
Maharashtra Breaking News Today 26. 09.2026
26 Sep 2026 10:55 AM (IST)
२६ सप्टेंबरच्या सकाळी भारतीय सराफा बाजारात सोन्याच्या दरात पुन्हा एकदा मोठी वाढ दिसून आली आहे. डॉलरची कमजोरी आणि कच्च्या तेलाच्या किमतीतील घसरणीमुळे देशांतर्गत बाजारात सोन्याच्या दरात वाढ झाली आहे. राष्ट्रीय राजधानी दिल्लीत, २४-कॅरेट सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅम ₹१,५३,००० वर पोहोचला आहे, तर २२-कॅरेट सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅम ₹१,४०,२६० नोंदवला गेला आहे.
सोन्याच्या दरात घसरण
मुंबई, कोलकाता, चेन्नई, पुणे आणि बंगळूरु यांसारख्या प्रमुख शहरांमध्ये, २४-कॅरेट सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅम ₹१,५२,८५० आहे. तथापि, जागतिक दबावामुळे साप्ताहिक आधारावर सोन्याच्या दरात २.५ टक्क्यांपर्यंत घट झाली आहे. दरम्यान, चांदीच्या दरात घसरण सुरूच आहे. चांदीचा भाव प्रति किलो ₹२,४४,९०० पर्यंत घसरला आहे, म्हणजेच एका आठवड्यात सुमारे १०,००० रुपयांची घट झाली आहे.
26 Sep 2026 10:50 AM (IST)
जपानमध्ये आयोजित होत असलेल्या आशियाई क्रिडा स्पर्धा २०२६ मध्ये क्रिकेटच्या चाहत्यांसाठी मोठी बातमी आता समोर आली आहे. आशियाई क्रिडामध्ये पुरुष क्रिकेट स्पर्धामध्ये भारतीय टीमने आपले स्थान मिळवले असून आता विरूद्ध संघाचे नावही समोर आले आहे. भारतीय संघाचा २८ सप्टेंबर रोजी हाय वॉल्टेज ड्रामा असणारा हा सामना ठरणार आहे.
26 Sep 2026 10:40 AM (IST)
व्हिडीओ स्ट्रिमिंग प्लॅटफॉर्म युट्यूब पुन्हा एकदा त्यांच्या यूजर्सचा अनुभव बदलण्यासाठी सज्ज झाला आहे. कंपनीने त्यांच्या मेड ऑन युट्यूब ईव्हेंटमध्ये अनेक नवीन फीचर्सची घोषणा केली आहे. यामध्ये कंपनीने कस्टम फीड्स नावाचे एक फीचर देखील सादर केले आहे. या फीचरच्या मदतीने यूजर्स एआयची मदत घेऊन त्यांच्या आवडीनुसार एक वेगळी व्हिडीओ फीड तयार करू शकणार आहेत. याव्यतिरिक्त, कमेंट सेक्शनमध्ये जिआयएफ पोस्ट करण्याचा पर्याय देखील लवकरच मिळणार आहे.
26 Sep 2026 10:40 AM (IST)
AFSPA Extended Manipur : देशाच्या गृह मंत्रालयाने (Ministry of Home Affairs - MHA) शुक्रवारी ईशान्य भारतातील मणिपूर, अरुणाचल प्रदेश आणि नागालँड या तीन राज्यांमधील संवेदनशील भागांमध्ये सशस्त्र दल (विशेष अधिकार) कायदा १९५८ म्हणजेच 'अफ्स्पा' (AFSPA) ला पुन्हा एकदा ६ महिन्यांसाठी मुदतवाढ दिली आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, ही मुदतवाढ १ ऑक्टोबर २०२६ पासून ते ३१ मार्च २०२७ पर्यंत लागू राहील. विशेष म्हणजे, या कायद्यांतर्गत 'अशांत क्षेत्र' (Disturbed Area) म्हणून घोषित केलेल्या पोलीस ठाण्यांच्या आणि जिल्ह्यांच्या सीमांमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नसून पूर्वस्थिती (Status Quo) कायम ठेवण्यात आली आहे.
26 Sep 2026 10:30 AM (IST)
राज्याचे ज्येष्ठ मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची पुतणी नीला विखे पाटील यांची स्वीडनच्या (Sweden) ३४९ सदस्यांच्या संसदेत खासदार (MP) म्हणून निवड झाली आहे. नीला विखे खासदार झाल्यानंतर राधाकृष्ण विखे पाटील यांनी त्यांना फोन करून अभिनंदन केले आणि सोशल मीडियावर आनंद व्यक्त केला. मात्र, या सर्व घडामोडींवर आता थेट स्वीडनहून नीला विखे पाटील यांनी एका मुलाखतीदरम्यान धक्कादायक खुलासे करत काका राधाकृष्ण आणि चुलत भाऊ सुजय विखे पाटील यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे.
"माझे काका आणि चुलत भाऊ यांना मी गेल्या 10 ते 12 वर्षात बोलणे झालेले नाही. आमच्यात साधा संवादही कधी होत नाही. त्यातच सुजय म्हणतो की, भारतात तिचा पक्ष असता तर ती निवडून येऊ शकली नसती. पण मी त्यांच्यासारखे वारंवार पक्ष बदलत नाही. मी माझ्या पक्षासोबत प्रामाणिक आहे आणि शेवटपर्यंत मी माझ्या पक्षाला बांधिल राहिल. मी खासदार म्हणून निवडून आल्यानंतर मला काकांचा फोन आला होता. त्यांनी मला शुभेच्छा दिल्या… त्या पलिकडे काहीच नाही, ही वस्तूस्थिती आहे.
26 Sep 2026 10:30 AM (IST)
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या ऑगस्ट महिन्याच्या हप्त्याबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. लाडक्या बहिणींचा ऑगस्ट महिन्याचा १५०० रुपयांचा हफ्ता लवकरच जमा केला जाणार आहे. त्यासाठी राज्य सरकारने ₹३३९ कोटी १४ लाख रुपयांचा निधी वितरित करण्यास मान्यता दिली आहे. हा निधी महिला व बालविकास विभागाकडे वर्ग करण्यात आला आहे. यामुळे पात्र लाभार्थी महिलांच्या खात्यात लकवरच हप्ता जमा होणार आहे.
26 Sep 2026 10:20 AM (IST)
इमारतीच्या 12 व्या मजल्यावरून उडी घेत एका विद्यार्थ्याने आत्महत्या केली. निनाद यतिंद्र विश्वकर्मा (वय १४) याने आत्महत्या केली. ही घटना बेलतरोडी पोलिस ठाण्यांतर्गत पृथ्वीराजनगर येथील मॅक्स ग्लोरी अपार्टमेंटमध्ये घडली. त्याच्या मृत्यूमागील कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
26 Sep 2026 10:10 AM (IST)
CJP on Gyanesh Kumar : एसआयआर (SIR) प्रक्रियेतील कथित गैरप्रकार आणि पारदर्शकतेच्या मुद्द्यावरून 'कॉक्रोच जनता पार्टी' (CJP) आणि केंद्रीय निवडणूक आयोग (ECI) यांच्यातील संघर्ष आता अत्यंत तीव्र झाला आहे. ४८ तासांचा अल्टिमेटम संपल्यानंतर कॉकरोच जनता पार्टीने आपल्या पुढील रणनीतीची घोषणा करताना अत्यंत आक्रमक भूमिका घेतली आहे. पक्षाने आपल्या कार्यकर्त्यांना आणि समर्थकांना तयार राहण्याचे आवाहन करताना म्हटले आहे की, "सरफ़रोशी की तमन्ना अब हमारे दिल में है, देखना है ज़ोर कितना बाज़ुए-क़ातिल में है... तुम्ही सर्वजण तयारीला लागा, आता थेट २ ऑक्टोबर रोजी भेटू." अल्टिमेटम संपल्यानंतर मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यावर काय भूमिका घेतात किंवा निवडणूक आयोग यावर काही स्पष्टीकरण जारी करतो का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
26 Sep 2026 10:10 AM (IST)
एयर फ्रायरमुळे जेवण बनवण्याची पद्धत अधिक सोपी झाली आहे. यामुळेच अनेकजण एअर फ्रायर खरेदी करण्याला प्राधान्य देतात. एअर फ्रायर जितके फायद्याचे ठरते, तेवढीच त्याची स्वच्छता राखणं देखील गरजेचे आहे. एअर फ्रायरची स्वच्छता करताना काही विशेष काळजी घेणं अत्यंत गरजेचं आहे, अन्यथा तुमच्या छोट्या चुकीमुळे मशीनच्या परफॉर्मंसवर परिणाम होऊ शकतो.
26 Sep 2026 10:00 AM (IST)
Hardik Pandya Injury Update: भारतीय क्रिकेट संघातील (Team India) स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या (Hardik Pandya) याच्या दुखापतीबाबत एक अत्यंत धक्कादायक आणि चिंतेची माहिती समोर आली आहे. आयपीएल २०२६ (IPL 2026) चा हंगाम संपल्यापासून हार्दिक पांड्या मैदानापासून दूर आहे. आधीच भारतीय संघातील स्टार खेळाडूंच्या दुखापतींचे सत्र सुरू असताना, हार्दिक पांड्याची दुखापत अद्याप पूर्णपणे बरी झालेली नाही, ज्यामुळे त्याच्या आंतरराष्ट्रीय पुनरागमनाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
26 Sep 2026 10:00 AM (IST)
सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू होताच खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी पहिल्याच दिवशी गृहनिर्माण मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला. अर्ज दाखल केल्यानंतर त्यांनी जिल्हा बँकेच्या निवडणुकीत पक्षीय राजकारण आणण्यास स्पष्ट विरोध दर्शविला. ‘बँक टिकवायची की मोडकळीस काढायची?’ असा सवाल उपस्थित करत सहकार संस्थांच्या निवडणुका पक्षीय चौकटीबाहेर होणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
26 Sep 2026 09:52 AM (IST)
नवी दिल्ली : देशातील अनेक राज्यांमध्ये सुरू असलेल्या पावसामुळे चिंता वाढली आहे. ओडिशा, छत्तीसगड आणि उत्तर प्रदेशात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. ओडिशामधील तीव्र कमी दाबाच्या पट्ट्यामुळे झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक नद्यांची पातळी धोक्याच्या पातळीच्या वर गेली आहे, ज्यामुळे शेकडो गावांवर परिणाम झाला असून, सुमारे १४५०० लोकांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आले आहे.
26 Sep 2026 09:52 AM (IST)
Ladki Bahin Yojana August installment: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या ऑगस्ट महिन्याच्या हप्त्याबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. लाडक्या बहिणींचा ऑगस्ट महिन्याचा १५०० रुपयांचा हफ्ता लवकरच जमा केला जाणार आहे. त्यासाठी राज्य सरकारने ₹३३९ कोटी १४ लाख रुपयांचा निधी वितरित करण्यास मान्यता दिली आहे. हा निधी महिला व बालविकास विभागाकडे वर्ग करण्यात आला आहे. यामुळे पात्र लाभार्थी महिलांच्या खात्यात लकवरच हप्ता जमा होणार आहे.
Maharashtra to World Breaking News :
१२ दिवसांच्या गणेशोत्सवाची ढोल ताशांच्या गजरात सांगता झाली. २४ तासांच्या प्रदीर्घ मिरवणुकीनंतर मुंबईत ‘लालबागचा राजा’चे गिरगाव चौपाटीवर विसर्जन करण्यात आले. राज्यासह देशभरातील गणेश भक्तांनी लाडक्या बाप्पाला निरोप देत पुढच्या वर्षी लवकर या अशी प्रार्थनाही केली.
हवामान खात्याकडून (IMD) महाराष्ट्रातील २३ जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. सहकारी साखर कारखाना निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांच्या उपस्थितीत ‘सिल्व्हर ओक’वर महत्त्वाची राजकीय बैठक होणार आहे.
येत्या २८ सप्टेंबरपासून बँक कर्मचाऱ्यांचा ३ दिवसांचा देशव्यापी संप; ग्राहकांची सोय लक्षात घेता रविवारी (२७ सप्टेंबर) बँका सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. निवडणूक आयुक्तांच्या राजीनाम्याची मागणी करत काँग्रेस व विरोधक आक्रमक पवित्रा घेतला असून CJP सह विविध संघटनांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.