Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 31 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Politics Maharashtra |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Israel-Hamas War: इस्त्रायलचा उत्तरी गाझामध्ये कहर; बॉम्ब हल्ल्यात 13 जणांचा मृत्यू, अनेक जखमी

इस्त्रायल हमास युद्ध अद्याप सुरू आहे. इस्त्रायल गाझामध्ये हमासाच्या ठिकाणांना सतत लक्ष्य करत असून इस्त्रायलने पुन्हा एकदा उत्तरी गाझावर बॉम्ब वर्षाव केला आहे. या हल्लयात 13 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Dec 11, 2024 | 06:09 PM
Israel-Hamas War: इस्त्रायलचा उत्तरी गाझामध्ये कहर; बॉम्ब हल्ल्यात 13 जणांचा मृत्यू, अनेक जखमी

Israel-Hamas War: इस्त्रायलचा उत्तरी गाझामध्ये कहर; बॉम्ब हल्ल्यात 13 जणांचा मृत्यू, अनेक जखमी

Follow Us
Follow Us:

काहिरा: इस्त्रायल हमास युद्ध अद्याप सुरू आहे. इस्त्रायल गाझामध्ये हमासाच्या ठिकाणांना सतत लक्ष्य करत असून इस्त्रायलने पुन्हा एकदा उत्तरी गाझावर बॉम्ब वर्षाव केला आहे. उत्तरी गाझामध्ये एका घराला लक्ष्य करण्यात आले असून यामध्ये 13 जणांचा जीव गेला असल्याची माहिती पॅलेस्टिनी अधिकाऱ्यांनी दिली. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या ठिकाणी विस्थापित लोकांनी आश्रय घेतला होता. तसेच बीट लाहिया शहरात देखील रात्रभर हल्ले करण्यात आले आहेत.

गेल्या वर्षाभरापासून युद्ध सुरू

मात्र, इस्त्रायलने अद्याप या हल्ल्यांबात कोणतीही प्रतिक्रीया दिलेली नाही. इस्त्रायल उत्तरी गाझावर ऑक्टोंबरच्या सुरूवातीपासून सातत्याने हल्ले करत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नुकत्याच झालेल्या हल्ल्यामध्ये आठ जण एकाच कुटूंबातील होते. तसेच मृतांमध्ये लहान मुलांचा देखील समावेश आहे.

गेल्या वर्षी 7 ऑक्टोबर रोजी हमासच्या दहशतवाद्यांनी इस्त्रायलवर हल्ला केला होता. त्यानंतर या युद्धाला सुरूवात झाली. आत्तापर्यंत इस्त्रालवर हमासने केलेल्या हल्ल्यात सुमारे 1,200 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. तसेच गाझामध्ये 250 लोकांचे अपहरण करण्यात आले असून गाझात 100हून अधिक लोकांना ओलिस ठेवण्यात आले आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- बांगलादेशात ढाका ते त्रिपुरा लॉंग मार्च; भारताची चिंता वाढली, सीमेवर अतिरिक्त सुरक्षादल तैनात

फोटो सौजन्य: सोशल मीडिया

गाझा पट्टीत एकही क्षेत्र सुरक्षित नाही 

काही दिवसांपूर्वी इस्त्रायली सैन्य गाझा पट्टीत रणगाड्यांसह शिरले होते. खान युनिस भागातील हल्ल्यामुळे 47 लोकांचा मृत्यू झाला होता. तसेच इस्त्रायली सैन्याने लोकांना बाहेर पडण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर काही तासांतच सैन्य रणगाडे घेऊन खान युन्स भागांत शिरले. याशिवाया अतिरेक्यांनीही या भागांमध्ये रॉरेट्सही डागले होते. यामुळे अनेक कुटूंबे घरे सोडून गेली होती. लोकांना अन्न, पाणी आणि राहण्याच्या सोयी देखील मिळणे कठीण झाले आहे. संयुक्त राष्ट्रांच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, गाझामध्ये एकही क्षेत्र सुरक्षित राहिलेले नाही.

पॅलेस्टिनींना भारताची साथ

संयुक्त राष्ट्र महासभेत भारताने इस्रायलविरोधी प्रस्तावाच्या बाजूने मतदान केल्याची माहिती मिळाली आहे. या प्रस्तावात इस्रायलने 1967 पासून कब्जा केलेल्या पूर्व जेरुशलमसह पॅलेस्टिनी प्रदेशातून माघार घ्यावी आणि पश्चिम आशियात व्यापक, न्याय व शाश्वत शांतता स्थापन करण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी केली होती. 193 सदस्यीय महासभेत सेनेगलने मांडलेला “पॅलेस्टिनी प्रश्नाचे शांततामय समाधान” असा हा प्रस्ताव बहुमताने मंजूर करण्यात आला.

या प्रस्तावाला भारतासह एकूण 157 देशांनी मंजूरी दिली. दरम्यान, इस्रायल, अमेरिका, अर्जेंटिना, हंगेरी, माइक्रोनेशिया, नाउरू, पलाऊ आणि पापुआ न्यू गिनी या देशांनी प्रस्तावाला विरोध केला आहे. तर  कॅमेरून, झेकिया, इक्वाडोर, जॉर्जिया, पॅराग्वे, युक्रेन आणि उरुग्वे या देशांनी मतदान टाळले.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- ‘Joy Bangla’ आता बांगलादेशाची राष्ट्रीय घोषणा नाही; सर्वाेच्च न्यायालयाचा आदेश

Web Title: Israel bomb attack on northen gaza killing 13 people nrss

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 11, 2024 | 06:09 PM

Topics:  

  • Hamas
  • Israel
  • World news

संबंधित बातम्या

US Iran war : इराणला युरेनियमचा साठा हटवावा लागणार? अमेरिका-इराण करारात कतार अन् चीनची मोठी भूमिका
1

US Iran war : इराणला युरेनियमचा साठा हटवावा लागणार? अमेरिका-इराण करारात कतार अन् चीनची मोठी भूमिका

VIDEO VIRAL : ज्यू धर्मगुरूने हिंदू धर्माची उडवली खिल्ली; गोमूत्राबाबतच्या ‘त्या’ वक्तव्याने पेटला आंतरराष्ट्रीय वाद
2

VIDEO VIRAL : ज्यू धर्मगुरूने हिंदू धर्माची उडवली खिल्ली; गोमूत्राबाबतच्या ‘त्या’ वक्तव्याने पेटला आंतरराष्ट्रीय वाद

VIRAL VIDEO : पाकिस्तानी महिला न्यायाधीशांची कविता भारतात व्हायरल; ‘तुझ्या आशेपेक्षा जास्त…’ म्हणत तरुण वकिलांचे जिंकले मन
3

VIRAL VIDEO : पाकिस्तानी महिला न्यायाधीशांची कविता भारतात व्हायरल; ‘तुझ्या आशेपेक्षा जास्त…’ म्हणत तरुण वकिलांचे जिंकले मन

Strait Of Hormuz: चुंबकीय बॉम्ब म्हणजे काय? होर्मुझच्या सामुद्रधुनीमध्ये 27 भारतीय खलाशांना घेऊन जाणाऱ्या तेलवाहू जहाजावर हल्ला
4

Strait Of Hormuz: चुंबकीय बॉम्ब म्हणजे काय? होर्मुझच्या सामुद्रधुनीमध्ये 27 भारतीय खलाशांना घेऊन जाणाऱ्या तेलवाहू जहाजावर हल्ला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.