Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

इराणचा जास्तीत जास्त अणुबॉम्ब बनवण्याच्या दिशेने पाऊल? धक्कादायक अहवाल आला समोर

इराण अणुबॉम्ब बनवण्याच्या दिशेने पाऊल टाकत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, इराणने अणवस्त्रे तयारी करण्यासाठी लागणाऱ्या युरेनियमचा साठा वाढवला असल्याची माहिती समोर आली आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Nov 20, 2024 | 03:37 PM
इराणचा अणुबॉम्ब बनवण्याच्या दिशेने पाऊल? धक्कादायक अहवाल आला समोर

इराणचा अणुबॉम्ब बनवण्याच्या दिशेने पाऊल? धक्कादायक अहवाल आला समोर

Follow Us
Close
Follow Us:

तेहरान: इराणबाबत एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. इराण अणुबॉम्ब बनवण्याच्या दिशेने पाऊल टाकत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, इराणने अणवस्त्रे तयारी करण्यासाठी लागणाऱ्या युरेनियमचा साठा वाढवला असल्याची माहिती समोर आली आहे. संयुक्त राष्ट्राने याबाबत अणु देखरेख संस्थेच्या अहवालातून याची माहिती दिली आहे. या आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी (IAEA) अहवालानुसार, इराणने 60 टक्के शुद्धतेचे 182.3 किलोग्रॅम समृद्ध युरेनियमचे साठे तयार केले आहेत.

यामुळे जागतिक स्तरावर चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सीच्या (IAEA) अहवालानुसार, 26 ऑक्टोबर 2024 पर्यंत इराणकडे 60% शुद्धतेचे 182.3 किलोग्रॅम समृद्ध युरेनियम साठा होते. या साठ्यांची पातळी शस्त्रास्त्र-श्रेणीच्या 90% शुद्धते एवढी आहे. याशिवाय, इराणचा एकूण युरेनियम साठा 6604 किलोग्रॅमपर्यंत पोहोचला आहे, यामध्ये  852.6 किलोची वाढ होण्याची शक्यता असल्याचे अहवालात म्हटले आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- युक्रेनचे चोख प्रत्युत्तर; अमेरिका निर्मित क्षेपणास्त्रांनी रशियावर जोरदार हल्ला, आता काय करणार पुतिन?

इराण विरोधात ठराव

इराण-इस्त्रायलमधील तमाव शिगेला पोहोचला असताना हा अहवाल प्रसिद्ध करण्यात आला. मिळालेल्या माहितीनुसार, राफेल IAEA प्रमुख राफेल मारियानो ग्रोसी यांनी इराणला भेट दिली होती. यावेळी राफेल यांनी इराणला युरेनियमचा साठा 60 टक्क्यांनी वाढवू नये असे आवाहन केल होते. या अहवालाच्या पार्श्वभूमीवर इराणविरोधात फ्रान्स, जर्मनी आणि ब्रिटनने कडक ठराव मांडण्याची तयारी केली आहे.

या ठरावावर चर्चा व्हिएन्नामध्ये होणाऱ्या IAEA बोर्ड ऑफ गव्हर्नर्सच्या नियमित बैठकीत होणार असल्याची माहिती मिळाली आहे. याशिवाय, इराणने या ठरावाला विरोध दर्शवला आहे. इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांनी तिन्ही युरोपीय देशांशी चर्चा करत अशा पावलांनी परिस्थिती अधिक गुंतागुंतीची होईल, असा इशारा दिला आहे.

फोटो सौजन्य: सोशल मीडिया

मात्र इराणने दावा केला आहे की, त्यांचा आण्विक शस्त्रे बनवण्याचा विचार केवळ शांततापूर्ण उद्दिष्टांसाठी आहे. परंतु IAEA प्रमुख राफेल ग्रोसी यांच्या मते, सध्याच्या युरेनियमच्या साठ्याच्या आधारे इराणकडे अनेक अणुबॉम्ब तयार करण्याची क्षमता आहे. यामुळे इराणवर आंतरराष्ट्रीय दबाव वाढला आहे. विशेषतः 2023 मध्ये इराणने IAEA च्या काही अनुभवी निरीक्षकांवर निर्बंध लादले होते, मात्र आता त्यांना पुन्हा नियुक्त करण्याचा विचार सुरू आहे.

इराण अणुकरार

2015 मध्ये अमेरिकेसह पाच शक्तींनी इराणसोबत अणुकरार केला होता. या करारानुसार, इराणला केवळ 3.67% शुद्धतेपर्यंत युरेनियम समृद्ध करण्याची परवानगी होती आणि साठा 300 किलोपेक्षा जास्त ठेवता येणार नव्हता. मात्र, 2018 मध्ये तत्कालीन अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एकतर्फी निर्णय घेत करार तोडला. यानंतर इराणने अणुकार्यक्रम गतिमान केला.

इराणने आंतरराष्ट्रीय मागण्यांकडे दुर्लक्ष करून अण्वस्त्र तयार करण्याच्या दिशेने वेगाने वाटचाल सुरू ठेवली आहे. जर तणाव वाढला, तर पश्चिम आशिया अस्थिर होऊ शकतो. IAEA च्या अहवालानंतर जगभरातील मोठ्या राष्ट्रांनी यावर त्वरित पावले उचलण्याची गरज आहे, अन्यथा इराणच्या वाढत्या अण्वस्त्र क्षमतेमुळे जागतिक शांतता धोक्यात येऊ शकते.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- मध्यपूर्व आणि पश्चिम भागांतील युद्ध संपवण्यावर G-20 शिखर परिषदेत भर; अब्जाधीशांवर जागतिक कर लादण्याची मागणी

Web Title: Irans move towards nuclear bomb revealed in intellingence report nrss

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 20, 2024 | 03:37 PM

Topics:  

  • iran
  • Israel
  • nuclear bomb

संबंधित बातम्या

Israel जगाचा नाश करणार! ‘या’ देशाचा खेळ खल्लास; अमेरिकेतून नेत्यानाहूंनी दिला भयंकर इशारा
1

Israel जगाचा नाश करणार! ‘या’ देशाचा खेळ खल्लास; अमेरिकेतून नेत्यानाहूंनी दिला भयंकर इशारा

Chabahar Port : अमेरिकेची गहिरी चाल! थेट भारत-इराणमधील करारावरच घातला घाला; आता मोदी सरकार घेणार का माघार?
2

Chabahar Port : अमेरिकेची गहिरी चाल! थेट भारत-इराणमधील करारावरच घातला घाला; आता मोदी सरकार घेणार का माघार?

Israel Maritime : इस्रायलने पाकिस्तानकडे जाणाऱ्या तेल टँकरवर केला हल्ला; 24 क्रू मेंबर्सना ठेवले ओलीस
3

Israel Maritime : इस्रायलने पाकिस्तानकडे जाणाऱ्या तेल टँकरवर केला हल्ला; 24 क्रू मेंबर्सना ठेवले ओलीस

Cheap International Travel: भारतातून फक्त 10,000 रुपयांत करता येईल ‘या’ सुंदर देशाची सहल; वाचा कसे?
4

Cheap International Travel: भारतातून फक्त 10,000 रुपयांत करता येईल ‘या’ सुंदर देशाची सहल; वाचा कसे?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.