Israel-Iran War : इस्रायलची दोन लढाऊ विमाने इराणने केली उद्धवस्त; खळबळजनक दाव्याने अमेरिकेला धक्का (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
Iran-Israel War News Marathi: सध्या इस्रायल आणि इराणमधील तणाव वाढत चालला आहे. १३ जून च्या मध्यरात्र्या इस्रायलने इराणवर हल्ला केला. त्यानंतर याच्या प्रत्युत्तरात इराणने देखील इस्रायलच्या शहरांवर बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांचा मारा केला. यामुळे इस्रायल आणि इराणमध्ये युद्ध आणखी भडकण्याची शक्यता आले. याच वेळी इराणने आणखी एक खळबळजनक दावा केला आहे. इराणने इस्रायली हवाई दलाचे दोन लढाऊ विमाने पाडल्याचा दावा केला आहे.
तेहरानच्या टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार, इराणने इस्रायलचे F-35 विमान नष्ट केल्याचा दावा केला आहे. इस्रायलचे हे लढाऊ विमान अमेरिकेकडून खरेद केलेले होते. या लढाऊ विमानांना पाडण्यात आले आहे, तसेच या विमानाला उडवणाऱ्या पायलटलाही ताब्यात घेण्यात आल्याचा दावा केला जात आहे. यामुळे मोठी खळबळ उडाली आहे.
हे लढाऊ विमान इराणच्या हद्दीत प्रवेश करत होते. त्यावेळी इराणच्या सैनिकांनी हे लढाऊ विमान हाणून पाडले. यावेळ वैमामिक पॅरेशूटच्या मदतीने खाली उतरला, परंतु तो खाली उतरताच इराणच्या सैनिकांनी त्याला ताब्याक घेतले. परंतु अद्याप अशी कोणतीही माहिती मिळाली नसल्याचे इस्रायलच्या डिफेन्स फोर्सने म्हटले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, इराणवर हल्ला करण्यासाठी इस्रायलच्या सैनिकांनी RAAM-(F-151),SOUFA(F-161),ADIR(F-35I)ही विमाने वापरत आहेत. इस्रायलने ही विमाने अमेरिकेकडून खरदी केलेली आहेत. या विमानाच्या एक युनिटची किंमत अंदाजे ७ अब्ज रुपये आहे. इराणने जर ही विमाने हाणून पाडली असतील तर इस्रायलचे १५ अब्ज रुपयांचे नुकसान होईल. F-35 विमान हे अमेरिकेच्या पाचव्या पिढीतील लढाऊ विमान आहे. हे एक स्टील्थ फायटर जेट आहे. या विमानाची किंमत ९० दहशलक्ष डॉलर्स आहे. या विमानाला पॅंथर म्हणूनही ओळखले जाते.
दरम्यान इस्रायलने शुक्रवारी इराणवर केलेल्या हल्ल्यांना प्रत्युत्तर म्हणून इराणने देखील तेल अवीवच्या शहरांवर २०० क्षेपणास्त्रे डागली. इस्रालयने केलेल्या हल्ल्यात इराणच्या अणु तळांना लक्ष करण्यात आले होते. इराणसाठी हा एक मोठा धक्का होता. यामुळे इराणने तेल अवीव च्या शहरावर २०० बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांचा मारा केला. यामध्ये ७ जण गंभीर जखमी झाले.
याच कारवाईने इराणने अमेरिकेलाही गंभीर इशार दिला आहे. अमेरिका हा इस्रायलचा मित्र देश आहे. यामुळे अमेरिकेने नेहमीच इस्रायलला समर्थन दरशवले आहे. दरम्यान इस्रायलच्या कारवाईने इराणने संताप व्यक्त केला आहे. तसेच यावेळी इस्रायलला कोणतीही सूट दिली जाणार नाही असे इराणने म्हटले आहे. शिवाय इस्रायलला पाठिंबा देणाऱ्या देशांविरोधातही कडक कारवाईचा इशारा इराणने दिला आहे.
Israel Iran war : इराण-इस्त्रायल युद्धाचा भडका; जागतिक एअर ट्राफिक परिणाम, भारताची विमानसेवा कोलमडली