Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Holi
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pak Afg War: तालिबानचा ‘सुप्रीम लीडर’ संपला? पाकिस्तानच्या ऑपरेशन गझ्ब-लिल-हकने कंधारमध्ये माजवला हाहाकार

Pak-Afghan War: पाकिस्तानने अफगाणिस्तानातील टीटीपीच्या ठिकाणांवर हवाई हल्ले केले. तालिबानचा सर्वोच्च नेता अखुंदजादा याला लक्ष्य करण्यात आले होते याची पुष्टी झालेली नाही; दोन्ही देशांनी लष्करी सहभागाची कबुली दिली.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Feb 27, 2026 | 11:47 AM
hibatullah akhundzada dead pakistan air strike operation gazab lil haq kandahar attack

hibatullah akhundzada dead pakistan air strike operation gazab lil haq kandahar attack

Follow Us
Close
Follow Us:
  • सर्वोच्च नेता रडारवर
  • कंधारमध्ये बॉम्बवर्षाव
  • दोन्ही देशांची भूमिका

Hibatullah Akhundzada death news Pakistan air strike : दक्षिण आशियातील दोन मुस्लिम राष्ट्र – पाकिस्तान आणि अफगाणिस्तान (Pakistan vs Afghanistan war) यांच्यातील सीमावाद आता एका भयानक वळणावर पोहोचला आहे. शुक्रवारी पहाटे पाकिस्तानी हवाई दलाने (PAF) अफगाणिस्तानच्या हद्दीत घुसून केलेल्या भीषण हवाई हल्ल्यांनंतर संपूर्ण जग हादरले आहे. या संघर्षात सर्वात मोठी आणि धक्कादायक चर्चा रंगली आहे ती म्हणजे तालिबानचा सर्वोच्च नेता हिबतुल्लाह अखुंदजादा याच्या मृत्यूची. सोशल मीडियावर दावे केले जात आहेत की, कंधारमधील त्याच्या मुख्य तळाला पाकिस्तानी विमानांनी लक्ष्य केले असून त्यात त्याचा अंत झाला आहे.

ऑपरेशन गझ्ब-लिल-हक आणि कंधारमधील थरार

पाकिस्तानने अधिकृतपणे “ऑपरेशन गझ्ब-लिल-हक” ची घोषणा केल्यानंतर हे भीषण हवाई हल्ले सुरू झाले. सुरुवातीला पाकिस्तानी विमानांनी अफगाणिस्तानची राजधानी काबूलवर घोंगावण्यास सुरुवात केली, ज्यामुळे तिथे प्रचंड स्फोट झाले. मात्र, काही वेळातच या विमानांचा रोख तालिबानचे मुख्य केंद्र असलेल्या कंधारकडे वळला. ‘एएफपी’ (AFP) च्या पत्रकारांनी दिलेल्या माहितीनुसार, कंधारमध्ये दोन तासांपेक्षा जास्त वेळ लढाऊ विमानांचा आवाज ऐकू येत होता, त्यानंतर मोठ्या स्फोटांचे आणि गोळीबाराचे आवाज आले. अखुंदजादा हा कंधारमध्येच वास्तव्यास असल्याने, हा हल्ला थेट तालिबानी नेतृत्वाचा खात्मा करण्यासाठीच होता की काय, अशा चर्चांना उधाण आले आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : PM Modi Israel Visit: ‘आम्ही फक्त तुमचे आहोत!’ इस्रायलने जगाला नाकारलं; पण भारताला दिलं ‘हे’ अपराजेय महाविनाशक शस्त्र

तालिबान आणि पाकिस्तानचे अधिकृत दावे

तालिबान प्रशासनाने पाकिस्तानी हवाई हल्ल्यांची कबुली दिली असली तरी, त्यांनी आपला सर्वोच्च नेता सुरक्षित असल्याचा दावा केला आहे. तालिबानचे प्रवक्ते जबीउल्लाह मुजाहिद यांनी स्पष्ट केले की, “नेतृत्व किंवा कमांडच्या कोणत्याही पायाभूत सुविधांना इजा झालेली नाही. हे हल्ले केवळ भीती निर्माण करण्यासाठी होते.” मात्र, अफगाण संरक्षण मंत्रालयाने ड्युरंड रेषेवरील जमिनीवरील लढाईत आपल्या ८ सैनिकांच्या मृत्यूची पुष्टी केली आहे. दुसरीकडे, पाकिस्तानी लष्करानेही अखुंदजादाला लक्ष्य केल्याचा वृत्त फेटाळले असून, त्यांचे टार्गेट केवळ ‘तेहरीक-ए-तालिबान पाकिस्तान’ (TTP) चे दहशतवादी तळ असल्याचे म्हटले आहे.

No, this is false. Pakistani airstrikes hit Kabul, Kandahar & Paktia today over border clashes, but Taliban spokesman Zabihullah Mujahid confirmed zero casualties. No credible outlets (Reuters, BBC, Al Jazeera, AP) or officials report Hibatullah Akhundzada’s death—he remains… — Grok (@grok) February 27, 2026

credit – social media and Twitter

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Pak VS Afg: अफगाणिस्तानने पाकिस्तानचे ‘F-16’ लढाऊ विमान पाडले; ड्युरंड रेषेवर महायुद्धाचा भडका, VIDEO VIRAL

नेतृत्वावर हल्ला का ठरला असता धोकादायक?

तज्ज्ञांच्या मते, जर पाकिस्तानने खरोखरच हिबतुल्लाह अखुंदजादाला लक्ष्य केले असते, तर तो केवळ सीमावाद न राहता एका मोठ्या प्रादेशिक युद्धाची (Full Scale War) नांदी ठरली असती. सध्या पाकिस्तान केवळ ड्युरंड रेषेजवळील टीटीपीच्या सुरक्षित ठिकाणांना लक्ष्य करत असल्याचे सांगत आहे. तरीही, काबूल आणि कंधारसारख्या शहरांवर झालेला बॉम्बवर्षाव हा तालिबानसाठी मोठा अपमान मानला जात आहे. यामुळे येणाऱ्या काळात तालिबानकडून पाकिस्तानच्या अंतर्गत शहरांवर मोठे आत्मघातकी हल्ले होण्याची भीती वर्तवण्यात येत आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: हिबतुल्लाह अखुंदजादा खरोखर मारला गेला आहे का?

    Ans: सध्या सोशल मीडियावर अशा चर्चा आहेत, परंतु तालिबान किंवा पाकिस्तान यांपैकी कोणाही अधिकृत सूत्राने याला दुजोरा दिलेला नाही. तालिबानने हा दावा फेटाळला आहे.

  • Que: 'ऑपरेशन गझ्ब-लिल-हक' कशासाठी राबवले जात आहे?

    Ans: पाकिस्तानने टीटीपी (TTP) च्या दहशतवादी तळांना नष्ट करण्यासाठी आणि सीमेवरील वाढत्या हल्ल्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी हे ऑपरेशन सुरू केले आहे.

  • Que: या हल्ल्यांमध्ये किती जीवितहानी झाली आहे?

    Ans: अफगाण संरक्षण मंत्रालयाने ८ सैनिकांच्या मृत्यूची पुष्टी केली आहे, तर नागरी वस्तीतील नुकसानीचा आकडा अद्याप स्पष्ट झालेला नाही.

Web Title: Hibatullah akhundzada dead pakistan air strike operation gazab lil haq kandahar attack

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 27, 2026 | 11:47 AM

Topics:  

  • international news
  • Taliban Government

संबंधित बातम्या

Pak VS Afg: अफगाणिस्तानने पाकिस्तानचे ‘F-16’ लढाऊ विमान पाडले; ड्युरंड रेषेवर महायुद्धाचा भडका, VIDEO VIRAL
1

Pak VS Afg: अफगाणिस्तानने पाकिस्तानचे ‘F-16’ लढाऊ विमान पाडले; ड्युरंड रेषेवर महायुद्धाचा भडका, VIDEO VIRAL

Maharashtra Breaking News Updates Today: क्रिकेटपटू रिंकू सिंगच्या वडिलांचे निधन
2

Maharashtra Breaking News Updates Today: क्रिकेटपटू रिंकू सिंगच्या वडिलांचे निधन

Afghanistan-Pakistan Conflict : पाकिस्तानचा अफगानिस्तानवर पुन्हा हल्ला; काबुलमध्ये तीन मोठे स्फोट
3

Afghanistan-Pakistan Conflict : पाकिस्तानचा अफगानिस्तानवर पुन्हा हल्ला; काबुलमध्ये तीन मोठे स्फोट

China Military Purge: चीनमध्ये हाहाकार! 100 जनरल आणि कमांडर बेपत्ता; अण्वस्त्र सज्ज चिनी सैन्यात मोठी ‘कत्तल’, नेमकं शिजतंय काय?
4

China Military Purge: चीनमध्ये हाहाकार! 100 जनरल आणि कमांडर बेपत्ता; अण्वस्त्र सज्ज चिनी सैन्यात मोठी ‘कत्तल’, नेमकं शिजतंय काय?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.