सज्ज झाले आहे. अनंत चतुर्दशीच्या दिवशी शहरात निघणाऱ्या विसर्जन मिरवणुका शांततेत आणि निर्विघ्नपणे पार पडाव्यात, यासाठी वसई-विरार महापालिका आणि मीरा-भाईंदर-वसई-विरार पोलिस आयुक्तालयाने चोख नियोजन केले आहे. महापालिकेचे ४ हजारांहून अधिक कर्मचारी आणि पोलिसांचा अडीच हजारांहून अधिक फौजफाटा असा साडेसहा हजारांचा बंदोबस्त शहरात तैनात करण्यात आला आहे. 

  • 25 Sep 2026 11:13 AM (IST)

    25 Sep 2026 11:13 AM (IST)

    बेंटले टॉर्कल इलेक्ट्रिक कारचे मार्केटमध्ये दाखल! 600 km रेंज, 876 bhp पॉवर आणि 2.9 सेकंदात 0-100 kmph

    ब्रिटिश लक्झरी कार निर्माता बेंटलेने आपली पहिली पूर्णपणे इलेक्ट्रिक कार टॉर्कल सादर केली आहे. ही नवीन SUV कंपनीच्या सध्याच्या मॉडेल लाइनअपमध्ये चौथे मॉडेल ठरते. टॉर्कल आणि टॉर्कल S अशा दोन आवृत्त्यांमध्ये ती उपलब्ध होणार असून, कंपनीने इलेक्ट्रिक लक्झरीसोबत जबरदस्त परफॉर्मन्सवरही भर दिला आहे. अधिकृत माहितीनुसार टॉर्कलची रेंज 600 km पर्यंत आहे.

  • 25 Sep 2026 10:52 AM (IST)

    25 Sep 2026 10:52 AM (IST)

    2 मिनिटांत भारताला मिळाले गोल्ड आणि सिल्व्हर पदक, 5 शूटर्सची कमाल

    उत्सव साजरा करा, आनंदात रमून जा अशीच सध्या भारतीयांची मनाची  स्थिती आहे. एका बाजूला गणपतीची धुमधाम सुरू आहे तर दुसऱ्या बाजूला २०२६ च्या आशियाई क्रीडा स्पर्धेत दिवसाची सुरुवात यापेक्षा चांगली होऊच शकली नसती. 

    अवघ्या दोन मिनिटांत भारताने नेमबाजीत एक सुवर्ण आणि एक रौप्य अशी दोन पदके जिंकली. यामुळे भारतीय संघाने आशियाई क्रीडा स्पर्धेच्या पदकतालिकेत एक मोठी झेप घेतली आहे. यापूर्वी, एका सुवर्णपदकासह भारत १५ व्या क्रमांकावर होता, पण आता तो १२ व्या क्रमांकावर पोहोचला आहे. यावेळी भारताच्या खेळाडूंनी कमालीची कामगिरी करत भारतीयांचे मन जिंकून घेतलते आहे.

  • 25 Sep 2026 10:42 AM (IST)

    25 Sep 2026 10:42 AM (IST)

    मंगळुरू एक्सप्रेसमधून दारूची तस्करी; रेल्वे अटेंडंटकडून ७१ हजारांचा मद्यसाठा जप्त

    ठाणे रेल्वे स्थानकात राज्य उत्पादन शुल्क विभागाने मंगळवारी धडक कारवाई करत परराज्यातून चालणारी विदेशी मद्याची तस्करी उधळून लावली आहे. मंगळुरू एक्सप्रेसमधून उतरलेल्या एका रेल्वे अटेंडंटला ताब्यात घेऊन त्याच्याकडून तब्बल ७१ हजार ५६० रुपये किमतीचा गोवा बनावटीचा अवैध विदेशी मद्यसाठा जप्त करण्यात आला आहे. फलाट क्रमांक ८ वर सापळा रचून ही कारवाई करण्यात आली असून आरोपीला न्यायालयाने एक दिवसाची उत्पादन शुल्क कोठडी सुनावली आहे.

  • 25 Sep 2026 10:32 AM (IST)

    25 Sep 2026 10:32 AM (IST)

    भारतीय महिला हॉकी टीमने लावला विजयाचा चौकार, जपानला नमवून सेमीफायनलमध्ये भरारी

    भारतीय महिला हॉकी संघाने जपानला ३-१ ने पराभूत करून २०२६ च्या आशियाई क्रीडा स्पर्धेत आपला सलग चौथा विजय नोंदवला. या विजयामुळे भारतीय संघ ‘पूल बी’ मध्ये अव्वल स्थानी पोहोचला असून उपांत्य फेरीतील आपले स्थान निश्चित झाले आहे. भारताने यापूर्वी आपल्या सर्व प्रतिस्पर्ध्यांना मोठ्या फरकाने पराभूत केले होते आणि गोलचा वर्षाव केला होता. या सामन्यात भारतासाठी लालरेम्सियामी, इशिका आणि नवनीत यांनी गोल केले, तर जपानसाठी शिहो कोबायाकावाने एकमेव गोल केला. उपांत्य फेरीपूर्वी भारताचा सामना सिंगापूरशी होईल, जो सामना भारत सहज जिंकू शकतो.

  • 25 Sep 2026 10:22 AM (IST)

    25 Sep 2026 10:22 AM (IST)

    ज्ञानेश कुमारांविरोधात महाभियोगाची तयारी! काँग्रेसचा देशव्यापी मोर्चा, विरोधी पक्ष आक्रमक

    केंद्रीय निवडणूक आयोगाचे (ECI) मुख्य निवडणूक  आयुक्त ज्ञानेश कुमार आणि इतर दोन निवडणूक आयुक्तांमध्ये एसआयआरच्या मुद्द्यावरून झालेले मतभेद चव्हाट्यावर आल्याने संपूर्ण देशात एकच खळबळ माजली आहे. काल लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेत पुन्हा एकदा निवडणूक प्रक्रियेतील फेरफारीचा मुद्दा उपस्थित करत निवडणूक ज्ञानेश कुमार आणि केंद्र सरकारवर गंभीर आरोप केले. त्यानंतर आता देशातील वातावरण चांगलेच तापले आहे. ज्ञानेश कुमार यांची निवडणूक आयोगातील मनमानी कारभार आणि निवडणूक प्रक्रियेतील विरोधात संपूर्ण देशभरात संतापाची लाट उसळली आहे.

  • 25 Sep 2026 09:30 AM (IST)

    25 Sep 2026 09:30 AM (IST)

    Muthoot Fincorp Team India Title Sponsor : भारतीय क्रिकेट संघाला नवा टायटल स्पॉन्सर! मुथूट फिनकॉर्पकडे टायटल प्रायोजकत्वाचे हक्क 

     Muthoot Fincorp Team India Title Sponsor :  भारत आणि वेस्ट इंडिज (India vs West Indies) यांच्यात सुरू होणाऱ्या आगामी एकदिवसीय (ODI) मालिकेपूर्वी भारतीय क्रिकेट संघाच्या (Team India) टायटल स्पॉन्सरशिपबाबत (Title Sponsorship) एक अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 'मुथूट फिनकॉर्प' (Muthoot Fincorp) या आघाडीच्या वित्तीय संस्थेने पुढील दोन देशांतर्गत (Domestic) हंगामांसाठी भारतीय क्रिकेट संघाच्या टायटल स्पॉन्सरशिपचे अधिकार मिळवले आहेत.

  • 25 Sep 2026 09:20 AM (IST)

    25 Sep 2026 09:20 AM (IST)

    Gyanesh Kumar  Kolhapur Bench Bombay High Court: ज्ञानेश कुमार यांच्या निर्णयांना आव्हान देणारी याचिका कोल्हापूर खंडपीठात दाखल 

    Gyanesh Kumar  Kolhapur Bench Bombay High Court: देशभरात भारतीय निवडणूक आयोगाच्या (ECI) कारभारावरून आणि पारदर्शकतेवरून राजकीय वातावरण तापलेले असतानाच, आता थेट मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार (Chief Election Commissioner Gyanesh Kumar) यांच्या अडचणीत मोठी भर पडली आहे. ज्ञानेश कुमार यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक आयोगाने घेतलेले काही अत्यंत महत्त्वाचे निर्णय आणि प्रशासकीय प्रक्रियांना थेट कायदेशीर आव्हान देणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठात (Kolhapur Bench) दाखल करण्यात आली आहे. निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकता आणि उत्तरदायित्वाच्या दृष्टीने ही याचिका अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे

  • 25 Sep 2026 09:12 AM (IST)

    25 Sep 2026 09:12 AM (IST)

    SBI Cash Withdrawal Rules: १ ऑक्टोबरपासून कॅश काढण्याचे नियम बदलणार 

    SBI Cash Withdrawal Rules:  देशातील सर्वात मोठी सार्वजनिक क्षेत्रातील बँक असणाऱ्या 'भारतीय स्टेट बँकेने' (SBI) आपल्या ग्राहकांसाठी सेवा शुल्कात मोठा बदल केला आहे. १ ऑक्टोबर २०२६ पासून रोख रक्कम (Cash) काढण्याच्या नियमांमध्ये हे सुधारित दर लागू केले जाणार आहेत. ठरवून दिलेल्या मोफत मर्यादेपेक्षा (Free Limit) जास्त वेळा रोख रक्कम काढल्यास ग्राहकांना आता प्रत्येक अतिरिक्त व्यवहारावर शुल्क भरावे लागणार आहे.

    बँकेने स्पष्ट केले आहे की, हा नियम नेहमीच्या सामान्य बचत खात्यांना लागू नसून केवळ शाखांद्वारे उघडण्यात आलेल्या बेसिक सेव्हिंग्स बँक डिपॉझिट (BSBD) खात्यांसाठी लागू करण्यात आला आहे.

  • 25 Sep 2026 09:06 AM (IST)

    25 Sep 2026 09:06 AM (IST)

    Maharashtra Student Union Elections:  महाराष्ट्रात तब्बल ३३ वर्षांनंतर विद्यार्थी निवडणुकांचे वेध!  

    Maharashtra Student Union Elections :  महाराष्ट्रातील उच्च आणि तंत्रशिक्षण क्षेत्राबाबत एक अत्यंत महत्त्वाची आणि मोठी बातमी समोर येत आहे. राज्यातील महाविद्यालये आणि विद्यापीठांच्या आवारात विद्यार्थी निवडणुका (Student Union Elections) पुन्हा एकदा सुरू करण्याच्या दृष्टीने राज्य सरकारने अतिशय वेगाने हालचाली सुरू केल्या आहेत. या निवडणुका कशा आणि कोणत्या पद्धतीने पार पाडता येतील, याचा सविस्तर अभ्यास करून सर्वसमावेशक आराखडा तयार करण्यासाठी १२ सदस्यांची एक विशेष समिती स्थापन करण्यात आली आहे.

  • 25 Sep 2026 09:00 AM (IST)

    25 Sep 2026 09:00 AM (IST)

    दिवसाढवळ्या व्यापाऱ्यावर वार, स्वारगेटमधील सॅलसबरी पार्कजवळ लुटीचा प्रयत्न

    पुणे :  राज्यासह देशभरात गुन्हेगारी वाढली असून, वाढत्या गुन्हेगारीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये दहशत निर्माण होत आहे. अशातच आता पुणे शहरात गणेशोत्सवाची धामधुम सुरु असताना एका व्यापार्‍यावर भरदिवसा कोयत्याने वार करुन त्यांच्याकडील रोकड लुटण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेत व्यापारी गंभीररीत्या जखमी झाले असून त्यांना खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी स्वारगेट पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

     

  • 25 Sep 2026 08:52 AM (IST)

    25 Sep 2026 08:52 AM (IST)

    ट्रेनमध्ये अवाजवी सामान नेल्यास बसणार दंड! AC ते जनरल डब्यापर्यंत

    आपल्या भारतीयांना रेल्वेने प्रवास करताना भरपूर सामान घेऊन जाण्याची सवय आहे. तथापि, तुम्हाला माहिती आहे का? रेल्वेतून सामान वाहून नेताना रेल्वेच्या काही नियमांचे पालन करावे लागते. सामानासाठी रेल्वेकडून एक लिमिट निश्चित करण्यात आली आहे. या लिमिटच्या आधारावरच तुम्ही तुमच्या गरजेचे सामान प्रवासात घेऊन जाऊ शकता - वाचा सविस्तर

  • 25 Sep 2026 08:50 AM (IST)

    25 Sep 2026 08:50 AM (IST)

    उत्तर प्रदेश चक्रीवादळाच्या विळख्यात; 42 जिल्ह्यांसाठी मुसळधार पावसाचाही इशारा

    नवी दिल्ली : देशभरातील अनेक राज्यांत वातावरणात बदल जाणवत आहे. महाराष्ट्रात उन्हाच्या तीव्र कडाक्याने नागरिक हैराण झाले आहेत. राज्यातील नागरिकांना पावसाची अद्याप प्रतिक्षाच आहे. असे असताना आता उत्तर प्रदेशातील हवामान बदलले आहे. उत्तर प्रदेशात आता शुक्रवारी पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने १३ जिल्ह्यांसाठी अतिवृष्टीचा ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. २९ जिल्ह्यांसाठी मुसळधार पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. ५२ जिल्ह्यांमध्ये ताशी ४० ते ६० किमी वेगाने सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता आहे. गुरुवार संध्याकाळपर्यंत, प्रयागराजमध्ये २६ मिमी, सुलतानपूरमध्ये २०.८ मिमी, अमेठीमध्ये १९.८ मिमी आणि गोरखपूरमध्ये १४.२ मिमी पावसाची नोंद झाली. बाराबंकी, अयोध्या, गाझीपूर, बलिया, सोनभद्र आणि महाराजगंज येथेही पाऊस झाला.

Web Title: Marathi news breaking news live 25 september 2026 maharashtra india updates

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 25, 2026 | 08:39 AM

Topics:  

  • international news
  • maharashtra breaking news
  • Maharashtra Breaking News update
  • national news
  • Sports News

संबंधित बातम्या

Sport News: जिल्हास्तरीय टेनिकोईट स्पर्धेत माणगंगा स्कूलच्या मुलींचा डंका! दोन्ही संघांची विभागीय स्तरावर निवड
1

Sport News: जिल्हास्तरीय टेनिकोईट स्पर्धेत माणगंगा स्कूलच्या मुलींचा डंका! दोन्ही संघांची विभागीय स्तरावर निवड

IND vs NZ : पंत-राहुलच्या शतकांचा धमाका ! न्यूझीलंडची अवस्था बिकट, भारताची मोठी आघाडी कायम
2

IND vs NZ : पंत-राहुलच्या शतकांचा धमाका ! न्यूझीलंडची अवस्था बिकट, भारताची मोठी आघाडी कायम

Cricket News: राज गादियाचे शतक, योगेश पवारची फटकेबाजी! डीव्हीसीएचा १७१ धावांनी दणदणीत विजय
3

Cricket News: राज गादियाचे शतक, योगेश पवारची फटकेबाजी! डीव्हीसीएचा १७१ धावांनी दणदणीत विजय

अभिमानास्पद! अडचणी आल्या, पण जिद्द सोडली नाही; मीरा-भाईंदरच्या रेश्मा कुटे बनल्या पहिल्या महिला फुल आयर्नमॅन
4

अभिमानास्पद! अडचणी आल्या, पण जिद्द सोडली नाही; मीरा-भाईंदरच्या रेश्मा कुटे बनल्या पहिल्या महिला फुल आयर्नमॅन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.