Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 8 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

US Diwali : अमेरिकेत हिंदूं उत्सवावर वंशद्वेषाचे सावट; ट्रम्प यांच्या समर्थकांचा सिएटलमध्ये दिवाळी कार्यक्रमात गोंधळ

US Diwali : अमेरिकेत दिवाळी साजरी होत असताना हिंदू समुदायाविरुद्ध वंशद्वेष वाढल्याचे दिसून आले आहे. सिएटलमध्ये, जेक लँगने दिवाळीच्या उत्सवात व्यत्यय आणला आणि हिंदूंबद्दल अपमानजनक टिप्पणी केली.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Nov 08, 2026 | 12:45 PM
Jake Lang Seattle Diwali Seattle Diwali Protest News

Jake Lang Seattle Diwali Seattle Diwali Protest News

Follow Us
Follow Us:
  • सिएटलमधील उत्सवात अडथळा
  • वंशद्वेषी घोषणा आणि पोस्ट
  • वाढता द्वेष आणि विरोध

जगभरात प्रकाश आणि उत्साहाचा सण म्हणजेच दिवाळी (Diwali) अत्यंत आनंदाने साजरी केली जात आहे. मात्र, अमेरिकेत या सणाच्या काळात एका अप्रिय घटनेमुळे भारतीय आणि हिंदू समुदायामध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. वॉशिंग्टन राज्यातील सिएटल शहरात आयोजित दिवाळी उत्सवाच्या कार्यक्रमात अमेरिकन कट्टर उजव्या विचारसरणीच्या कार्यकर्त्यांनी अचानक घुसून गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. या आंदोलकांनी हिंदू समुदायाला लक्ष्य करत जातीय व वंशद्वेषी शेरेबाजी केली.

घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन उत्सवात उपस्थित असलेल्या नागरिकांनी त्वरित एकत्र येत या आंदोलकांना पुढे जाण्यापासून रोखले आणि कोणताही मोठा अनुचित प्रकार घडण्यापूर्वी परिस्थिती हाताळली.

 ‘ते’ फलक आणि सोशल मीडियावरील आक्षेपार्ह पोस्ट

प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, या गोंधळाचे नेतृत्व जेक लँग (Jake Lang) नावाच्या उजव्या विचारसरणीच्या कार्यकर्त्याने केले होते. लँग आणि त्याच्या साथीदारांच्या हातात ‘सर्व ठिपक्यांच्या डोक्यांना हद्दपार करा’ (Deport All Dot Heads) अशा अक्षरांचे वादग्रस्त फलक होते. हिंदू महिलांच्या कपाळावरील टिकली किंवा कुंकवाला लक्ष्य करून ही अपमानास्पद घोषणा वापरली गेल्याचे स्पष्ट झाले आहे.

या घटनेनंतर जेक लँगने सोशल मीडियावर या आंदोलनाचे फोटो शेअर केले. त्यांनी असा दावा केला की, टेक्साससारख्या पारंपरिक रिपब्लिकन राज्यांमध्ये राजकीय फेरबदल होण्यास आणि तिथे डेमोक्रॅट्स पक्षाचा विजय होण्यास हिंदू समुदाय जबाबदार आहे. लँगने आपल्या पोस्टमध्ये अत्यंत अपमानास्पद आणि चिथावणीखोर भाषेचा वापर करत आपल्या संतापाला वाट करून दिली.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Israel Politics: बेंजामिन नेतान्याहूंची सुटली सत्तेची पकड; राष्ट्रपतींनी गडी आयझेनकोट यांना दिले सरकार स्थापनेचे आमंत्रण

राजकीय पराभवाचा राग आणि ६ जानेवारीच्या हल्ल्याशी संबंध

या संपूर्ण प्रकरणामागे अमेरिकेतील राजकीय घडामोडींचा मोठा प्रभाव असल्याचे दिसून येत आहे. लँग याने नुकत्याच पार पडलेल्या मध्यावधी निवडणुकांच्या निकालांवर अविश्वास व्यक्त केला आहे. टेक्सास आणि कॅन्सससारख्या राज्यांमध्ये ‘रेड वॉल’ (रिपब्लिकन पक्षाचा बालेकिल्ला) कोसळल्याचा आरोप करत त्याने हा निकाल हेराफेरीचा असल्याचे म्हटले आहे.

We were just ASSAULTED by dozens of ANTIFA & HINDUS @ the Seattle Diwali Festival!!!! I guess they didn’t like our “Deport All Dot Heads” sign!!! 🇮🇳✈️ Hindus flipped Texas blue. Fuck them. https://t.co/mS3oBdEAYZ — Jake Lang – January 6 Political Prisoner 🇺🇸 (@JakeLang) November 8, 2026

credit – social media and Twitter

विशेष म्हणजे, जेक लँग हा ६ जानेवारी २०२१ रोजी अमेरिकन कॅपिटलवर झालेल्या प्रसिद्ध हल्ल्यातील प्रमुख आरोपींपैकी एक राहिला आहे. या प्रकरणी त्याला चार वर्षांचा तुरुंगवास भोगावा लागला होता. २०२५ मध्ये राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पदभार स्वीकारल्यानंतर पहिल्याच दिवशी त्याला माफी दिली होती. आता पुन्हा एकदा त्याने वॉशिंग्टन डीसी येथील कॅपिटलवर निषेध मार्च काढण्याचे आवाहन सोशल मीडियावरून केले आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Trump Diwali : ‘ट्रम्प यांच्या हाती ‘हनुमान चालिसा…’; ओव्हल ऑफिसमधील दिवाळी सोहळ्याचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल

 अमेरिकेत हिंदू समुदायाला लक्ष्य करण्याच्या घटनांमध्ये वाढ?

सिएटलमधील ही घटना अचानक घडलेली नसून, गेल्या काही दिवसांत अमेरिकेत हिंदू धार्मिक स्थळे आणि समुदायाला लक्ष्य करण्याच्या प्रयत्नांमध्ये वाढ झाल्याचे दिसून येत आहे. नुकतेच शिकागोजवळील एका हिंदू मंदिरात सामूहिक गोळीबार करण्याची योजना आखणाऱ्या १९ वर्षीय अलेक्झांड्रोस पापोराकिस नावाच्या संशयिताला सुरक्षा यंत्रणांनी वेळेत अटक केली होती.

या साखळी घटनांमुळे अमेरिकेतील अनिवासी भारतीय आणि हिंदू समाजात सुरक्षिततेविषयी चिंता व्यक्त केली जात आहे. स्थानिक प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी अशा वंशद्वेषी कृत्यांचा निषेध केला असून, सांस्कृतिक सण शांततेत पार पाडण्यासाठी सुरक्षा व्यवस्था वाढवण्याची मागणी केली जात आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: सिएटलमध्ये दिवाळी उत्सवात काय घटना घडली?

    Ans: सिएटलमधील दिवाळी उत्सवा दरम्यान उजव्या विचारसरणीच्या कार्यकर्त्यांनी घुसून 'Deport All Dot Heads' असे फलक दाखवत गोंधळ घालण्याचा आणि हिंदूंविरोधात अपमानास्पद वक्तव्ये करण्याचा प्रयत्न केला.

  • Que: या घटनेतील मुख्य संशयित आंदोलक कोण आहे?

    Ans: या घटनेत 'व्हाइट रिप्लेसमेंट' संघटनेचा प्रमुख आणि ६ जानेवारी २०२१ च्या कॅपिटल हल्ल्यातील आरोपी जेक लँग (Jake Lang) मुख्य भूमिकेत होता.

  • Que: अमेरिकेत हिंदू मंदिरांवर किंवा कार्यक्रमांवर अलीकडे काय घडामोडी झाल्या?

    Ans: सिएटलमधील घटनेआधी शिकागोजवळील एका हिंदू मंदिरात सामूहिक गोळीबाराचा कट रचल्याप्रकरणी १९ वर्षीय अलेक्झांड्रोस पापोराकिसला अटक करण्यात आली होती.

Web Title: Seattle diwali celebration disrupted jake lang controversy hp

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 08, 2026 | 12:45 PM

Topics:  

  • America
  • Diwali 2026
  • Donald Trump
  • World news

संबंधित बातम्या

Harry Boxer : लॉरेन्स बिश्नोईचा उजवा हात हॅरी बॉक्सरला अमेरिकेत केली अटक; भारतात आणण्याची तयारी सुरु
1

Harry Boxer : लॉरेन्स बिश्नोईचा उजवा हात हॅरी बॉक्सरला अमेरिकेत केली अटक; भारतात आणण्याची तयारी सुरु

Horizon Europe : भारताचा ‘होरायझन युरोप’मध्ये प्रवेश निश्चित; युरोपियन युनियनसोबतच्या वाटाघाटी यशस्वी, संशोधकांसाठी सुवर्णकाळ
2

Horizon Europe : भारताचा ‘होरायझन युरोप’मध्ये प्रवेश निश्चित; युरोपियन युनियनसोबतच्या वाटाघाटी यशस्वी, संशोधकांसाठी सुवर्णकाळ

Israel Politics: बेंजामिन नेतान्याहूंची सुटली सत्तेची पकड; राष्ट्रपतींनी गडी आयझेनकोट यांना दिले सरकार स्थापनेचे आमंत्रण
3

Israel Politics: बेंजामिन नेतान्याहूंची सुटली सत्तेची पकड; राष्ट्रपतींनी गडी आयझेनकोट यांना दिले सरकार स्थापनेचे आमंत्रण

Accident News: दिवाळीचा सण ठरला काळ! ५ डिसेंबरच्या लग्नाआधीच दुचाकी अपघातात तरुणाचा जागीच मृत्यू!
4

Accident News: दिवाळीचा सण ठरला काळ! ५ डिसेंबरच्या लग्नाआधीच दुचाकी अपघातात तरुणाचा जागीच मृत्यू!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.