Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Iran On IAEA : इराण IAEA सोबतचे सर्व संबंध तोडणार! संसदेने मंजूर केले विधेयक, म्हटले- ‘सुरक्षेची हमी…’

Iran On IAEA : आंतरराष्ट्रीय पातळीवर चिंतेचे वातावरण निर्माण करणारा निर्णय घेऊन इराणच्या संसदेला (मजलिस) आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्था (IAEA) सोबतच्या सहकार्याला स्थगिती देणारे महत्त्वाचे विधेयक मंजूर केले आहे.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Jun 25, 2025 | 01:25 PM
Iran to cut IAEA ties new bill threatens nuclear program

Iran to cut IAEA ties new bill threatens nuclear program

Follow Us
Close
Follow Us:

Iran On IAEA : आंतरराष्ट्रीय पातळीवर चिंतेचे वातावरण निर्माण करणारा निर्णय घेऊन इराणच्या संसदेला (मजलिस) आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्था (IAEA) सोबतच्या सहकार्याला स्थगिती देणारे महत्त्वाचे विधेयक मंजूर केले आहे. या निर्णयामुळे इराणच्या अणुकार्यक्रमावरील आंतरराष्ट्रीय देखरेख धोक्यात येणार असून, पश्चिमी राष्ट्रांशी पुन्हा तणाव वाढण्याची शक्यता आहे.

ही माहिती रॉयटर्स वृत्तसंस्थेने इराणच्या सरकारी माध्यम नूरन्यूजच्या हवाल्याने दिली आहे. तेहरानस्थित तस्निम वृत्तसंस्थेनेही या घडामोडीला दुजोरा देत संसदीय समितीचे प्रवक्ते इब्राहिम रेझाई यांचे विधान प्रसिद्ध केले आहे. त्यांनी सांगितले की, “इराणच्या अणुसुविधांवर सुरक्षा हमी मिळेपर्यंत IAEA ला कोणतीही माहिती, तपासणीची परवानगी किंवा देखरेखीचे कॅमेरे बसवण्याची मुभा दिली जाणार नाही.”

IAEA सोबतचे संबंध संकटात – पारदर्शकतेपासून दूर इराण

या विधेयकामुळे संयुक्त राष्ट्रांच्या अणुऊर्जा निगराणी संस्थेशी इराणचे संबंध थांबणार असल्याने, इराणच्या अणुकार्यक्रमाच्या पारदर्शकतेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. IAEA कडून बसवले जाणारे निरीक्षण कॅमेरे, नियमित तपासण्या आणि प्रगती अहवाल हे जगभरातील देशांसाठी इराणच्या अणुकार्यक्रमाच्या विश्वसनीयतेचे एकमेव माध्यम होते. विधेयक पूर्ण संसद सत्रात अंतिम मंजुरीसाठी सादर केले जाणार असून, तिथेही ते संमत झाले, तर इराणचा अणुकार्यक्रम आता पूर्णतः गोपनीयतेच्या आवरणात जाईल. इराणच्या अणुव्यवस्थेच्या पारदर्शकतेसाठी लावण्यात आलेली यंत्रणा कमजोर होईल आणि जागतिक पातळीवर संशय वाढेल.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : 400 kg enriched uranium missing : ‘इराणचे 400 किलो युरेनियम…’ अखेर उपराष्ट्रपती व्हान्स यांनी कबूल केलं सत्य

2015 अणुकराराचा भंग आणि युरेनियम समृद्धीकरणात वाढ

इराण आणि IAEA यांच्यातील तणावाची सुरुवात 2000 च्या दशकात झाली. तथापि, 2015 मध्ये झालेल्या संयुक्त व्यापक कृती आराखड्यामुळे (JCPOA) या तणावात काही प्रमाणात शिथिलता आली होती. परंतु 2018 मध्ये तत्कालीन अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या करारातून एकतर्फी माघार घेतली. त्यानंतर इराणनेही अटींचे उल्लंघन करत युरेनियम समृद्धीकरणात मोठी वाढ केली. IAEA कडून वारंवार चेतावणी दिली जात होती की, इराण ज्या प्रमाणात समृद्ध युरेनियम तयार करत आहे, ते भविष्यात अण्वस्त्र निर्मितीसाठी वापरले जाऊ शकते. त्यामुळे ही माहिती मिळवण्यासाठी IAEA च्या तपासणी व्यवस्था अत्यावश्यक मानली जात होती.

Iran’s parliament has passed a bill halting cooperation with the IAEA. The measure will bar IAEA inspectors from accessing Iran until the security of its nuclear facilities is ensured. pic.twitter.com/f2cMSAWHkN — Seyed Mohammad Marandi (@s_m_marandi) June 25, 2025

credit : social media

जागतिक प्रतिक्रियांची शक्यता आणि धोके

या विधेयकामुळे अमेरिका, युरोपीय देश आणि इस्रायलसारख्या राष्ट्रांनी तीव्र प्रतिक्रिया देण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यामुळे केवळ पश्चिम आशियाच नव्हे, तर संपूर्ण जगात अण्वस्त्र सुरक्षेच्या बाबतीत नव्याने चिंता वाढू शकते. इराण जर IAEA सोबतचा संवाद आणि सहकार्य थांबवतो, तर भविष्यात कारवाईची शक्यता गडद होईल.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Iran‑Israel ceasefire : इराणवर निर्बंध लादू शकतात ‘हे’ देश, जाणून घ्या अण्वस्त्रांबद्दल कोणी दिला होता इशारा?

 अणु कार्यक्रमाच्या दिशेने धोरणात्मक बदल

इराणकडून IAEA सोबतचा संवाद थांबवण्याचा निर्णय म्हणजे त्याच्या अणु धोरणात एक महत्त्वाचा टप्पा आहे. हा निर्णय म्हणजे पारदर्शकतेपासून मागे हटणे असून, भविष्यात आणखी गंभीर परिणाम निर्माण करू शकतो. या घडामोडीकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे, कारण हे पाऊल जागतिक अण्वस्त्र सुरक्षेसाठी मोठा धोका ठरू शकते. आता हे पाहणे महत्त्वाचे ठरेल की, जागतिक शक्तीपंढरं — विशेषतः अमेरिका आणि युरोपियन युनियन — या निर्णयावर कशा प्रकारे प्रतिक्रिया देतात.

Web Title: Iran to cut iaea ties new bill threatens nuclear program

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 25, 2025 | 01:25 PM

Topics:  

  • Iran Israel Conflict
  • Iran Vs America
  • Iran-Israel War
  • third world war

संबंधित बातम्या

ElFasher : सुदान गृहयुद्धाची नवी शोकांतिका; मशिदीपासून बाजारपेठेपर्यंत RSFचा कहर, ड्रोन हल्ल्यात 15 ठार, 12 जखमी
1

ElFasher : सुदान गृहयुद्धाची नवी शोकांतिका; मशिदीपासून बाजारपेठेपर्यंत RSFचा कहर, ड्रोन हल्ल्यात 15 ठार, 12 जखमी

Trillion peso March : ‘भ्रष्टाचाराचा पूर आणि जनतेचे दु:ख…’; नेपाळनंतर आता ‘या’ देशात होणार लोकशक्तीचा महास्फोट
2

Trillion peso March : ‘भ्रष्टाचाराचा पूर आणि जनतेचे दु:ख…’; नेपाळनंतर आता ‘या’ देशात होणार लोकशक्तीचा महास्फोट

Iran Revenge : जॉर्डन-सीरियापासून इराकपर्यंत… युद्धात विश्वासघात करणाऱ्या देशांवर इराण ‘असा’ घेतोय सूड
3

Iran Revenge : जॉर्डन-सीरियापासून इराकपर्यंत… युद्धात विश्वासघात करणाऱ्या देशांवर इराण ‘असा’ घेतोय सूड

Middle East : आखाती देश आक्रमण करणार… कतारने दिला इशारा, इस्रायलला मिळणार चोख प्रत्युत्तर
4

Middle East : आखाती देश आक्रमण करणार… कतारने दिला इशारा, इस्रायलला मिळणार चोख प्रत्युत्तर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.