Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 27 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Iran-US War : युद्ध आता लवकरच थांबणार? पाकिस्तानात पुन्हा महत्त्वपूर्ण चर्चा; इराणचे परराष्ट्रमंत्री अब्बास अराघची इस्लामाबादेत

पश्चिम आशियातील संघर्ष संपवण्याच्या उद्देशाने अमेरिकेसोबत होणाऱ्या शांतता चर्चेच्या दुसऱ्या फेरीसाठी इराणचे परराष्ट्रमंत्री अब्बास अराघची शुक्रवारी रात्री उशिरा इस्लामाबादमध्ये दाखल झाले.

  • By कृपादान आवळे
Updated On: Apr 25, 2026 | 07:17 AM
Iran-US War : इराणचे परराष्ट्रमंत्री अब्बास अराघची पाकिस्तानात; अमेरिकेच्या प्रतिनिधींसोबत होणार महत्त्वपूर्ण चर्चा

Iran-US War : इराणचे परराष्ट्रमंत्री अब्बास अराघची पाकिस्तानात; अमेरिकेच्या प्रतिनिधींसोबत होणार महत्त्वपूर्ण चर्चा

Follow Us
Follow Us:

वॉशिंग्टन : अमेरिका आणि इस्त्रायल या दोन्ही देशांकडून इराणवर दबाव टाकण्यासाठी हल्ले केले जात आहेत. याला इराणकडूनही जोरदार प्रत्युत्तर दिले जात आहे. मात्र, या युद्धाला काही दिवसांचा युद्धविराम मिळाला आहे. तर दुसरीकडे, शांतता चर्चेच्या दुसऱ्या फेरीच्या पार्श्वभूमीवर, इराणचे परराष्ट्रमंत्री अब्बास अराघची पाकिस्तानच्या इस्लामाबादेत दाखल झाले आहेत. अराघची हे अमेरिकेच्या प्रतिनिधींसोबत महत्त्वपूर्ण चर्चा करणार आहेत.

पश्चिम आशियातील संघर्ष संपवण्याच्या उद्देशाने अमेरिकेसोबत होणाऱ्या शांतता चर्चेच्या दुसऱ्या फेरीसाठी इराणचे परराष्ट्रमंत्री अब्बास अराघची शुक्रवारी रात्री उशिरा इस्लामाबादमध्ये दाखल झाले. या भेटीमुळे तणाव कमी होऊन या प्रदेशात शांतता प्रस्थापित होण्याची आशा पुन्हा निर्माण झाली आहे. परराष्ट्र मंत्री अराघची यांच्यासोबत परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते इस्माईल बघाई यांच्यासह एक छोटे शिष्टमंडळ आहे. एका पाकिस्तानी अधिकाऱ्याच्या माहितीनुसार, अराघची पंतप्रधान शाहबाज शरीफ आणि फील्ड मार्शल जनरल आसिम मुनीर यांची भेट घेणार आहेत. ते अमेरिकी अधिकाऱ्यांचीही भेट घेण्याची शक्यता आहे.

Iran-US War : “लहान असो वा मोठी, कोणतीही बोट दिसल्यास थेट…”; डोनाल्ड ट्रम्प यांचे होर्मुज सामुद्रधुनीबाबत खळबळजनक आदेश

दरम्यान, अमेरिकेचे विशेष दूत स्टीव्ह विटकॉफ आणि राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे जावई जेरेड कुशनर, इराणी शिष्टमंडळासोबत थेट चर्चेसाठी शनिवारी पाकिस्तानला भेट देणार आहेत. व्हाईट हाऊसच्या प्रेस सेक्रेटरी कॅरोलिन लेविट यांनी याला दुजोरा दिला आहे.

इराणसोबतचे युद्ध संपवण्यासाठी घाई करणार नाही : डोनाल्ड ट्रम्प

गेल्या काही दिवसांपासून आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक घडामोडी घडत आहेत. अमेरिका आणि इस्त्रायल या दोन्ही देशांकडून इराणवर सातत्याने हल्ले केले जात आहेत. हे युद्ध थांबावं, अशीच सर्वांची इच्छा आहे. असे असताना अमेरिकेतील व्हाईट हाऊसमध्ये राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी माध्यमांशी संवाद साधला होता. यावेळी त्यांनी इराणसोबतचे युद्ध संपवण्यासाठी घाई करणार नसल्याचे म्हटले.

हिंद महासागरात आणखी एक इराणी टँकर जप्त केल्याचा दावा

दरम्यान, अमेरिकेच्या लष्कराने हिंद महासागरात तेल तस्करीशी संबंधित आणखी एक इराणी टँकर जप्त केल्याचे म्हटले आहे, ज्यामुळे तणाव आणखी वाढला आहे. यापूर्वी, इराणने होर्मुझच्या सामुद्रधुनीत तीन मालवाहू जहाजांवर हल्ला केला होता.

Web Title: Iranian foreign minister abbas araqchi in pakistan significant talks to be held with us representatives

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 25, 2026 | 07:09 AM

Topics:  

  • Abbas Araqchi
  • Donald Trump
  • international news
  • Iran-US War

संबंधित बातम्या

Strait of Hormuz: ‘तेहरानला घाई…’ होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणवर घणाघाती हल्ला; 3 मुख्य अटी फेटाळल्या
1

Strait of Hormuz: ‘तेहरानला घाई…’ होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणवर घणाघाती हल्ला; 3 मुख्य अटी फेटाळल्या

Iran News : मोजतबा खामेनी पूर्णपणे निरोगी’; पेझेश्कियन यांचा मोठा दावा
2

Iran News : मोजतबा खामेनी पूर्णपणे निरोगी’; पेझेश्कियन यांचा मोठा दावा

Maharashtra Today’s Live breaking News in Marathi: लालबागच्या राजाला भावपूर्ण निरोप, तर २३ जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा
3

Maharashtra Today’s Live breaking News in Marathi: लालबागच्या राजाला भावपूर्ण निरोप, तर २३ जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा

US-China Trade War: ‘प्रतिस्पर्धी नाही, भागीदार बना’; शी जिनपिंग यांच्या अमेरिका दौऱ्यामुळे व्यापार करार दोन महिने पुढे
4

US-China Trade War: ‘प्रतिस्पर्धी नाही, भागीदार बना’; शी जिनपिंग यांच्या अमेरिका दौऱ्यामुळे व्यापार करार दोन महिने पुढे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.