Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 8 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Saudi Arebia News : सौदी अरेबियाच्या आर्थिक केंद्रावर हल्ला ? अरामको टॉवरचे नुकसान; हुथींवर संशय

Saudi Arebia News : सौदी अरेबियाची राजधानी रियाधमधील KAFD परिसरातील अरामकोच्या इमारतीचे क्षेपणास्त्र हल्ल्याच्या प्रयत्नादरम्यान नुकसान झाले. सौदीने हुथी बंडखोरांची क्षेपणास्त्रे रोखल्याचा दावा केला असून या घटनेत जीवितहानी झालेली नाही. मध्यपूर्वेतील तणाव पुन्हा वाढण्याची चिन्हे आहेत.

  • By Chaitanya Pisal
Updated On: Nov 08, 2026 | 08:48 PM
फोटो सौजन्य सोशल मीडिया

फोटो सौजन्य सोशल मीडिया

Follow Us
Follow Us:
  • रियाधमध्ये मोठा स्फोट; अरामकोवर हल्ला
  • सौदीने क्षेपणास्त्रे रोखली
  • सौदीच्या आर्थिक केंद्राला लक्ष
Saudi Arebia News : मध्यपूर्वेत संघर्ष आता सौदी अरेबियाच्या राजधानीपर्यंत पोहोचला आहे . रविवारी म्हणजेच ८ नोव्हेंबर रियाध येथील किंग अब्दुल्ला फायनान्शियल डिस्ट्रिक्ट ( KAFD ) परिसरातील सौदी अरामकोच्या प्रशासकीय इमारतीचे नुकसान झाले . सौदी अरेबियाच्या ऊर्जा मंत्रालयाने या घटनेला हल्ल्याचा पर्यटन म्हंटले आहे . सौदीच्या नेत्तृत्वाखाली आघाडीने येमेनमधील हुथी बंडखोरांनी रियाधच्या दिशेने डागलेली क्षेपणास्त्रे रोखल्याचा दावा केला आहे . या घटनेमुळे सौदीच्या आर्थिक आणि ऊर्जा क्षेत्राच्या सुरक्षेबाबत चिंता वाढली आहे .

कारण आता हुथींकडे सुद्धा आधुनिक हत्यारे , बॅलेस्टिक मिसाईल्स आले असून त्यांचे लढाई करणारे लोक हे पूर्णपणे प्रशिक्षित झाले असून त्यांचा धोका अधिक प्रमाणात वाढला आहे . हुथींच्या मागे इराणची ताकद लागली असल्याचे बोलले जात असते . इराणकडून हुथींना वेळोवेळी सगळ्या प्रकारची मदत मिळत असल्यामुळेच सौदीवर जोरदार हल्ले करण्यात त्यांना यश येत आहे . असे सौदी आणि अमेरिकेचे म्हणणे आहे . मुळात ही लढाई सौदीने स्वतः ओढवून घेतली आहे . असे राजकीय विश्लेषक सांगतात .

Yeman Breaking : येमेनमध्ये विस्थापनाचा कहर; ३ लाखांहून जास्त नागरिक बेघर, १.६५ लाख मुलांचे भविष्य अंधारात

रियाधमध्ये मोठा स्फोट; अरामकोवर हल्ला

रियाधमध्ये रविवारी सकाळी मोठ्या स्फोटांचे आवाज ऐकू आले . त्यानंतर किंग अब्दुल्ला फायनान्शियल डिस्ट्रिक्टमधील अरामकोच्या उंच इमारतीचे नुकसान झाल्याचे समोर आले . प्रत्यक्षदर्शी यांनी इमारतीच्या अनेक मजल्यांवरील खिडक्यांच्या काचा फुटल्याची माहिती दिली .

काही भागांच्या बाह्य संरचनेलाही नुकसान झाल्याचे वृत्त आहे . सौदीच्या ऊर्जा मंत्रालयाचे दिलेल्या माहितीनुसार , हल्ल्याच्या प्रयत्नदरम्यान पडलेल्या क्षेपणास्त्राच्या तुकड्यामुळे इमारतीचे किरकोळ नुकसान झाले आहे . या घटनेत कोणतीही जीवितहानी किंवा जखमी झाल्याची नोंद नाही .

Sweden News : होलोकॉस्ट नाकारणे आता ठरणार गुन्हा; स्वीडनच्या संसदेत घटनादुरुस्ती मंजूर

सौदीने क्षेपणास्त्रे रोखली

सौदीच्या नेतृत्वाखाली लष्करी आघाडीने दिलेल्या माहितीनुसार , रियाधच्या दिशेने डागलेली दोन बॅलेस्टिक मिसाईल्स हवाई संरक्षण यंत्रणेने नष्ट केली . याशिवाय रियाध आणि दक्षिणेकडील भागांकडे येणारी क्रूझ मिसाईल्स सुद्धा रोखण्यात आल्याचे वृत्त आहे . या हल्ल्यामागे येमेनमधील इराणमधील हुथी बंडखोर असल्याचा आरोप सौदी आघाडीने केला आहे . मात्र , या विशिष्ठ घटनेबाबत हुथींकडून सुरवातीला अधिकृत प्रतिक्रिया आलेली न्हवती . त्यामुळे हल्ल्याची जबाबदारी आणि इमारतीच्या नुकसानीच्या नेमके कारण याबाबत अधिकृतपणे समोर आलेली नाही .

सौदीच्या आर्थिक केंद्राला लक्ष

किंग अब्दुल्ला फायनान्शियल टॉवर हा सौदी अरेबियातील महत्वाचा आर्थिक आणि व्यावसायिक परिसर आहे . येथे अनेक मोठ्या कंपन्यांची कार्यालये सौदीच्या सार्वभौम संपत्ती निधी ( PIF ) आणि शेअर बाजाराशी संबंधित महत्वाच्या संस्था आहेत .

त्यामुळे या परिसरातील अरामकोच्या इमारतीचे नुकसान होणे ही सौदीसाठी सुरक्षेच्या दृष्टीने गंभीर बाब मानली जात आहे.दरम्यान येमेनमधील संघर्ष पुन्हा तीव्र झाल्याने सौदीची ऊर्जा केंद्रे , विमानतळ आणि महत्वाच्या पायाभूत सुविधांवरील हल्ल्यांचा धोका वाढला आहे . या घटनेमुळे आखाती देशांमधील सुरक्षा परिस्थिती आणि जागतिक तेल पुरवठयाबाबतही चिंता व्यक्त केली जात आहे .

 

 

Web Title: Saudi arabia riyadh aramco tower missile attack damage kafd cp

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 08, 2026 | 08:48 PM

Topics:  

  • Houthi
  • Marathi News
  • Saudi Arabia

संबंधित बातम्या

Yeman Breaking : येमेनमध्ये विस्थापनाचा कहर; ३ लाखांहून जास्त नागरिक बेघर, १.६५ लाख मुलांचे भविष्य अंधारात
1

Yeman Breaking : येमेनमध्ये विस्थापनाचा कहर; ३ लाखांहून जास्त नागरिक बेघर, १.६५ लाख मुलांचे भविष्य अंधारात

Agriculture career: शेती-शिवार आता बनले कॉर्पोरेट हब! १२ वी ॲग्रीकल्चरनंतर ‘या’ कोर्सेसना आहे मोठी मागणी; पाहा जॉब ऑप्शन्स
2

Agriculture career: शेती-शिवार आता बनले कॉर्पोरेट हब! १२ वी ॲग्रीकल्चरनंतर ‘या’ कोर्सेसना आहे मोठी मागणी; पाहा जॉब ऑप्शन्स

Sweden News : होलोकॉस्ट नाकारणे आता ठरणार गुन्हा; स्वीडनच्या संसदेत घटनादुरुस्ती मंजूर
3

Sweden News : होलोकॉस्ट नाकारणे आता ठरणार गुन्हा; स्वीडनच्या संसदेत घटनादुरुस्ती मंजूर

Fake Loan Fraud: तुमच्या नावावर गुपचूप कुणी घेतलंय कर्ज? आधार-पॅनचा गैरवापर २ मिनिटांत असा पकडा
4

Fake Loan Fraud: तुमच्या नावावर गुपचूप कुणी घेतलंय कर्ज? आधार-पॅनचा गैरवापर २ मिनिटांत असा पकडा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.