पुतिन यांच्या निवासस्थानावरील हल्ल्याच्या दहा दिवसांनंतर, रशियाने घेतला बदला आणि युक्रेनवर डागले न्यूक्लियर मिसाइल ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया)
Russia-Ukraine War: रशिया आणि युक्रेनमधील युद्ध (Russia-Ukraine War ) आता अत्यंत भयावह वळणावर पोहोचले आहे. रशियाने शुक्रवारी सकाळी पश्चिम युक्रेनमध्ये आपल्या सर्वात प्रगत आणि विनाशकारी अशा ‘ओरेश्निक’ (Oreshnik) हायपरसोनिक बॅलिस्टिक क्षेपणास्त्राने हल्ला केला. रशियाच्या या पाऊलामुळे केवळ युक्रेनच नाही, तर संपूर्ण युरोप हादरला आहे, कारण हा हल्ला थेट नाटो (NATO) सदस्य देश असलेल्या पोलंडच्या सीमेजवळ करण्यात आला आहे.
रशियाने या हल्ल्याचे समर्थन करताना म्हटले आहे की, ३० डिसेंबर २०२५ च्या सुमारास युक्रेनने रशियाच्या नोव्हगोरोड प्रदेशातील राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या अधिकृत निवासस्थानाला लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला होता. रशियाचा दावा आहे की, युक्रेनने ९१ ड्रोनद्वारे पुतिन यांच्या घरावर हल्ला केला होता. जरी रशियन हवाई संरक्षण यंत्रणेने हे ड्रोन पाडले असले, तरी पुतिन यांनी याला “थेट दहशतवादी कृत्य” मानले आणि “विनाशकारी बदला” घेण्याची धमकी दिली होती. आजचा ‘ओरेश्निक’ हल्ला हा त्याच बदल्याचा एक भाग असल्याचे मानले जात आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Trump Greenland Strategy: अंतराळातून हल्ला झाल्यास ‘ग्रीनलँड’ बनेल ढाल; 75 वर्षांपासून अमेरिकन सैन्य गोठले बर्फात, वाचा सविस्तर
‘ओरेश्निक’ (रशियन भाषेत याचा अर्थ ‘हेझेलचे झाड’) हे एक मध्यम पल्ल्याचे बॅलिस्टिक क्षेपणास्त्र आहे. पुतिन यांनी दावा केला आहे की, हे क्षेपणास्त्र आवाजाच्या वेगापेक्षा १० पट वेगाने म्हणजेच ताशी सुमारे १३,००० किलोमीटर वेगाने प्रवास करते. हे क्षेपणास्त्र रोखणे जगातील कोणत्याही संरक्षण यंत्रणेला (Patriot किंवा S-400) अशक्य आहे. आजच्या हल्ल्यात युक्रेनच्या पश्चिम भागातील लविव (Lviv) येथील एका मोठ्या ऊर्जा केंद्राला आणि गॅस साठवणूक प्रकल्पाला लक्ष्य करण्यात आले.
🚀🚀🚀🚀 Russia hit Ukraine with Oreshniks again 🚀🚀🚀 An Oreshnik strike in Lviv approximately 40 to 45 minutes ago. Russia has taken the gloves off. CIA probably should have never tried to hit Putin’s residence. I wonder what the target was?! pic.twitter.com/F3lfZAbYjl — Gregory Latham Jr (@B7grWinning) January 8, 2026
credit : social media and Twitter
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुतिन यांच्या निवासस्थानावरील हल्ल्याचा रशियन दावा पूर्णपणे फेटाळून लावला आहे. ट्रम्प यांनी याला “रशियाची कल्पनाशक्ती” म्हटले असून, युक्रेनला बदनाम करण्यासाठी आणि नव्या हल्ल्यांचे समर्थन करण्यासाठी रशिया अशा अफवा पसरवत असल्याचा आरोप केला आहे. युक्रेनच्या परराष्ट्रमंत्र्यांनी म्हटले आहे की, “रशियाला शांतता नको असून ते केवळ रक्ताचे राजकारण करत आहेत.”
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Trump Statement : मीच माझा कायदा! ट्रम्पने दाखवली आंतरराष्ट्रीय नियमांना केराची टोपली; मुलाखतीने जगभरात उठवले चर्चेचे वादळ
ओरेश्निक क्षेपणास्त्राचा वापर युरोपीय महासंघाच्या सीमेपासून अवघ्या काही अंतरावर झाल्यामुळे पोलंड आणि रोमानिया यांसारख्या नाटो देशांनी आपली लढाऊ विमाने हाय अलर्टवर ठेवली आहेत. जर हे क्षेपणास्त्र अण्वस्त्राने सुसज्ज असते, तर संपूर्ण युरोपला त्याचे परिणाम भोगावे लागले असते. सध्या आंतरराष्ट्रीय स्तरावर रशियाच्या या ‘हायपरसोनिक टेरर’चा निषेध केला जात असून, युक्रेनने संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेची (UNSC) तातडीची बैठक बोलावण्याची मागणी केली आहे.
Ans: रशियाच्या दाव्यानुसार, डिसेंबरच्या उत्तरार्धात पुतिन यांच्या निवासस्थानावर युक्रेनने ९१ ड्रोनद्वारे हल्ला केला होता, त्याचा बदला घेण्यासाठी हे क्षेपणास्त्र डागले गेले.
Ans: कारण याचा वेग आवाजाच्या १० पट (Mach 10) आहे. ताशी १३,००० किमी वेगाने येणाऱ्या या शस्त्राला टिपण्यासाठी सध्या जगातील कोणत्याही रडार किंवा डिफेन्स सिस्टमकडे वेळ उरत नाही.
Ans: हा हल्ला युरोपीय महासंघ आणि नाटोच्या सीमेजवळ झाल्यामुळे युरोपीय देशांमध्ये सुरक्षेची चिंता वाढली असून, नाटो सदस्य देश रशियाविरुद्ध अधिक आक्रमक पवित्रा घेऊ शकतात.






