
iran protests 2026 iraqi shia militia khamenei massacre 12000 deaths update
Khamenei activates resistance axis militias : इराणमध्ये (Iran) महागाईच्या विरोधात सुरू झालेले आंदोलन आता एका रक्तरंजित क्रांतीमध्ये रूपांतरित झाले आहे. मात्र, ही क्रांती चिरडण्यासाठी इराणच्या इस्लामिक राजवटीने जो मार्ग अवलंबला आहे, त्याने संपूर्ण जगाला हादरवून सोडले आहे. विश्वासार्ह अहवालानुसार, इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी (Khamenei) यांनी आंदोलकांचा आवाज दाबण्यासाठी चक्क परकीय भाडोत्री सैन्य म्हणजेच इराकी शिया मिलिशिया (Iraqi Shia Militia) इराणमध्ये तैनात केले आहे. यामुळे इराणमधील रस्ते आता केवळ आंदोलकांच्याच नाही, तर रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या तरुणांच्या देहाने माखले आहेत.
इराणमधील स्थानिक सुरक्षा दलातील काही तुकड्यांनी आपल्याच बांधवांवर आणि निष्पाप तरुणांवर गोळीबार करण्यास स्पष्ट नकार दिला आहे. अनेक ठिकाणी सैनिकांनी आंदोलकांशी हातमिळवणी केल्याच्या बातम्या आहेत. ही ‘बंडाची ठिणगी’ विझवण्यासाठी खामेनींनी आपल्या अत्यंत विश्वासू अशा ‘रेझिस्टन्स फोर्स’ला साद घातली आहे. यामध्ये इराकमधील हशद अल-शाबी, कताइब हिजबुल्लाह, आणि बद्र ऑर्गनायझेशन यांसारख्या क्रूर गटांचा समावेश आहे. हे तेच गट आहेत ज्यांना अमेरिकेशी लढण्याचा आणि गनिमी काव्याचा मोठा अनुभव आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Iran protests 2026: इराणमध्ये AI ने घातला धुमाकूळ! आंदोलनाचे बनावटच VIDEO VIRAL; 35 लाख लोकांनी पाहिला ‘खोटा’ हिंसाचार
इराण सरकारने दिलेल्या माहितीनुसार मृतांचा आकडा २,६०० च्या आसपास आहे, परंतु सत्य यापेक्षा कितीतरी भयानक आहे. ‘इराण इंटरनॅशनल’च्या वृत्तानुसार, ८ आणि ९ जानेवारीच्या रात्री जेव्हा संपूर्ण देशात इंटरनेट बंद करण्यात आले होते, तेव्हा या इराकी मिलिशियाने आंदोलकांवर थेट मशीनगनने गोळीबार केला. एकाच रात्रीत हजारो लोक गायब झाले असून, मृतांचा आकडा १२,००० ते २०,००० च्या दरम्यान असण्याची शक्यता मानवाधिकार संघटनांनी व्यक्त केली आहे.
Khamenei has issued orders for further killings and an intensified crackdown.
Moments ago, he declared that “we have spilled blood to establish this Islamic regime and we will not retreat an inch in the face of the protesters.”
He went on to accuse the uprising of being… pic.twitter.com/Y9iyCaNj5R — Hamidreza (@justchangingun) January 9, 2026
credit – social media and Twitter
धक्कादायक बाब म्हणजे, या कारवाईसाठी इराकमधील बेरोजगार तरुणांना महिना सुमारे ६०० डॉलर्स देऊन इराणमध्ये आणले जात आहे. ‘द मीडिया लाईन’ने दिलेल्या एका वृत्तानुसार, या भाडोत्री सैनिकांना “इस्लामिक क्रांतीचे रक्षण” करण्याच्या नावाखाली इराणमध्ये घुसवले जात आहे. शलमचेह आणि खोस्रवी यांसारख्या सीमा ओलांडून हे सैनिक तीर्थयात्रेच्या नावाखाली बसमधून इराणमध्ये दाखल झाले आहेत.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Secret Pact: अमेरिकेचा विश्वासघात! ट्रम्पला पत्ताच नव्हता अन् इराणने खेळली चाणाक्ष राजनैतिक चाल; थेट इस्राएल-रशियाच्या आशीर्वादाने
इराणमधील विरोधी पक्षनेते मेहदी रझा यांच्या मते, सरकारी मुख्यालये आणि खामेनींच्या निवासस्थानाचे रक्षण करण्यासाठी आता केवळ या परकीय सैनिकांवरच विश्वास ठेवला जात आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या नरसंहाराचा निषेध करत इराणला कडक इशारा दिला आहे. मात्र, इराण सरकारने हे सर्व आरोप फेटाळून लावत आंदोलकांना ‘दहशतवादी’ संबोधले आहे. इराणमध्ये सध्या जे सुरू आहे, तो केवळ वणवा नसून एक पद्धतशीरपणे घडवून आणलेला नरसंहार असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे.
Ans: जेव्हा इराणच्या स्थानिक सुरक्षा दलांनी आंदोलकांवर गोळीबार करण्यास नकार दिला, तेव्हा खामेनींनी आंदोलन चिरडण्यासाठी आपल्या निष्ठावान इराकी शिया मिलिशियाना पाचारण केले.
Ans: सरकारी आकडा २,६०० असला तरी, मानवाधिकार संघटना आणि 'इराण इंटरनॅशनल'च्या मते हा आकडा १२,००० ते २०,००० च्या दरम्यान असू शकतो.
Ans: हे इराण समर्थक गट असून, त्यांना आंदोलने चिरडण्याचा आणि गनिमी काव्याचा अनुभव आहे. ते खामेनींच्या आदेशानुसार इराणमध्ये कार्यरत आहेत.