Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Bahrain Shia: ‘संयुक्त अरब अमिरातीपासून बहरीनपर्यंत जलद कारवाई…’, इराण युद्धानंतर आखाती प्रदेशात शिया मुस्लिमांच्या अडचणी वाढल्या

UAE deports 15000 Pakistani Shia : इराण युद्धानंतर, संयुक्त अरब अमिरातीपासून बहरीनपर्यंत शिया मुस्लिमांचे हालअपेष्टा वाढल्या आहेत. बहरीनने शिया मुस्लिमांच्या निधीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: May 27, 2026 | 07:44 PM
iran war impact uae deports pakistani shia bahrain controls funds citizenship

iran war impact uae deports pakistani shia bahrain controls funds citizenship

Follow Us
Close
Follow Us:
  • शिया मुस्लिमांवर कठोर कारवाई
  • पाकिस्तानी नागरिकांना हद्दपार
  • निधी आणि नागरिकत्वावर गदा

UAE deports 15000 Pakistani Shia : आखाती देशांमधील (Gulf Region) भूराजकीय आणि धार्मिक समीकरणे इराणमधील युद्धजन्य परिस्थितीनंतर वेगाने बदलू लागली आहेत. संयुक्त अरब अमिराती (UAE) आणि बहरीन या सुन्नी बहुसंख्य सत्ता असलेल्या देशांनी आपापल्या सीमांमध्ये राहणाऱ्या शिया मुस्लिम समुदायाविरुद्ध अचानक अत्यंत कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. इराणशी वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, या दोन्ही देशांना आपल्या अंतर्गत सुरक्षेची आणि हेरगिरीची मोठी भीती सतावत आहे. यामुळेच गेल्या काही आठवड्यांत शिया नागरिकांचे मोठ्या प्रमाणावर स्थलांतर, अटक आणि त्यांच्या आर्थिक नाड्या आवळण्याचे सत्र सुरू झाले आहे, ज्यामुळे आंतरराष्ट्रीय राजकारणात मोठी खळबळळ उडाली आहे.

यूएईमधून १५,००० पाकिस्तानी शियांची हद्दपारी?

या संपूर्ण वादातील सर्वात धक्कादायक खुलासा पाकिस्तानी संसदेत सादर झालेल्या अधिकृत नोंदींवरून झाला आहे. या अहवालानुसार, संयुक्त अरब अमिरातीच्या प्रशासनाने सुरक्षा आणि इराणला गुप्त निधी पुरवल्याच्या संशयावरून तब्बल १५,००0 पाकिस्तानी शिया नागरिकांना बळजबरीने देशाबाहेर काढले आहे. अत्यंत गंभीर बाब म्हणजे, या नागरिकांचे मोबाईल फोन आणि कष्टाची कमाई (पैसे) देखील तेथील अधिकाऱ्यांनी जप्त केल्याचा आरोप पाकिस्तानच्या खासदारांनी केला आहे. यूएई सरकारने आंतरराष्ट्रीय दबावामुळे अधिकृतपणे हा दावा नाकारला असला, तरी प्रत्यक्ष जमिनीवरील परिस्थिती वेगळीच चित्र दर्शवत आहे. पाकिस्तानी सरकारने यावर बचावात्मक भूमिका घेत हद्दपार केलेले लोक गुन्हेगारी पार्श्वभूमीचे असल्याचे म्हटले आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Rafale Deal: ‘राफेल आमचे, अस्त्र-ब्रह्मोसही आमचेच!’ युक्रेनच्या खोट्या प्रचारावर भारताचा जोरदार प्रहार; पाहा काय आहे वाद?

बहरीनमध्ये निधीवर नियंत्रण आणि नागरिकत्व रद्द करण्याची तयारी

दुसरीकडे, बहरीन सरकारने शिया समुदायाला आर्थिक आणि राजकीयदृष्ट्या कमकुवत करण्यासाठी कायदेशीर फास आवळला आहे. बहरीनमध्ये शिया मुस्लिमांची लोकसंख्या अंदाजे ४५ टक्के आहे, जी सरकारसाठी डोकेदुखी ठरत आहे. बहरीन सरकारने शियांच्या धार्मिक देणग्या आणि निधीचे व्यवस्थापन करणाऱ्या ‘जाफरी एंडोमेंट फाउंडेशन’ला थेट सरकारी इस्लामिक संस्थेच्या नियंत्रणाखाली आणणारा नवीन कायदा मंजूर केला आहे. यामुळे आतापर्यंत स्वतंत्रपणे वापरल्या जाणाऱ्या शियांच्या देणग्यांवर थेट सुन्नी शासनाचे नियंत्रण आले आहे. एवढेच नव्हे, तर इराणशी वैचारिक किंवा कौटुंबिक संबंध असल्याच्या संशयावरून अनेक शिया नागरिकांचे बहरीनचे नागरिकत्व काढून घेण्याची कायदेशीर प्रक्रिया देखील सुरू करण्यात आली आहे.

UAE deports Pakistani Shiites: jobs lost and savings frozen amid Iran war | South China Morning Post https://t.co/FWMo9SblEe — Aditya Raj Kaul (@AdityaRajKaul) May 25, 2026

credit – social media and Twitter

धार्मिक नेत्यांची धरपकड आणि हेरगिरीचे आरोप

इराण आणि आखाती देशांमधील युद्धादरम्यान बहरीनमधून काही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते, ज्यामध्ये स्थानिक शिया नागरिक इराणच्या लष्करी कारवाईचा आनंद साजरा करताना दिसत होते. या घटनेनंतर दोन्ही देशांच्या गुप्तचर यंत्रणा सतर्क झाल्या. यूएईने आतापर्यंत २७ प्रमुख शिया धार्मिक नेत्यांना थेट ‘इराणचे हेर’ असल्याच्या आरोपाखाली अटक केली आहे. बहरीनमध्येही हीच परिस्थिती असून, सोशल मीडियावरून सरकारविरोधी किंवा इराणच्या समर्थनार्थ लिहिणाऱ्या धार्मिक नेत्यांना ‘उपद्रवी’ घोषित करून तुरुंगात डांबले जात आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : US-Iran Deal: इराणचा ‘हा’ एकच निर्णय भारतासह 8 देशांसाठी धक्कादायक! 11 लाख कोटींच्या खजिन्यासाठी अट; जागतिक बँकिंग क्षेत्रात खळबळ

आखाती देशांमधील सुन्नी-शिया संघर्षाची पार्श्वभूमी

हा वाद केवळ तात्कालिक नसून त्याला अनेक दशकांचा ऐतिहासिक आणि धार्मिक संदर्भ आहे. मध्यपूर्वेमध्ये इराण हा शिया बहुसंख्य देश आहे, तर सौदी अरेबिया, यूएई आणि बहरीनमध्ये सुन्नी राजवट आहे. इराणने युद्धकाळात यूएई आणि बहरीनवर क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ले चढवले होते. या हल्ल्यांनंतर या देशांना भीती आहे की, त्यांच्या देशात राहणारे शिया नागरिक इराणसाठी ‘स्लीपर सेल’ किंवा अंतर्गत गुप्तहेर म्हणून काम करू शकतात. यामुळेच युद्धविराम झाल्यानंतर दोन्ही देशांनी शिया समुदायाविरुद्ध अत्यंत आक्रमक मोहीम उघडली आहे. या कारवाईमुळे आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटनांनी चिंता व्यक्त केली असली, तरी आखाती देश आपल्या राष्ट्रीय सुरक्षेच्या मुद्द्यावर तडजोड करण्यास तयार नाहीत.

Web Title: Iran war impact uae deports pakistani shia bahrain controls funds citizenship

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 27, 2026 | 07:44 PM

Topics:  

  • UAE
  • US-Israel Iran War
  • World news

संबंधित बातम्या

US Iran Tension : इराणसोबत डील करण्यासाठी तडफडत आहेत ट्रम्प? IRGC च्या ‘त्या’ दाव्याने खळबळ, नेमकं काय आहे कारण?
1

US Iran Tension : इराणसोबत डील करण्यासाठी तडफडत आहेत ट्रम्प? IRGC च्या ‘त्या’ दाव्याने खळबळ, नेमकं काय आहे कारण?

US-Iran Deal: इराणचा ‘हा’ एकच निर्णय भारतासह 8 देशांसाठी धक्कादायक! 11 लाख कोटींच्या खजिन्यासाठी अट; जागतिक बँकिंग क्षेत्रात खळबळ
2

US-Iran Deal: इराणचा ‘हा’ एकच निर्णय भारतासह 8 देशांसाठी धक्कादायक! 11 लाख कोटींच्या खजिन्यासाठी अट; जागतिक बँकिंग क्षेत्रात खळबळ

India US Critical Minerals Deal : चीनची दादागिरी संपणार? भारत अमेरिकेत ‘दुर्मिळ खनिजां’साठी महत्त्वपूर्ण करारावर स्वाक्षरी
3

India US Critical Minerals Deal : चीनची दादागिरी संपणार? भारत अमेरिकेत ‘दुर्मिळ खनिजां’साठी महत्त्वपूर्ण करारावर स्वाक्षरी

Space Warfare: 6,000 किमी प्रतितास वेग अन् लेझर वेपन्स! रशियाचे ‘हे’ अदृश्य विमान अन् जागतिक डिफेन्स प्रोजेक्टचे सत्य काय?
4

Space Warfare: 6,000 किमी प्रतितास वेग अन् लेझर वेपन्स! रशियाचे ‘हे’ अदृश्य विमान अन् जागतिक डिफेन्स प्रोजेक्टचे सत्य काय?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.