Israel-Gaza conflict :इस्रायलचा नकार ;अमेरिकेच्या पाठिंब्याच्या गाझा योजनेला सहमती नाही
Israel-Gaza conflict : अमेरिकेचा पाठिंबा असलेल्या गाझा शांती आणि हमास निःशस्त्रीकरण योजनेबाबत अद्याप इस्रायलने मंजुरी दिली नाही असे इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांनी सांगितले आहे . जो पर्यंत हमास पूर्णपणे शस्त्र खाली टाकत नाही .आणि आम्हाला याची हमी मिळत नाही . तोपर्यंत इसराईली सैनिक गाझा मधून मागे हटणार नाहीत .
Israel-Gaza conflict : इस्रायल गाझा वाद हा आजचा वाद नसून तो दशकांपासून चालत आला आहे . हा जेवढा धार्मिक वाटणारा वाद आहे तेवढाच हा जमिनीचा ,राजकीय आणि एकमेकांपासून सुरक्षा मिळावी यासाठी सुद्धा वाद आहे . तुलनेने इस्रायल पेक्षा कमी क्षेत्रफळ असलेल्या गाझा जवळ स्वतःचे असे मजबूत सैन्य नाही कि नौदल आणि वायुसेना नाही . २००७ ला हमास ने गाझावर नियंत्रण मिळवले आणि इस्रायल हमास संघर्ष अधिक वाढला . हा संघर्ष खूप गुंतागुंतीचा असून जगातील बरेचसे देश इस्रायलने गाझा पट्टीवर केलेल्या हल्ल्याचा निषेध व्यक्त करताना दिसून आले आहेत . आणि अमेरिका मात्र इस्राईलच्या बाजूने भक्कम उभी राहिली आहे .
ऑक्टोबर 2023 मध्ये हमासने इस्रायलवर मोठा हल्ला केला.
त्यानंतर इस्रायलने गाझामध्ये व्यापक लष्करी कारवाई सुरू केली.
तेव्हापासून युद्ध, ओलीस सुटका, युद्धविराम आणि मानवीय मदत यावर सतत चर्चा सुरू आहे.
आता वाद कशावर आहे?
सध्याचा मुख्य प्रश्न असा आहे:
अमेरिका आणि इतर देश युद्धविराम आणि गाझासाठी नवीन प्रशासनाची योजना पुढे आणत आहेत.
इस्रायलचे पंतप्रधान Benjamin Netanyahu यांचे म्हणणे आहे की हमासचे निःशस्त्रीकरण आणि सुरक्षा हमी मिळाल्याशिवाय इस्रायल अशा कोणत्याही योजनेला सहमती देणार नाही.
दुसरीकडे अनेक देश तातडीच्या युद्धविरामाची आणि मानवीय मदतीची मागणी करत आहेत.
Web Title: Israel gaza conflict israel refuses does not agree to the us backed gaza plan