Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 31 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Politics Maharashtra |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

VIDEO VIRAL : ज्यू धर्मगुरूने हिंदू धर्माची उडवली खिल्ली; गोमूत्राबाबतच्या ‘त्या’ वक्तव्याने पेटला आंतरराष्ट्रीय वाद

VIDEO VIRAL : अमेरिकन-इस्त्रायली रब्बी योसेफ मिझराही यांनी हिंदू धर्म आणि गायांविषयीच्या त्याच्या श्रद्धांबद्दल वादग्रस्त वक्तव्ये केली, ज्यामुळे भारतीय राजदूतांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Oct 31, 2026 | 11:55 AM
Yosef Mizrachi Cow Urine Controversy Jewish Rabbi Hindu Religion Video

Yosef Mizrachi Cow Urine Controversy Jewish Rabbi Hindu Religion Video

Follow Us
Follow Us:
  • वादग्रस्त विधान
  • जागतिक स्तरावर तीव्र निषेध
  • सोशल मीडियावर संतापाची लाट

सोशल मीडियाच्या माध्यमातून धार्मिक भावना दुखावणारे आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर तणाव निर्माण करणारे एक नवे प्रकरण समोर आले आहे. अमेरिकन-इस्त्रायली ज्यू धर्मगुरू (रब्बी) योसेफ मिझराही यांनी हिंदू धर्म आणि भारतीय परंपरांबद्दल अत्यंत अपमानजनक आणि वादग्रस्त विधाने केली आहेत. एका व्हायरल व्हिडिओमध्ये (VIDEO VIRAL) मिझराही यांनी पवित्र मानल्या जाणाऱ्या गोमातेबद्दल आणि हिंदू धार्मिक प्रथांबद्दल हीनस दर्जाची वक्तव्ये करत त्यांची खिल्ली उडवली आहे. या व्हिडिओमुळे केवळ भारतातच नव्हे, तर इस्रायलसह जगभरातील विविध देशांमधील नागरिकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे. विशेष म्हणजे स्वतः ज्यू समुदायाच्या अनेक सुजाण सदस्यांनीही या विधानाचा धिक्कार केला असून, धर्मगुरूचे हे कृत्य असभ्य आणि आक्षेपार्ह असल्याचे स्पष्ट केले आहे.

 योसेफ मिझराही यांनी नक्की काय म्हटले? जाणून घ्या वादाचे मूळ

इंटरनेटवर वेगाने व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये योसेफ मिझराही हे हिंदू धर्म आणि भारतीय जीवनशैलीबद्दल काही भाष्य करताना दिसतात. त्यांनी आपल्या वक्तव्यात असा दावा केला आहे की, भारतातील अनेक कुटुंबे आपल्या राहत्या घरातील दिवाणखान्यात (Living Room) गायींना बांधून ठेवतात आणि गाय लघवी करते तेव्हा तिथली फरशी चाटतात. एवढ्यावरच न थांबता, त्यांनी भारतीय डॉक्टर आणि वैद्यकीय व्यवस्थेचीही उघडपणे टवाळी केली. न्यू दिल्लीतील रुग्णालयांमध्ये जाणाऱ्या रुग्णांवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी आदल्या रात्री गोमूत्र प्यायले असण्याची शक्यता असते, असे अत्यंत अपमानास्पद विधान त्यांनी केले.

मिझराही यांनी आपल्या भाषणात “देवाचे आभार की माझी निर्मिती भारतीयांसारखी झाली नाही” असे सांगत वांशिक द्वेष पसरवण्याचा प्रयत्न केला. याशिवाय, त्यांनी भारतातील एका व्यक्तीचा उल्लेख केला जो त्यांच्या फेसबुक पेजवर काम करत होता आणि ज्यू धर्मात धर्मांतर करू इच्छित होता. कोणत्याही धर्माचा मूलभूत गाभा असलेल्या सहिष्णुता आणि आदराला हरताळ फासणारे हे वक्तव्य असल्याने संपूर्ण जगभरातून त्यांच्यावर टीकेची झोड उठली आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Strait Of Hormuz: चुंबकीय बॉम्ब म्हणजे काय? होर्मुझच्या सामुद्रधुनीमध्ये 27 भारतीय खलाशांना घेऊन जाणाऱ्या तेलवाहू जहाजावर हल्ला

 इस्रायली लेखक आणि आंतरराष्ट्रीय समुदायाकडून मिझराही यांच्यावर कडक शब्दांत टीका

मिझराही यांच्या या वक्तव्याचा सर्वात पहिला आणि तीव्र विरोध इस्रायलमधूनच झाला आहे. प्रसिद्ध इस्रायली लेखक आणि संशोधक येशाया रोझेनमन यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत मिझराही यांना उघडे पाडले आहे. रोझेनमन यांनी काही काळ भारतात राहून अभ्यास केला असल्याने त्यांना भारतीय संस्कृतीचा जवळून परिचय आहे. त्यांनी स्पष्ट केले की मिझराही यांच्या अशा बेजबाबदार वक्तव्यांमुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर इस्रायल या देशाच्या प्रतिमेला मोठा धक्का पोहोचत आहे. रोझेनमन यांच्या मते, मिझराही यांचा वादग्रस्त वक्तव्ये करण्याचा जुना इतिहास आहे. त्यांनी यापूर्वी ख्रिश्चन, मुस्लिम आणि अगदी ऑटिझम (मंदबुद्धी) असलेल्या मुलांबद्दलही अत्यंत असंवेदनशील टिप्पणी केली होती.

An Israeli-American rabbi has drawn widespread criticism after a video of him mocking Hindu religious traditions and cow worship circulated on social media. Rabbi Yosef (Yossi) Mizrachi made derogatory remarks about Hindus, claiming that some Indians consume cow urine and alleging that even doctors follow such practices. He also mocked the presence of cows on roads in New Delhi, joking that commuters were unable to move the animals. In the video, Mizrachi recounted an anecdote about an Indian man who allegedly wanted to convert to Judaism. He made several remarks about the man’s family revering cows before ridiculing Hindu practices. He concluded by saying that he was thankful to God for not making him like Indians. The comments triggered angry reactions from India and Israel, with several people accusing him of racism and insulting Hindu religious beliefs. — The Siasat Daily (@TheSiasatDaily) October 30, 2026

credit – social media and Twitter

त्याच वेळी, भारतातील पॅलेस्टिनी राजदूत अब्दुल्ला एम. अबू शावेश यांनीही या घटनेचा तीव्र निषेध नोंदवला. कोणाचेही थेट नाव न घेता त्यांनी स्पष्ट केले की, दुसऱ्याच्या धार्मिक परंपरांची थट्टा उडवणे आणि त्यांचा अनादर करणे हे थेट मानवी मूल्यांवर हल्ला करण्यासारखे आहे. अशा प्रकारचा वांशिक द्वेष (Racism) हा संपूर्ण मानवजातीसाठी अत्यंत धोकादायक असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : VIRAL VIDEO : पाकिस्तानी महिला न्यायाधीशांची कविता भारतात व्हायरल; ‘तुझ्या आशेपेक्षा जास्त…’ म्हणत तरुण वकिलांचे जिंकले मन

 सोशल मीडियावर संतापाची लाट आणि भारत-इस्रायल संबंधांचा ऐतिहासिक संदर्भ

हा व्हिडिओ समोर आल्यानंतर X (पूर्वीचे ट्विटर) आणि इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर युझर्सचा राग उफाळून आला आहे. भारतीय तसेच अनेक इस्रायली नागरिकांनी मिझराही यांच्यावर सडकून टीका केली आहे. बहुतांश लोकांनी असे मत व्यक्त केले की, धर्मगुरू असणे म्हणजे दुसऱ्या धर्माचा अपमान करण्याचा परवाना नव्हे. काही युझर्सनी तर मिझराही यांच्या इस्रायलमधील प्रवेशावर कायमची बंदी घालावी, अशी मागणी सरकारकडे केली आहे. X वर रोमन बिष्ट नावाच्या एका युझरने लिहिले की, “हत्ती आपल्या मार्गाने चालत राहतो, तर कुत्रे भुंकत राहतात; मिझराही यांनी स्वतःची लाज वाटून घेतली पाहिजे.“

भारतातील ज्यू समुदायाला दोन हजार वर्षांहून अधिक काळचा सुरक्षित आणि समृद्ध इतिहास लाभलेला आहे. भारतात सुमारे ५ हजारहून अधिक ज्यू नागरिक अत्यंत गुण्यागोविंदाने आणि आदराने राहत आहेत. भारत हा जगातील अशा मोजक्या देशांपैकी एक आहे जिथे ज्यू समुदायाला कधीही वांशिक किंवा धार्मिक छळाला सामोरे जावे लागले नाही. त्यामुळे एका माथेफिरू धर्मगुरूच्या या वक्तव्यामुळे भारत आणि इस्रायलच्या ऐतिहासिक व कौटुंबिक संबंधांवर कोणताही परिणाम होणार नसला, तरी सोशल मीडियावर या घटनेवरून एक नवीन आंतरराष्ट्रीय वाद पेटला आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: योसेफ मिझराही कोण आहेत आणि त्यांनी काय वादग्रस्त विधान केले?

    Ans: योसेफ मिझराही हे एक अमेरिकन-इस्त्रायली ज्यू धर्मगुरू (रब्बी) आहेत, ज्यांनी एका व्हायरल व्हिडिओमध्ये भारतातील हिंदू गोमूत्र चाटतात आणि पितात असे म्हणत धार्मिक श्रद्धांची खल्ली उडवली.

  • Que: या वक्तव्यानंतर इस्रायली अभ्यासकांनी काय प्रतिक्रिया दिली?

    Ans: इस्रायली लेखक येशाया रोझेनमन यांनी मिझराही यांच्या विधानाचा तीव्र निषेध करत, यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर इस्रायलच्या प्रतिमेला धक्का पोहोचत असल्याचे स्पष्ट केले.

  • Que: भारतातील ज्यू समुदायाचा इतिहास काय आहे?

    Ans: भारतात ज्यू समुदायाचा इतिहास २ हजार वर्षांहून अधिक जुना आहे. सध्या भारतात ५ हजारांहून अधिक ज्यू नागरिक पूर्ण धार्मिक स्वातंत्र्यासह आणि आदराने राहतात.

Web Title: Jewish rabbi yosef mizrachi controversial video on hindu traditions hp

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 31, 2026 | 11:55 AM

Topics:  

  • America
  • Video Viral
  • World news

संबंधित बातम्या

VIRAL VIDEO : पाकिस्तानी महिला न्यायाधीशांची कविता भारतात व्हायरल; ‘तुझ्या आशेपेक्षा जास्त…’ म्हणत तरुण वकिलांचे जिंकले मन
1

VIRAL VIDEO : पाकिस्तानी महिला न्यायाधीशांची कविता भारतात व्हायरल; ‘तुझ्या आशेपेक्षा जास्त…’ म्हणत तरुण वकिलांचे जिंकले मन

Strait Of Hormuz: चुंबकीय बॉम्ब म्हणजे काय? होर्मुझच्या सामुद्रधुनीमध्ये 27 भारतीय खलाशांना घेऊन जाणाऱ्या तेलवाहू जहाजावर हल्ला
2

Strait Of Hormuz: चुंबकीय बॉम्ब म्हणजे काय? होर्मुझच्या सामुद्रधुनीमध्ये 27 भारतीय खलाशांना घेऊन जाणाऱ्या तेलवाहू जहाजावर हल्ला

Ethiopia News : हिंसाचारामुळे ५० हजार नागरिकांनी सोडला देश
3

Ethiopia News : हिंसाचारामुळे ५० हजार नागरिकांनी सोडला देश

Ajay Devgn Old Video : मुलगा युगला गर्दीतून वाचवताना अजय देवगण संतापला; अजमेर शरीफचा जुना VIDEO पुन्हा व्हायरल
4

Ajay Devgn Old Video : मुलगा युगला गर्दीतून वाचवताना अजय देवगण संतापला; अजमेर शरीफचा जुना VIDEO पुन्हा व्हायरल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.