Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

BRICS 2026: ‘आमच्याकडे आलात तर याद राखा!’ इराणचे UAE ला थेट युद्ध-आव्हान; भारत दोन्ही शत्रूंना आणणार एकाच टेबलावर

BRICS Iran US Israel Attack UAE : अमेरिका आणि इस्रायलच्या हल्ल्यांना प्रत्युत्तर म्हणून इराण संयुक्त अरब अमिराती आणि सौदी अरेबियावर सातत्याने हल्ले करत आहे. इराण, UAE आणि सौदी अरेबिया हे सर्व ब्रिक्सचे सदस्य देश आहेत.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Mar 28, 2026 | 01:19 PM
iran uae war threat brics summit india invitation september 2026

iran uae war threat brics summit india invitation september 2026

Follow Us
Close
Follow Us:
  • आखातात युद्धाचा भडका
  • भारताचे ‘ब्रिक्स’ निमंत्रण
  • मुत्सद्देगिरीची कसोटी

BRICS Summit 2026 India invitation : मध्य-पूर्वेतील वाळवंट आता रक्ताने माखण्याची भीती निर्माण झाली आहे. एकीकडे अमेरिका इराणवर मोठा भू-हल्ला (Ground Offensive) करण्याच्या तयारीत असताना, इराणने आपला मोर्चा आता इस्रायलवरून वळवून चक्क आपल्या शेजारील इस्लामिक देशांकडे, म्हणजेच संयुक्त अरब अमिराती (UAE) आणि सौदी अरेबियाकडे वळवला आहे. या भीषण तणावाच्या परिस्थितीत भारताने ‘ब्रिक्स’ (BRICS) या जागतिक व्यासपीठाचा वापर करून शांतता प्रस्थापित करण्यासाठी एक धाडसी पाऊल उचलले आहे.

UAE आणि सौदीवर इराणचा ‘ड्रोन’ वर्षाव!

गेल्या काही दिवसांत इराणने युएई आणि सौदी अरेबियावर शेकडो क्षेपणास्त्रे आणि आत्मघाती ड्रोन हल्ले केले आहेत. इराणचा आरोप आहे की, युएई हा अमेरिका आणि इस्रायलला मदत करून इराणविरुद्धच्या युद्धात सक्रिय भूमिका बजावत आहे. “जर अमेरिकेचे पायदळ आमच्या भूमीवर आले, तर युएईला त्याची मोठी किंमत मोजावी लागेल,” अशी उघड धमकी तेहरानने दिली आहे. होर्मुझची सामुद्रधुनी बंद असल्यामुळे आधीच जागतिक व्यापार ठप्प झाला असताना, आता या नव्या संघर्षामुळे कच्च्या तेलाचे संकट अधिक गडद झाले आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : India Bangladesh ties: ‘शेवटचा शब्द, आम्ही भारताच्या विरोधात…’ बांगलादेशच्या उच्चायुक्तांनी ‘असे’ म्हणून नवी दिल्लीत जिंकली मने

भारताची ‘ब्रिक्स’ मुत्सद्देगिरी: शत्रूंना एकत्र आणण्याचा प्रयत्न

भारत सध्या ब्रिक्स (BRICS) देशांचे अध्यक्षपद भूषवत आहे. मे महिन्यात होणारी परराष्ट्र मंत्र्यांची बैठक आणि सप्टेंबरमध्ये दिल्लीत होणारी १८ वी ब्रिक्स शिखर परिषद, यासाठी भारताने इराण, युएई आणि सौदी या तिन्ही देशांना निमंत्रण दिले आहे. विशेष म्हणजे, हे तिन्ही देश आता ब्रिक्सचे अधिकृत सदस्य आहेत. भारताचा हा प्रयत्न जगाला हे दाखवून देण्याचा आहे की, रणांगणावर एकमेकांचे रक्त सांडणारे देश चर्चेच्या टेबलावर एकत्र येऊ शकतात का? या परिषदेला रशियाचे पुतिन आणि चीनचे शी जिनपिंग यांचीही उपस्थिती असणार आहे, त्यामुळे हे व्यासपीठ युद्धाला पूर्णविराम देण्यासाठी महत्त्वाचे ठरू शकते.

EAM @DrSJaishankar, alongside MoS’ @KVSinghMPGonda and @PmargheritaBJP launched the logo, theme and website of India’s BRICS Chairship 2026. India looks forward to hosting BRICS members and partner countries over the year, to build resilience, innovation, cooperation and… https://t.co/aayka5mi4Q — Randhir Jaiswal (@MEAIndia) January 13, 2026

credit – social media and Twitter

इराणची मागणी अन् भारताची अडचण

इराण सातत्याने भारताकडे एक मागणी लावून धरत आहे: “भारताने ब्रिक्स व्यासपीठावरून अमेरिका आणि इस्रायलच्या हल्ल्यांचा निषेध करावा.” मात्र, पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखालील भारताने अद्याप असा कोणताही निषेध नोंदवलेला नाही. याचे मुख्य कारण म्हणजे इराण ज्या देशांवर हल्ले करत आहे (UAE आणि सौदी), ते भारताचे धोरणात्मक भागीदार आहेत. आपल्या मित्रांवर हल्ले करणाऱ्या देशाच्या बाजूने उभे राहणे भारतासाठी अशक्य आहे. त्यामुळेच भारत सध्या ‘वेट अँड वॉच’च्या भूमिकेत असून, दोन्ही बाजूंना शांत राहण्याचे आवाहन करत आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : War End: ‘सैन्य पाठवण्याची गरज भासणार नाही…’ 10 दिवसांचा डेडलाइन ड्रामा; रुबियोने सांगितला ट्रम्पचा खरा प्लॅन

सप्टेंबरमधील शिखर परिषद ठरणार ‘गेमचेंजर’?

९ आणि १० सप्टेंबर रोजी होणारी ब्रिक्स शिखर परिषद ही व्हर्च्युअल नसून प्रत्यक्ष होणार आहे. याचा अर्थ इराण आणि युएईच्या नेत्यांना एकाच छताखाली, एकाच शहरात समोरासमोर यावे लागेल. जर भारताने या नेत्यांना एका करारावर स्वाक्षरी करण्यास भाग पाडले, तर ते भारतीय परराष्ट्र धोरणाचे सर्वात मोठे यश मानले जाईल. मात्र, तोपर्यंत आखातातील मरीन कमांडोंची वाढती संख्या आणि इराणचे हल्ले जगाला भीतीच्या छायेत ठेवणार आहेत.

💡

Frequently Asked Questions

  • Que: इराणने UAE आणि सौदी अरेबियावर हल्ले का सुरू केले आहेत?

    Ans: इराणचा असा दावा आहे की युएई आणि सौदी अरेबिया हे अमेरिका आणि इस्रायलला इराणविरुद्धच्या लष्करी कारवाईत मदत करत आहेत.

  • Que: भारताने ब्रिक्स परिषदेसाठी कोणत्या देशांना आमंत्रित केले आहे?

    Ans: भारताने इराण, संयुक्त अरब अमिराती आणि सौदी अरेबिया या तिन्ही ब्रिक्स सदस्य देशांना आगामी शिखर परिषदेसाठी निमंत्रण दिले आहे.

  • Que: १८ वी ब्रिक्स शिखर परिषद कधी आणि कुठे होणार आहे?

    Ans: ही परिषद ९ आणि १० सप्टेंबर २०२६ रोजी भारतात पार पडणार असून, त्यात रशिया आणि चीनचे राष्ट्राध्यक्षही सहभागी होणार आहेत.

Web Title: Iran uae war threat brics summit india invitation september 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 28, 2026 | 01:19 PM

Topics:  

  • Brics Council
  • Saudi Arabia
  • UAE
  • World War 3

संबंधित बातम्या

War Update : येमेनची रणमैदानात उडी! अबु धाबीवर क्षेपणास्त्र हल्ला, 5 भारतीय जखमी; इराणचा थायलंडला ‘स्पेशल’ पास
1

War Update : येमेनची रणमैदानात उडी! अबु धाबीवर क्षेपणास्त्र हल्ला, 5 भारतीय जखमी; इराणचा थायलंडला ‘स्पेशल’ पास

Middle East Tension : होर्मुझवर आता राज करणार ट्रम्प? त्यांच्या ‘या’ एका विधानाने जगात खळबळ; सौदी प्रिन्सवरही थेट वार
2

Middle East Tension : होर्मुझवर आता राज करणार ट्रम्प? त्यांच्या ‘या’ एका विधानाने जगात खळबळ; सौदी प्रिन्सवरही थेट वार

War End: ‘सैन्य पाठवण्याची गरज भासणार नाही…’ 10 दिवसांचा डेडलाइन ड्रामा; रुबियोने सांगितला ट्रम्पचा खरा प्लॅन
3

War End: ‘सैन्य पाठवण्याची गरज भासणार नाही…’ 10 दिवसांचा डेडलाइन ड्रामा; रुबियोने सांगितला ट्रम्पचा खरा प्लॅन

Cyber Warfare: इराणचा अमेरिकेवर हॅकिंग स्ट्राईक! ट्रम्प यांच्या ‘राईट हँड’चा डेटा हॅक; 2010 पासूनचा डेटा लीक, गुपिते होणार उघड?
4

Cyber Warfare: इराणचा अमेरिकेवर हॅकिंग स्ट्राईक! ट्रम्प यांच्या ‘राईट हँड’चा डेटा हॅक; 2010 पासूनचा डेटा लीक, गुपिते होणार उघड?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.