फोटो सौजन्य: सोशल मीडिया
मास्को: रशिया गेल्या तीन दिवसांपासून युक्रेनच्या मुख्य शहरांवर सतत हल्ले करत आहे. या हल्ल्यात लहान मुलासह अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. दरम्यान आता युक्रेननेही रशियाला हल्ल्यांचे प्रत्युत्तर दिले आहे. युक्रेनने रशियाच्या ब्रायन्स प्रदेशात अमेरिका निर्मित एटीएसीची सहा क्षेपणास्त्रे डागली असल्याची माहिती रशियन संरक्षण मंत्रालयाने दिली. रशियन संरक्षण मंत्रालयाने याबाबत एक निवेदन जारी केले आहे की, त्यांनी पाच क्षेपणास्त्रे पाडली आहेत. याशिवाय, पाडलेल्या क्षेपणास्त्रांचे तुकडे लष्करी भागांत पडले आहे. मात्र यामध्ये कोणतीही वित्त आणि जिवितहानी झालेली नाही. असे रशियन संरक्षण मंत्रालयाने म्हटले आहे.
हल्ले अजुनही सुरूच
जो बायडेन यांच्या युक्रेनला लांब पल्ल्याची क्षेपणास्त्रे वापरण्याची परवानगी देण्यावर बंदी उठवण्यात आली होती. याच दरम्यान हे हल्ले करण्यात आले. मात्र, युक्रेनने हल्ल्यात एटीएसीएम क्षेपणास्त्रांचा वापर केल्याची पुष्टी अद्याप केलेली नाही. युक्रेनच्या लष्करी प्रमुखांनी दिलेल्या माहितीनुसार, रशियाच्या ब्रायन्स्क प्रदेशातील कराचेव्ह भागातील 1046 व्या लॉजिस्टिक सपोर्ट सेंटरच्या शस्त्रागारावर हल्ला करण्यात आला आहे. या हल्ल्यामुळे परिसरात जोरदार स्फोटांचे आवाज ऐकू आले आहेत. तसेच लष्करप्रमुखांनी म्हटले आहे की, “या रशियन सैन्याच्या शस्त्रास्त्रांच्या डेपोवर हल्ल्यामुळे रशियाची युक्रेनवरील आक्रमकता संपुष्टात येईल.”
फोटो सौजन्य: सोशल मीडिया
रशियाने युक्रेनच्या निवासी भागांवर हल्ले केले
दरम्यान रशिया गेल्या तीन दिवसांपासून युक्रेनच्या निवासी स्थांनांवर हल्ले करत आहेत. या हल्ल्यात एका लहान मुलासह 12 जणांचा मृत्यू झाला आहे. युक्रेनच्या बचाव पथकाने दिलेल्या माहितीनुसार, सुमी शहरावर झालेल्या ड्रोन हल्ल्यांत दोन मुलांसह 11 जण जखमी झाले आहेत. अनेक लोक ढिगाऱ्यांकखाली अडकले असल्याची भिती बचाव पथकाने व्यक्त केली आहे.
रशिया आण्विक हल्ला करणार का?
याशिवाय जो बायडेन यांच्या युक्रेनला लांब पल्ल्याच्या क्षेपणास्त्रांचीपरवानगी दिल्यानंतर पुतिन यांनी रशियाच्या आण्विक धोरणांत मोठे बदल केले. यानुसार, आता “रशिया किंवा त्याच्या मित्र राष्ट्रांच्या प्रदेशाला लक्ष्य करणाऱ्या बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांच्या प्रक्षेपणाच्या प्रत्युत्तरात रशिया आपली अण्वस्त्रे वापरू शकतो.” यामुळे आता पुतिन अण्वस्त्रांचा वापर करणार असल्याचे म्हटले जात आहे. यामुळे रशिया-युक्रेन युद्ध अधिक तीव्र होण्याची निवड केली आहे. तसेच बायडेन यांच्या निर्णयामुळे रशिया-युक्रेन युद्ध भडकल्याचे म्हटले जात आहे.
G-20 परिषदेत युक्रेन-रशिया युद्ध संपवण्याची मागणी
रिओ दि जानेरो येथे 18 ते 19 नोव्हेंबर दरम्यान G-20 शिखर परिषद पार पडली. या परिषदेत भारतासह इतर संयुक्त राष्ट्रांचे प्रमुख अधिकारी आणि पंतप्रधान उपस्थिती होते. या परिषदेदरम्यान मध्यपूर्व आणि पश्चिम भागांतील युद्ध संपवण्याची मागणी करण्यात आली आहे.