Israel-Hamas war continues 23 Palestinians killed in Gaza attack
जेरुसेलम: एकीकडे भारत आणि पाकिस्तान, दुसरीकडे रशिया-युक्रेन आणि तिसरीकडे इस्रायल हमास अशा तीन आघाडींवर जगात युद्ध सुरु आहेत. ही युद्ध थांबवण्याचे कोणतेही चिन्ह दिसत नाही. भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धबंदी करार लागू करण्यात आला आहे. परंतु पाकिस्तानने शस्त्रसंधीचे उलंल्घन केले असून तणाव पुन्हा वाढण्याची शक्यता आहे. याच दरम्यान इस्रायलचे गाझामध्ये हल्ले सुरुच आहेत. दरम्यान इस्रायलने शनिवारी (10 मे) गाझावर हवाई हल्ले केले आहेत.
इस्रायलच्या या हवाई हल्ल्यात 23 पॅलेस्टिनी नागरिकांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये लहान मुलांचाही समावेश आहे. या हल्ल्याच्या एक दिवस आधी शुक्रवारी (09 मे) रात्री उशिरापर्यंत गाझातील जबालिया येथे हल्ला केला होता. या हल्ल्यात संयुक्त राष्ट्रांच्या एजन्सीच्या इमारतीला लक्ष्य करण्यात आले होते. या इमारतीमध्ये गाझातील लोकांना पुरवल्या जाणाऱ्या अन्नधान्याचा साठी होता. सध्या इस्रायल गाझाला मदत पोहोचवण्यावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करत आहे. यामुळे इस्रायलने नाकेबंदी केली आहे. अनेक मदत केंद्रे बंद करण्यात येत आहे. यामुळे गाझातील परिस्थिती अत्यंत बिकट झाली आहे.
इस्रायलच्या म्हणण्यानुसार, या सर्व कारवाया हमासवर दबाव आणण्यासाठी केल्या जात आहे. यामुळे हमास ओलिसांनी सोडण्यास आणि शस्त्र सोडण्यास भाग पडतील. परंतु जागतिक स्तरावर इस्रायलच्या या कारवायांना गुन्हा म्हणून संबोधले जात आहे. मानवाधिकार संघटनांनी इस्रायलच्या या हल्ल्यांचे उपासमारीचे शस्त्र आणि युद्ध गुन्हा म्हणून केले आहे. तसेच संयुक्त राष्ट्र संघ, तसेच अनेक मानवाधिकार मदत संघटनांनी इस्रायलच्या गाझाच्या मदतीवर नियंत्रण ठेवण्याच्या योजनेचा निषेध केला आहे.
गाझा आरोग्य मंत्रालयाच्या रिपोर्टनुसार, इस्रायल आणि हमस युद्धात आतापर्यंत 50 हजाराहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये बहुतेक महिला आणि लहान मुलांचा समावेश आहे. तसेच 1 लाखाहून अधिक लोक जखमी झाले आहेत. याच वेळी इस्रायलने हजारो दहशतवाद्यांना मारल्याचा दावा केला आहे. परंतु अद्याप कोणताही पुराव देण्यात आलेला नाही.
इस्रायल आणि हमासमध्ये युद्धबंदी कररा लागू करण्यात आला होता. या कररांतर्गत दोन्ही देशांनी युद्धबंदीच्या काळात कैदेत असेलेल्या लोकांना सोडण्याचे आणि गाझातून आपले सैन्य माघारी घेण्याचे मान्य केले होते. याचा पहिला टप्पा देखील पूर्ण झाला होता. परंतु दुसऱ्या टप्प्यातील अटी मान्य करण्यास हमासने नकार दिला. यामुळे संतप्त होऊन इस्रायलने 18 मार्च 2025 रोजी पुन्हा गाझावर हल्ले करुन हमाससोबतच्या युद्धबंदीचे उल्लंघन केले. इस्रायलने भू-मार्गाने कारवाई करत गाझातील अनेक भाग ताब्यात घेतले आहे. इस्रायलच्या या कारवायांमुळे गाझातील उत्तर आणि दक्षिणेकडीलस भाग उद्ध्वस्त झाले आहेत.