Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 24 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra Today’s Live News in Marathi: विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाची पुन्हा शक्यता

२४ सप्टेंबरच्या महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रमुख घडामोडी. सणांमधील डीजे आणि फटाक्यांवर मुंबई उच्च न्यायालयाची बंदी, आशियाई खेळात भारतीय खेळाडूंची पदककमाई, राज्यातील दुष्काळी आढावा आणि हवामान विभागाचा पावसाचा इशारा यांसारख्या महत्त्वाच्या घडामोडी एकाच ठिकाणी वाचा.

  • By anuradha sagar
Updated On: Sep 24, 2026 | 10:07 AM
LIVE
Maharashtra Breaking News Today 24. 09.2026

Maharashtra Breaking News Today 24. 09.2026

Follow Us
Follow Us:
  • 24 Sep 2026 10:07 AM (IST)

    24 Sep 2026 10:07 AM (IST)

    Yamuna Expressway Bus Fire: यमुना एक्सप्रेसवेवर धावत्या स्लीपर बसला भीषण आग; ९ प्रवाशांचा होरपळून मृत्यू

    Yamuna Expressway Bus Fire:   उत्तर प्रदेशातील ग्रेटर नोएडा येथील जेवर पोलीस ठाण्याच्या हद्दीत यमुना एक्सप्रेसवेवर ४० ते ५० प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या एका धावत्या स्लीपर बसला अचानक भीषण आग लागून ९ प्रवाशांचा जागीच होरपळून मृत्यू झाला. या जीवघेण्या आगीतून वाचण्यासाठी अनेक प्रवाशांनी धावत्या बसमधून खाली उड्या मारल्या, ज्यात अनेक जण गंभीर जखमी झाले असून मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल आणि उत्तर प्रदेश पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत आग विझवण्याचे काम तसेच या अपघाताचा सखोल तपास सुरू केला आहे.

  • 24 Sep 2026 10:02 AM (IST)

    24 Sep 2026 10:02 AM (IST)

    Railway Pension Scheme Rules: रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी 'युनिफाइड पेन्शन स्कीम'चे नियम स्पष्ट 

    Railway Pension Scheme Rules:   नॅशनल पेन्शन सिस्टम (NPS) अंतर्गत येणाऱ्या रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी रेल्वे मंत्रालयाने 'युनिफाइड पेन्शन स्कीम' (UPS) संदर्भातील सविस्तर नियम अधिकृतपणे जाहीर केले आहेत. यामध्ये कर्मचाऱ्यांची पात्रता, कर्मचारी व सरकारचे नेमके योगदान, पेन्शनची गणना, कुटुंब निवृत्तीवेतन, स्वेच्छानिवृत्ती (VRS) तसेच युनिफाइड पेन्शन स्कीममधून पूर्ववत एनपीएसमध्ये जाण्याच्या नियमावलीबाबत पूर्ण स्पष्टता करण्यात आली आहे. रेल्वे प्रशासनाच्या या महत्त्वपूर्ण निर्णयामुळे लाखो कर्मचाऱ्यांना आपल्या भविष्यातील निवृत्तीवेतनाचे नियोजन करणे अधिक सोपे आणि स्पष्ट होणार आहे.

  • 24 Sep 2026 09:55 AM (IST)

    24 Sep 2026 09:55 AM (IST)

    IIT Bombay Student Death: साहिल वाकोडेचे  परीक्षेदरम्यानचे सीसीटीव्ही फुटेज  समोर

    IIT Bombay Student Death:  आयआयटी बॉम्बेमधील द्वितीय वर्षाचा विद्यार्थी साहिल वाकोडे याच्या आत्महत्या प्रकरणात एक अत्यंत महत्त्वाची माहिती समोर आली असून, त्याने टोकाचे पाऊल उचलण्यापूर्वी परीक्षा गृहात (एक्झाम हॉल) नेमकं काय घडलं होतं, याचे सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध झाले आहे. या फुटेजमध्ये परीक्षेदरम्यान एका प्राध्यापकांनी साहिलला थांबवून त्याच्याशी काही वेळ चर्चा केल्याचे स्पष्ट दिसत आहे. साहिलच्या या दुर्दैवी घटनेमागील कारणे शोधण्यासाठी पोलीस आणि प्रशासन या फुटेजच्या आधारे पुढील तपास वेगाने करत आहेत.

  • 24 Sep 2026 09:48 AM (IST)

    24 Sep 2026 09:48 AM (IST)

    Gautam Gambhir Statement: रोहित शर्मा अन् विराट कोहली २०२७ च्या विश्वचषकात खेळणार? 

    Gautam Gambhir Statement:   भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्या भविष्याबाबत अत्यंत महत्त्वपूर्ण वक्तव्य करत, आगामी २०२७ च्या एकदिवसीय विश्वचषकासाठी दोन्ही अनुभवी खेळाडू संघाच्या योजनांचा भाग असल्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत. २७ सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या वेस्ट इंडिजविरुद्धच्या तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेपूर्वी दिलेल्या एका मुलाखतीत गंभीर यांनी स्पष्ट केले की, २०२७ च्या विश्वचषकात खेळण्यासाठी दोघांनाही सातत्यपूर्ण कामगिरी दाखवावी लागणार आहे; तसेच याच मुलाखतीत त्यांनी या दोन दिग्गजांसोबत खेळणाऱ्या युवा फलंदाज शुभमन गिलचेही कौतुक केले.

  • 24 Sep 2026 09:42 AM (IST)

    24 Sep 2026 09:42 AM (IST)

    IPL 2027 Auction Venue: आयपीएलच्या लिलावाची तीन वर्षांनंतर भारतात वापसी 

    IPL 2027 Auction Venue:   इंडियन प्रीमियर लीगच्या (IPL) २०२७ च्या हंगामासाठीचा मिनी लिलाव डिसेंबर २०२६ मध्ये गोव्यात पार पडणार असून, बीसीसीआयने (BCCI) या लिलावाच्या स्थळावर अधिकृतपणे मंजुरी दिली आहे. गेल्या तीन वर्षांपासून (२०२४ - दुबई, २०२५ - जेद्दाह, सौदी अरेबिया आणि २०२६ - अबू धाबी) आयपीएलचा लिलाव भारताबाहेर परदेशात आयोजित केला जात होता; मात्र तब्बल तीन वर्षांनंतर आणि २०२३ मधील कोची लिलावानंतर हा लिलाव पुन्हा एकदा भारतात परतत आहे. लिलावाची निश्चित तारीख, अंतिम ठिकाण आणि हॉटेलबाबतची अधिकृत घोषणा बीसीसीआयकडून लवकरच केली जाणार असली, तरी या निर्णयामुळे क्रिकेटप्रेमींमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

  • 24 Sep 2026 09:36 AM (IST)

    24 Sep 2026 09:36 AM (IST)

    Ahilyanagar Ganpati Visarjan: गणेश विसर्जन मिरवणुकीत पोलिसांचा लाठीचार्ज; कार्यकर्त्याचा मृत्यू  

    Ahilyanagar Ganpati Visarjan: अहिल्यानगर शहरातील भिंगार उपनगर भागात गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान गुलाल उधळण्याच्या कारणावरून पोलिसांनी केलेल्या लाठीचार्जमध्ये एका गणपती मंडळाच्या कार्यकर्त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. दीपक वागसकर असे या मयत तरुणाचे नाव असून, पोलिसांच्या लाठीहल्ल्यामुळेच त्याचा जीव गेल्याचा गंभीर आरोप कार्यकर्त्यांनी केला आहे. या हिंसक घटनेनंतर संपूर्ण अहिल्यानगर शहरात प्रचंड संतापाची लाट पसरली असून सध्या शहरात अत्यंत तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे.

  • 24 Sep 2026 09:30 AM (IST)

    24 Sep 2026 09:30 AM (IST)

    Rain Update : सिंधुदुर्ग, कोल्हापूर, लातूरसह राज्यातील ‘या’ जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट जारी

    पुणे : सध्या वातावरणात कमालीचा बदल होताना दिसत आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. यामुळे देशातील काही राज्यांमध्ये मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. सिंधुदुर्ग, कोल्हापूर, कोल्हापूर घाट परिसर, सातारा घाट परिसर, छत्रपती संभाजीनगर, लातूरसह राज्यातील अनेक जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट जारी करण्यात आला आहे. राज्यातील अनेक भागांत अपेक्षेपेक्षा कमी पाऊस झाला आहे. त्यात धाराशिव, लातूर, सोलापूर या जिल्ह्यांमध्ये तर प्रचंड कमी पाऊस पडला आहे. यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. अशा परिस्थितीत हवामान विभागाकडून राज्यात पावसाचा इशारा देण्यात आल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांसह शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे

  • 24 Sep 2026 09:19 AM (IST)

    24 Sep 2026 09:19 AM (IST)

    salary of village employment : ग्राम रोजगार सहाय्यकांच्या वेतनात वाढ

    मुंबई : ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या अंमलबजावणीत महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या ग्राम रोजगार सहाय्यकांच्या मानधन आणि सेवा अटींचा प्रलंबित प्रश्न अखेर मार्गी लागला आहे. आता या सहाय्यकांना दरमहा ८ हजार रुपये मानधन, वर्षाला किमान ६ हजार मनुष्यदिवस निर्मितीचे लक्ष्य आणि १० हजारांपेक्षा अधिक मनुष्यदिवस निर्माण करणाऱ्यांना २ टक्के प्रोत्साहनपर भत्ता देण्याबाबत नवीन नियमावली शासनाने जाहीर केली आहेत.

Maharashtra to World Breaking News :

येत्या २८ ते ३० सप्टेंबर दरम्यान प्रस्तावित बँक संप लक्षात घेता रिझर्व्ह बँकेने रविवारी (२७ सप्टेंबर) सार्वजनिक बँका सुरू ठेवण्यास मंजुरी दिली. हवामान तज्ज्ञांच्या अंदाजानुसार विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाची पुन्हा शक्यता वर्तवण्यात आली आहे.

आशियाई स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी मार्शल आर्ट्स आणि रोईंग स्पर्धांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करत पदकांची कमाई केली.  सर्वोच्च न्यायालयात राजकीय पक्षांच्या चिन्हाशी संबंधित महत्त्वाच्या याचिकेवर आज सुनावणी पार पडणार.

जागतिक घडामोडींच्या पार्श्वभूमीवर संयुक्त राष्ट्रांच्या (UNGA) महासभेत विविध देशांच्या राष्ट्रप्रमुखांची चर्चा सुरू. संत बाळूमामा देवस्थान ट्रस्ट घोटाळा प्रकरणात प्रशासनाकडून मोठी कारवाई करत पाच जणांना अटक करण्यात आली.

Web Title: Maharashtra and india breaking news live updates 24 september 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 24, 2026 | 09:17 AM

Topics:  

  • international news
  • maharashtra breaking news
  • Maharashtra Politics
  • national news

संबंधित बातम्या

BJP New Incharge List 2026: भाजपमध्ये मोठे संघटनात्मक फेरबदल; विनोद तावडेंकडे उत्तर प्रदेश, बैजयंत पांडा महाराष्ट्राचे प्रभारी
1

BJP New Incharge List 2026: भाजपमध्ये मोठे संघटनात्मक फेरबदल; विनोद तावडेंकडे उत्तर प्रदेश, बैजयंत पांडा महाराष्ट्राचे प्रभारी

Pune MLC Election 2026: पुणे पदवीधरसाठी भाजप कोणाला देणार संधी?! महाविकास आघाडीतही इच्छुकांची रांग
2

Pune MLC Election 2026: पुणे पदवीधरसाठी भाजप कोणाला देणार संधी?! महाविकास आघाडीतही इच्छुकांची रांग

ECI Clarification On SIR : निवडणूक आयोगात मतभेद? ‘SIR’ प्रक्रियेबाबत केंद्रीय निवडणूक आयोगाने मोठे स्पष्टीकरण!
3

ECI Clarification On SIR : निवडणूक आयोगात मतभेद? ‘SIR’ प्रक्रियेबाबत केंद्रीय निवडणूक आयोगाने मोठे स्पष्टीकरण!

BJP MLA Son Missing: भाजप आमदाराचा मुलगा बेपत्ता; अपहरण,दहशतवादाचा संशय अन् नाट्यमय घडामोडी
4

BJP MLA Son Missing: भाजप आमदाराचा मुलगा बेपत्ता; अपहरण,दहशतवादाचा संशय अन् नाट्यमय घडामोडी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.