Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 15 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pak VS Afg: अफगाणिस्तानने पाकिस्तानचे ‘F-16’ लढाऊ विमान पाडले; ड्युरंड रेषेवर महायुद्धाचा भडका, VIDEO VIRAL

Pakistan Afghanistan Clash: पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमध्ये सध्या तणाव वाढला आहे. अफगाणिस्तानच्या माध्यमांनुसार, सुरक्षा दलांनी पाकिस्तानचे एक एफ-१६ लढाऊ विमान पाडले आहे.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Feb 27, 2026 | 10:49 AM
afghan forces shoot down pakistan f16 fighter jet video viral durand line clash

afghan forces shoot down pakistan f16 fighter jet video viral durand line clash

Follow Us
Follow Us:
  • एफ-१६ विमान पाडले
  • भीषण रक्तपात
  • नागरी वस्त्यांवर हल्ले

Afghan forces shoot down Pakistan F-16 video : दक्षिण आशियातील रणांगण आता एका धोकादायक वळणावर येऊन ठेपले आहे. पाकिस्तान (Pakistan) आणि अफगाणिस्तान (तालिबान)(Afghanistan-Taliban Crisis) यांच्यातील संघर्ष आता केवळ सीमेपुरता मर्यादित न राहता थेट हवाई युद्धापर्यंत पोहोचला आहे. अफगाणिस्तानच्या ‘टोलो न्यूज’ने दिलेल्या एका धक्कादायक वृत्तानुसार, अफगाण सुरक्षा दलांनी त्यांच्या हवाई हद्दीचे उल्लंघन करणाऱ्या पाकिस्तानच्या एका एफ-१६ (F-16) लढाऊ विमानाला क्षेपणास्त्राने पाडले आहे. या विमानाचे जळते अवशेष पक्तिका प्रांतात पडल्याचे सांगण्यात येत असून, सोशल मीडियावर त्याचे थरारक व्हिडिओ वेगाने व्हायरल होत आहेत.

पाकिस्तानी वैमानिक अटकेत? सोशल मीडियावरील दावा

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओंमध्ये केवळ विमानाचे अवशेषच दिसत नाहीत, तर एका जखमी पाकिस्तानी सैनिकाला अफगाण सैनिकांनी पकडून नेल्याचा दावाही केला जात आहे. शुक्रवारी (२७ फेब्रुवारी) पहाटेच्या सुमारास पाकिस्तानने काबुल, कंधार आणि पक्तिका यांसारख्या प्रमुख शहरांवर हवाई हल्ले करून अफगाण लष्कराचे दोन ब्रिगेड मुख्यालय उद्ध्वस्त केल्याचे म्हटले होते. काबुलमध्ये झालेल्या प्रचंड स्फोटांमुळे स्थानिक नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले असून अनेक कुटुंबे सुरक्षित स्थळी स्थलांतरित होत आहेत.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : PM Modi Israel Visit: ‘आम्ही फक्त तुमचे आहोत!’ इस्रायलने जगाला नाकारलं; पण भारताला दिलं ‘हे’ अपराजेय महाविनाशक शस्त्र

जबीउल्लाह मुजाहिद यांची मोठी घोषणा

तालिबानचे प्रवक्ते जबीउल्लाह मुजाहिद यांनी या कारवाईची पुष्टी करताना सांगितले की, “पाकिस्तानी आक्रमकता आता सहन केली जाणार नाही. आमच्या सैन्याने केवळ विमानच पाडले नाही, तर १९ पाकिस्तानी सीमा चौक्या आणि दोन महत्त्वाचे लष्करी तळ जमीनदोस्त केले आहेत.” मुजाहिद यांच्या दाव्यानुसार, या जमिनीवरील लढाईत आतापर्यंत ५५ पाकिस्तानी सैनिक मारले गेले असून अनेकांना युद्धबंदी म्हणून ताब्यात घेण्यात आले आहे. अफगाणिस्तानने ड्युरंड रेषेच्या संपूर्ण परिसरात आपली ‘आक्रमक बचाव’ मोहीम अधिक तीव्र केली आहे.

Afghans celebrate after a Pakistani fighter plane was shot down.#Pakistan #Afghanistan pic.twitter.com/t3pbSoGMcO — mr. ᴩᴀᴛʜᴀᴋ (@mr_pathakshiv) February 27, 2026

credit – social media and Twitter

पाकिस्तानचा पलटवार आणि दाव्यांचे खंडन

दुसरीकडे, पाकिस्तानचे माहिती मंत्री अत्ताउल्लाह तरार यांनी अफगाणिस्तानचे दावे फेटाळून लावले आहेत. त्यांनी सांगितले की, “आमची विमाने सुरक्षित असून केवळ दोनच सैनिक शहीद झाले आहेत.” पाकिस्तानचा दावा आहे की त्यांनी केलेल्या प्रत्युत्तराच्या कारवाईत १३३ अफगाण सैनिक मारले गेले असून २०० हून अधिक जखमी झाले आहेत. पाकिस्तानच्या मते, अफगाण सैन्याने विनाकारण चिथावणी दिल्याने ही लष्करी कारवाई करणे भाग पडले. मात्र, जमिनीवरील परिस्थिती पाहता दोन्ही देशांचे दावे परस्परविरोधी असून सत्य परिस्थिती अधिक भीषण असल्याचे समजते.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : US-Iran War: इराणच्या उंबरठ्यावर उभं अमेरिकन ‘आरमारी’ वादळ; पण जनरल डॅनने ट्रम्पना दिली ‘अशी’ अनर्थाची सावटसूचना

नागरिकांचा बळी आणि संयुक्त राष्ट्रांची मध्यस्थी

या युद्धाच्या ठिणगीत निष्पाप नागरिक होरपळले जात आहेत. तोरखम सीमेजवळील एका अफगाण निर्वासित छावणीवर क्षेपणास्त्र आदळल्याने मोठा अनर्थ घडला. यात १३ महिला आणि मुलांचा समावेश असलेले नागरिक गंभीर जखमी झाले आहेत. या वाढत्या तणावावर संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस यांनी तीव्र चिंता व्यक्त केली आहे. त्यांनी दोन्ही देशांना संयम राखण्याचे आणि “नागरिकांची सुरक्षा सर्वोच्च” ठेवण्याचे आवाहन केले आहे. तसेच, हा वाद राजनैतिक चर्चेद्वारे सोडवण्याची विनंती त्यांनी केली आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: अफगाणिस्तानने पाकिस्तानचे विमान खरोखर पाडले आहे का?

    Ans: अफगाण मीडिया आणि तालिबानने विमान पाडल्याचा दावा केला असून त्याचे अवशेष असलेले व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. मात्र, पाकिस्तानने अधिकृतपणे हे वृत्त फेटाळले आहे.

  • Que: या युद्धात किती जीवितहानी झाली आहे?

    Ans: दाव्यांनुसार, अफगाणिस्तानचे १३३ आणि पाकिस्तानचे ५५ सैनिक मारले गेले आहेत, तर तोरखम सीमेवर १३ हून अधिक नागरिक जखमी झाले आहेत.

  • Que: ड्युरंड रेषेवर तणाव का वाढला आहे?

    Ans: सीमावाद आणि पाकिस्तानकडून होणारे हवाई हल्ले यामुळे तालिबानने आक्रमक भूमिका घेतली असून दोन्ही देशांचे सैन्य समोरासमोर आले आहे.

Web Title: Afghan forces shoot down pakistan f16 fighter jet video viral durand line clash

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 27, 2026 | 10:49 AM

Topics:  

  • Afghanistan-Pakistan Attack
  • Afghanistan-Taliban Crisis
  • Fighter Plane
  • international news
  • World War 3

संबंधित बातम्या

Maharashtra Breaking News Updates Today: पुणे पोलीस दलात ३५ टक्के पदे रिक्त
1

Maharashtra Breaking News Updates Today: पुणे पोलीस दलात ३५ टक्के पदे रिक्त

अखेर इज्राइल मधल्या निवडणुका जाहीर, २७ ऑक्टोबरला नेतन्याहू यांचे भविष्य ठरणार, काय आहेत महत्वाचे मुद्दे?
2

अखेर इज्राइल मधल्या निवडणुका जाहीर, २७ ऑक्टोबरला नेतन्याहू यांचे भविष्य ठरणार, काय आहेत महत्वाचे मुद्दे?

Maharashtra Breaking News Updates Today:१४ राज्यांमध्ये वादळी पावसासह ‘हाय अलर्ट’; ताशी ७५ किमी वेगाने वारे वाहणार
3

Maharashtra Breaking News Updates Today:१४ राज्यांमध्ये वादळी पावसासह ‘हाय अलर्ट’; ताशी ७५ किमी वेगाने वारे वाहणार

Phu Quoc Island: 5 मिनिटात पोहोचली मदत, तरीही 15 भारतीयांनी गमावला जीव; व्हिएतनाममधील भीषण अपघाताने देश हादरला
4

Phu Quoc Island: 5 मिनिटात पोहोचली मदत, तरीही 15 भारतीयांनी गमावला जीव; व्हिएतनाममधील भीषण अपघाताने देश हादरला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.