Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

इराणच्या राजकारणात मोठा बदल; मोजतबा यांची उत्तराधिकारी म्हणून खामेनेईंनी केली निवड?

इराणच्या राजकारणात मोठा बदल होणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, इराणचे अली खामेनेई यांनी त्यांच्या मुलाची मोजतबाची निवड उत्तराधिकारी म्हणून केल्याचा दावा करण्यात आला आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Nov 18, 2024 | 05:02 PM
इराणच्या राजकारणात मोठा बदल; मोजतबा यांची उत्तराधिकारी म्हणून खामेनेईंनी केली निवड?
Follow Us
Close
Follow Us:

तेहरान: इराणच्या राजकारणात मोठा बदल होणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, इराणचे अली खामेनेई यांनी त्यांच्या मुलाची मोजतबाची निवड उत्तराधिकारी म्हणून केली असल्याचा दावा करण्यात आला आहे. 26 नोव्हेंबर रोजी हा निर्णय घेण्यात आला होता. हा निर्णय स्वत: खामेनेई यांनी गुप्त बैठक घेऊन घेतला असल्याचे म्हटले जात आहे. अली खामेनेई यांची प्रकृती खालविल्याने हा निर्णय झाला असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र इराणने अद्याप याबाबत कोणतीही पुष्टी केलेली नाही.

अली खामेनेई यांनी स्वत: बैठक घेतली 

अली खामेनेई यांनी खुद्द एक बैठक घेतली होती. या बैठकीत हा निर्णय घेताना त्यांच्यावर दबाव आला होता. खामेनेई आणि त्यांच्या प्रतिनिधींनी बैठकीतील सदस्यांच्या एकमताने निर्णय घ्यायला हवा अशी धमक्याही त्यांना मिळाल्या होत्या. मिळेलेल्या माहितीनुसार, मोजतबा खामेनेई यांनी गेल्या काही वर्षांमध्ये आपला प्रभाव वाढवण्यासाठी प्रयत्न केले आहेत. मात्र ते फक्त महत्त्वाच्या बैठकींमध्ये दिसतात असे इराणच्या काही प्रमुखे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- युक्रेनला रशियाविरुद्ध लांब पल्ल्याचे क्षेपणास्त्र वापरण्याची बायडेन यांची परवानगी; काय असेल पुतिन यांचे पुढचे पाऊल?

जनतेचा विरोध टाळण्यासाठी निर्णय गुप्त ठेवण्यात आला 

मीडिया रिपोर्टनुसार, 2009 मध्ये निवडणुकीनंतर इराणमध्ये आंदोलनाला आळा घालण्यााठी मोजतबा यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्यांंना 2021 मध्ये अयातुल्ला ही पदवी देण्यात आली. असे म्हटले जाते की, ही पदवी इराणच्या सर्वोच्च नेता होण्यासाठी राज्यघटनेत अट आहे. यामुळे जनतेचा विरध टाळण्यासाठी हा निर्णय गुप्त ठेवला असल्याचे सांगितले जात आहे.

इराणच्या विधानसभेचे मत

मिळालेल्या माहितीनुसार, इराणच्या विधानसभेने हा निर्णय गुप्त ठेवला असून यामागचे कारण स्पष्ट करताना त्यांनी म्हटले आहे की, त्यांना व्यापक आणि सार्वजनिक निदर्शनाची भीती होती. यामुळे इराणच्या सरकारला जनतेकडून विरोध होण्याची शक्यता असेल. याचे गंभीर परिणाम सरकारला भोगावे लागतील. असेही इराणच्या विधानसभेने इशारा दिला आहे.

सोशल मीडियावर चर्चा 

अली कामेनेईंच्या मते त्यांनी जजर त्यांच्या मुलांकडे सत्ता सोपवली तर ते हयात असेपर्यंत सुरळीत हस्तांतरण होईल. यामुळे कोणत्याही प्रकारचा विरोध टाळता येईल. याशिवाय या प्रकरणाशी संबंधित अनेक पोस्ट सध्या सोशल मीडियावर देखील चर्चेत आहेत. या पोस्टमध्ये अली खामेनेईंची प्रकृती खराब असल्याचा दावा करण्यात आला आहे. इंग्रजी वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार, अली खामेनेईंची प्रकृती सध्या गंभीर आहे. याबाबत अनेक अहवाल देखील समोर आले असल्याचे म्हटले जात आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- अमेरिकेला सुमारे 50 अब्ज डॉलर्सचा दंड भरावा लागणार? इराणी न्यायालयाने दिला मोठा निर्णय

Web Title: Iranian politics khamenei chose mojtaba as his successor nrss

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 18, 2024 | 05:00 PM

Topics:  

  • iran
  • world

संबंधित बातम्या

मध्यपूर्वेत युद्धाची चाहूल! अमेरिका-इस्रायलकडून मिळाले इराणवर हल्ल्याचे संकेत; तेहरानमध्येही लष्करी हालचाली
1

मध्यपूर्वेत युद्धाची चाहूल! अमेरिका-इस्रायलकडून मिळाले इराणवर हल्ल्याचे संकेत; तेहरानमध्येही लष्करी हालचाली

‘पुन्हा हल्ला केल्यास विनाश…’ ; इराणच्या धर्मगुरुंची अमेरिका आणि इस्रायलला चेतावणी
2

‘पुन्हा हल्ला केल्यास विनाश…’ ; इराणच्या धर्मगुरुंची अमेरिका आणि इस्रायलला चेतावणी

इस्रायलच्या हल्ल्यानंतर चवताळले इराण सरकार; हेरगिरीच्या आरोपाखाली तब्बल २१ हजार नागरिकांना तुरुंगवास
3

इस्रायलच्या हल्ल्यानंतर चवताळले इराण सरकार; हेरगिरीच्या आरोपाखाली तब्बल २१ हजार नागरिकांना तुरुंगवास

इराण इराकच्या ‘त्या’ डीलने अमेरिका धोक्यात? डोनाल्ड ट्रम्प यांची वाढली चिंता
4

इराण इराकच्या ‘त्या’ डीलने अमेरिका धोक्यात? डोनाल्ड ट्रम्प यांची वाढली चिंता

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.