Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Cyber Warfare: रणांगणासोबत सायबर रणभूमीवरही घनघोर लढाई; इराणची इंटरनेट सेवा कोलमडली; तर अमेरिकेचा 50 TB डेटा चोरीला

इराण-अमेरिका-इस्रायल युद्ध आता डिजिटल आघाडीवरही वाढले आहे. सायबर युद्ध हे या संघर्षाचे प्रमुख केंद्रबिंदू बनले आहे, ज्यामध्ये इंटरनेट कनेक्टिव्हिटी, सरकारी वेबसाइट आणि मोबाइल अ‍ॅप्सना लक्ष्य केले जात आहे.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Mar 12, 2026 | 12:01 PM
iran us cyber war stryker data theft internet outage marathi news

iran us cyber war stryker data theft internet outage marathi news

Follow Us
Follow Us:
  • डिजिटल महायुद्ध
  • मोबाईल ॲप्सचा शस्त्र म्हणून वापर
  • अमेरिकेला मोठा तडाखा

Iran US Cyber War 2026 : गेल्या १० दिवसांपासून इराण, अमेरिका आणि इस्रायल (US-Israel Iran War) यांच्यात सुरू असलेले युद्ध आता केवळ जमिनीवर किंवा आकाशापुरते मर्यादित राहिलेले नाही. २८ फेब्रुवारी २०२६ रोजी सुरू झालेल्या या संघर्षाने आता ‘हायब्रीड युद्धाचे’ (Hybrid War) रूप धारण केले आहे. या युद्धात आता संगणकाचे कीबोर्ड हे बंदुकीच्या गोळ्यांप्रमाणे वापरले जात असून, दोन्ही देशांच्या डिजिटल पायाभूत सुविधांना लक्ष्य केले जात आहे.

इराणची इंटरनेट यंत्रणा व्हेंटिलेटरवर?

युद्धाच्या सुरुवातीपासूनच अमेरिका आणि इस्रायलच्या सायबर सैन्याने इराणवर भीषण हल्ले चढवले आहेत. ताज्या अहवालानुसार, इराणमधील इंटरनेट कनेक्टिव्हिटी अवघी ४ टक्क्यांवर आली आहे. फायबर ऑप्टिक केबल्सचे नुकसान करून आणि सर्व्हरवर ‘डिनायल ऑफ सर्विस’ (DDoS) हल्ले करून इराणचा जगाशी असलेला संपर्क तोडण्याचा प्रयत्न केला जात आहे. तेहरानमधील ट्रॅफिक कॅमेरे, मोबाईल नेटवर्क्स आणि सरकारी वेबसाईट्स सध्या हॅकर्सच्या ताब्यात असून संपूर्ण यंत्रणा विस्कळीत झाली आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Global Oil Crisis: इंधन दर कमी होणार? भारताला युद्धातही दिलासा; आपत्कालीन साठ्यातून 400 दशलक्ष बॅरल तेल सोडण्याच्या IEA चा निर्णय

बडेसबा ॲप हॅक: मानसिक युद्धाचा थरार

सायबर हल्लेखोरांनी आता थेट लोकांच्या मोबाईलमध्ये प्रवेश केला आहे. इराणमधील अत्यंत लोकप्रिय असलेले ‘बडेसबा’ (Badesaba) हे प्रार्थना वेळ सांगणारे ॲप हॅक करण्यात आले आहे. या ॲपद्वारे वापरकर्त्यांना सरकारविरोधी संदेश आणि युद्धाची भीती घालणारे नोटिफिकेशन्स पाठवले जात आहेत. तज्ज्ञांच्या मते, हे एक नियोजित ‘सायकोलॉजिकल ऑपरेशन’ (PSYOPS) असून शत्रू देशातील जनतेचे मनोबल खच्ची करणे हा यामागील मुख्य उद्देश आहे.

Iran‑linked hackers hit US medical giant Stryker in a cyberattack, claiming 50TB of data in retaliation for US‑Israeli strikes in Iran, disrupting the company’s global networks https://t.co/NSpT3E43Su pic.twitter.com/nqVVNtjLOw — Al Jazeera English (@AJEnglish) March 11, 2026

credit – social media and Twitter

इराणचा अमेरिकेला जबरदस्त पलटवार

इराणही या सायबर युद्धात मागे नाही. इराणशी संबंधित असलेल्या ६० हून अधिक हॅकर गटांनी जगभरातील अमेरिकन संस्थांना लक्ष्य केले आहे. ११ मार्च २०२६ रोजी अमेरिकेची प्रसिद्ध मेडिकल टेक कंपनी ‘स्ट्रायकर कॉर्पोरेशन’ (Stryker Corporation) वर मोठा सायबर हल्ला झाला. अमेरिकन सुरक्षा यंत्रणांच्या मते, या हल्ल्यात कंपनीचा तब्बल ५० टेराबाइट (TB) संवेदनशील डेटा चोरीला गेला आहे. या हल्ल्यामुळे अमेरिकेच्या आरोग्य, बँकिंग आणि संरक्षण क्षेत्रातील डिजिटल सुरक्षेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : World Peace: ‘तरच जग महायुद्धपासून वाचू शकते..’ इराणच्या ‘त्या’ 3 अटींवर सर्वच महासत्तांचे लक्ष; रशिया-पाकिस्तान मैदानात

हायब्रीड युद्धाचे नवे युग

हे युद्ध आता केवळ दोन देशांमधील सीमावाद राहिलेला नाही. डेटा चोरी, वेबसाईट डिफेसमेंट आणि मालवेअर हल्ल्यांच्या माध्यमातून एकमेकांचे आर्थिक कंबरडे मोडण्याचे प्रयत्न सुरू आहेत. ऊर्जा प्रकल्प, पाणीपुरवठा यंत्रणा आणि रेल्वे नेटवर्क्सना लक्ष्य करून देशात अराजकता माजवण्याचे तंत्र दोन्ही बाजूंनी वापरले जात आहे. सध्या हे युद्ध थांबण्याची कोणतीही चिन्हे दिसत नसून, येणाऱ्या दिवसांत डिजिटल हल्ल्यांची तीव्रता अधिक वाढण्याची शक्यता आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: इराणमधील इंटरनेट सेवा किती टक्के विस्कळीत झाली आहे?

    Ans: अमेरिका आणि इस्रायलच्या सायबर हल्ल्यांमुळे इराणची इंटरनेट कनेक्टिव्हिटी सुमारे ९६ टक्क्यांनी कमी झाली असून ती आता केवळ ४ टक्क्यांवर उरली आहे.

  • Que: 'स्ट्रायकर कॉर्पोरेशन'वर झालेल्या हल्ल्यात किती डेटा चोरीला गेला?

    Ans: अमेरिकन मेडिकल टेक कंपनी स्ट्रायकर कॉर्पोरेशनचा ५० टेराबाइट (TB) इतका प्रचंड डेटा इराणी हॅकर्सनी चोरल्याचा दावा केला जात आहे.

  • Que: सायबर युद्धात 'बडेसबा' ॲपचा काय संबंध आहे?

    Ans: 'बडेसबा' हे इराणमधील लोकप्रिय ॲप हॅक करून त्याद्वारे लोकांच्या मोबाईलवर सरकारविरोधी आणि भीतीदायक संदेश पाठवून मानसिक युद्ध छेडले जात आहे.

Web Title: Iran us cyber war stryker data theft internet outage marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 12, 2026 | 12:01 PM

Topics:  

  • Cyber War
  • US-Israel Iran War
  • World War 3

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.