Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Iran Israel War : इराण फोडणार का इस्रायलसाठी ढाल बनलेल्या अमेरिकी सैन्याचा वेढा? मीडल ईस्टमध्ये कुठे कुठे आहेत तळ?

इस्रायलने इराणच्या अणुप्रकल्पांवर हल्ला केल्यामुळे मीडल ईस्ट म्हणजेच अरब देशांमध्ये सध्या भीषण युद्धसदृश्य स्थिती निर्माण झाली आहे. गाझानंतर आता इस्रायलने इराणकडे मोर्चा वळवला आहे.

  • By संदीप गावडे
Updated On: Jun 14, 2025 | 08:04 PM
इराण फोडणार का इस्रायलसाठी ढाल बनलेल्या अमेरिकी सैन्याचा वेढा? मीडल ईस्टमध्ये कुठे कुठे आहेत तळ?

इराण फोडणार का इस्रायलसाठी ढाल बनलेल्या अमेरिकी सैन्याचा वेढा? मीडल ईस्टमध्ये कुठे कुठे आहेत तळ?

Follow Us
Close
Follow Us:

इस्रायलने इराणच्या अणुप्रकल्पांवर हल्ला केल्यामुळे मीडल ईस्ट म्हणजेच अरब देशांमध्ये सध्या भीषण युद्धसदृश्य स्थिती निर्माण झाली आहे. गाझानंतर आता इस्रायलने इराणकडे मोर्चा वळवला आहे. युद्ध भडकलं तर संपूर्ण अरब देश यात होरपळून निघण्याची भीती सामरिक तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे. दरम्यान अरब देशांमध्ये असलेले आणि इस्रायलसाठी ढाल बनलेले अमेरिकी सैनिक आणि नाविक तळ इराणची डोकेदुखी वाढवण्याचीही शक्यता वर्तवली जात आहे.

Israel-Iran War : इस्रायलची दोन लढाऊ विमाने इराणने केली उद्धवस्त; खळबळजनक दाव्याने अमेरिकेला धक्का

अमेरिकन सैन्य तळ आणि सैन्याची उपस्थिती

अमेरिकेने मध्यपूर्वेत अनेक दशकांपासून आपली सैनिकी उपस्थिती टिकवून ठेवली आहे. सध्या अंदाजे ४०,००० ते ५०,००० अमेरिकन सैनिक या प्रदेशातील किमान १९ ठिकाणी तैनात आहेत.अमेरिकेने बुधवारी जाहीर केले की, त्यांनी इराकमधील आपत्कालीन परिस्थितीमुळे तेथील दुतावासाचा काही भाग रिकामा करण्याचा निर्णय घेतला आहे. बहारिन, कुवेत आणि संयुक्त अरब अमिरातीसारख्या ठिकाणी असलेल्या अमेरिकी कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना “स्वेच्छेने स्थलांतर करण्याची” परवानगी देण्यात आली आहे.

“हा प्रदेश धोकादायक ठरू शकतो” म्हणून हा निर्णय घेतला आहे, असं अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी बुधवारी संध्यकाळी म्हटलं आहे. सध्या अमेरिका आणि इराण यांच्यातील अणुकराराविषयीच्या चर्चेत कोणतीही प्रगती न झाल्यामुळे तणाव वाढत आहे. त्यातच इस्रायलने इराणवर पुन्हा हल्ला करण्याची धमकी दिली आहे, त्यामुळे परिस्थिती आणखी चिघळली आहे.

अमेरिका कोणत्या देशांमध्ये आहेत सैन्य तळ?

अमेरिका मध्यपूर्वेत अनेक दशकांपासून सैन्य तळ चालवत आहे. Council on Foreign Relations च्या माहितीनुसार, अमेरिका या भागात किमान १९ ठिकाणी तात्पुरते आणि कायमस्वरूपी सैनिकी तळ चालवत आहे. त्यापैकी आठ तळ हे कायमस्वरूपी असून ते बहरैन, इजिप्त, इराक, जॉर्डन, कुवेत, कतार, सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब अमिराती या देशांमध्ये आहेत.

मध्यपूर्वेत किती अमेरिकन सैनिक आहेत?

अमेरिकेने मध्यपूर्वेत पहिल्यांदा १९५८ मध्ये सैन्य पाठवलं. लेबनॉन संकटाच्या वेळी बेरूतमध्ये सैनिकांची तैनाती केली. त्या वेळी सुमारे १५,००० मरीन आणि सैनिक पाठवण्यात आले होते. २०२५ च्या मध्यपर्यंत, अंदाजे ४०,००० ते ५०,००० अमेरिकी सैनिक मध्यपूर्वेत आहेत. हे सैनिक मोठ्या कायमस्वरूपी तळांवर आणि लहान तात्पुरत्या तळांवर तैनात आहेत.

सर्वाधिक अमेरिकी सैनिक कतार, बहरैन, कुवेत, संयुक्त अरब अमिराती आणि सौदी अरेबिया या देशांमध्ये आहेत. हे तळ हवाई आणि नौदल ऑपरेशन्ससाठी, प्रादेशिक लॉजिस्टिक्स, गुप्तचर संकलन आणि लष्करी उपस्थितीसाठी महत्त्वाचे मानले जातात.

‘इराण बनलाय मृत्यूचा सापळा…’ इस्रायली हल्ल्यानंतर नतान्झ अणु केंद्रातून किरणोत्सर्गाची गळती, IAEएचा गंभीर इशारा

काही प्रमुख सैन्य तळांची माहिती

अल उदैद हवाई तळ (कतार) – मध्यपूर्वेतील अमेरिकेचा सर्वात मोठा तळ, १९९६ मध्ये स्थापन. सुमारे २४ हेक्टर (६० एकर) क्षेत्रफळ असलेल्या या तळावर जवळपास १०,००० सैनिक आहेत आणि सुमारे १०० विमानांसह ड्रोन तैनात आहेत. हे ठिकाण US Central Command (CENTCOM) चे मुख्यालयही आहे आणि इराक, सीरिया व अफगाणिस्तानमधील मोहिमांसाठी केंद्रबिंदू राहिले आहे.

नेव्हल सपोर्ट अ‍ॅक्टिव्हिटी (NSA), बहारिन – पूर्वीच्या ब्रिटिश नौदल तळाच्या जागेवर उभा राहिलेला अमेरिकन नौदल तळ. सुमारे ९,००० सैनिकी आणि नागरी कर्मचारी येथे कार्यरत आहेत. हे US Navy च्या Fifth Fleet चे मुख्यालय असून, परिसरातील नौदल, हवाई दल आणि इतर लष्करी तळांना सुरक्षा व मनुष्यबळ पुरवतं.

अल-धाफ्रा हवाई तळ (संयुक्त अरब अमिराती) – गुप्तचर, हेरगिरी व हवाई लढाईसाठी महत्त्वाचा तळ. येथे F-22 Raptor सारखी आधुनिक लढाऊ विमाने, ड्रोन आणि AWACS सारखी हेरगिरी करणारी विमाने तैनात आहेत.

एरबिल हवाई तळ (इराक) – इराकच्या उत्तरेकडील भागात, विशेषतः कुर्द व इराकी दलांना मार्गदर्शन करण्यासाठी आणि सीरियामधील ऑपरेशन्ससाठी वापरले जाते.

Web Title: Iran will break siege of american military which shield for israel us troops and military bases in middle east

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 14, 2025 | 07:45 PM

Topics:  

  • Iran-Israel War
  • Israel Attack
  • Israel Iran war

संबंधित बातम्या

मध्यपूर्वेत युद्धाची चाहूल! अमेरिका-इस्रायलकडून मिळाले इराणवर हल्ल्याचे संकेत; तेहरानमध्येही लष्करी हालचाली
1

मध्यपूर्वेत युद्धाची चाहूल! अमेरिका-इस्रायलकडून मिळाले इराणवर हल्ल्याचे संकेत; तेहरानमध्येही लष्करी हालचाली

‘पुन्हा हल्ला केल्यास विनाश…’ ; इराणच्या धर्मगुरुंची अमेरिका आणि इस्रायलला चेतावणी
2

‘पुन्हा हल्ला केल्यास विनाश…’ ; इराणच्या धर्मगुरुंची अमेरिका आणि इस्रायलला चेतावणी

इस्रायलच्या हल्ल्यानंतर चवताळले इराण सरकार; हेरगिरीच्या आरोपाखाली तब्बल २१ हजार नागरिकांना तुरुंगवास
3

इस्रायलच्या हल्ल्यानंतर चवताळले इराण सरकार; हेरगिरीच्या आरोपाखाली तब्बल २१ हजार नागरिकांना तुरुंगवास

इराणचे अणु स्वप्न भंगणार? युद्धबंदीच्या एक दिवस आधी इस्रायलने वरिष्ठ अणुशास्त्रज्ञाची केला होती हत्या
4

इराणचे अणु स्वप्न भंगणार? युद्धबंदीच्या एक दिवस आधी इस्रायलने वरिष्ठ अणुशास्त्रज्ञाची केला होती हत्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.