how big is rist to rebuild gaza from 55 million tons of rubble
Israel Hamas War : २७ ऑक्टोबर २०२३ हमासने इस्रायलवर हल्ला केला आणि २०० हून अधिक इस्रायलींना कैदी बनवले. यानंतर इस्रायलने हमासवर हल्ला केला आणि तीव्र संघर्षाची सुरुवात झाली. गेल्या दोन वर्षांपासून सुरु असलेल्या या संघर्षाने गाझा पट्टी पूर्णत: उद्ध्वस्त झाली होती. इस्रायल सतत गाझावर हल्ले करत होता. यामुळे गाझातील ८० टक्क्याहून अधिक इमारतींचे ढिगाऱ्यात रुपांतर झाला होते. शिवाय ६८ हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला होता. हजारो लोक आजही बेपत्ता आहेत. यामुळे प्रश्न पडतो की एवढ्या ढिगाऱ्यात रुपांतर झालेल्या इमारती, त्याखाली अडकलेले मृतदेह, नष्ट झालेल्या पायाभूत सुविधा पुन्हा कशा सुरळीत होणार.
सध्या गाझामध्ये युद्धबंदी लागू आहे. ९ ऑक्टोबर रोजी अध्यक्ष ट्रम्प यांच्या गाझात युद्धबंदीच्या योजनेला हमास आणि इस्रायलकडून मान्यता मिळाली. यानंतर सैन्य माघारी घेण्याची प्रक्रिया सुरु झाली. तसेच हळूहळू गाझात पुन्हा एकादा इमारती बांधण्याचे, नवीन सरकार स्थापन करण्याचे कामकाजही सुरु होणार आहे. यासाठी ट्रम्प स्वत: एक समिती देखील स्थापन करणार आहेत.
मूलभूत सुविधा नष्ट
गाझाची लोकसंख्या सुमारे २२ लाख आहे. यामध्ये महिला आणि लहान मुलांचा मोठ्या प्रमाणावर समावेश आहे. पण गेल्या दोन वर्षातील संघर्षामुळे गाझामध्ये शाळा, अन्न, पाणी, निवारा यांसारख्या मूलभूत सुविधा देखील जवळपास नष्ट झाल्या आहेत. ट्रम्प आणि अरब देशांच्या मदतीने युद्धविराम झाला आहे. पण गाझातील लोकांसाठी आजही अन्न-पाण्यासाठी संघर्ष सुरु आहे. अशात जीवन पुन्हा उभारणे एक मोठे आव्हान ठरत आहे.
अस्वच्छता आणि प्रदूषण
संयुक्त राष्ट्राच्या अहवालानुसार, गाझात २५ हजार टनांपेक्षा अधिक स्फोटके डागण्यात आली होती. ही स्फोटके दोन अणुबॉम्बच्या ताकदी एवढी आहेत. तसेच गाझातील पाणीपुरवठा आणि स्वच्छता व्यवस्था देखील उद्ध्वस्त झाली आहे. गाझात जागोजागी सांडपाण्याची ठिकाणे फुटली आहे, शेती नष्ट झाली आहे, विषारी प्रदूषणाचा अभाव वाढला असून दैनंदिन जीवन अगदी दयनीय झाले आहे. लोक घरांची दुरुस्ती करत आहे, मात्र आवश्यक साधने आणि संसाधने नसल्यामुळे अनेक अडथळे येत आहे.
५५ दशलक्ष टन इमारतींचा मलबा
गाझाचे पुनर्वसन करताना सर्वात मोठे आव्हान म्हणजे ५५ दशलक्ष टन इमारतींचा मलबा आहे. हा मलबा जवळपास १३ गिझाच्या पिरॅमिड्सच्या बरोबर आहे. याचे व्यवस्थापन एक मोठे आव्हान ठरेल. हा मलबा हटवण्यासाठी किमान पाच वर्षे लागीतल, असे संयुक्त राष्ट्र विकास विभागाने म्हटले आहे. कारण यामध्ये अनेक स्फोटक पदार्थ आहे ज्यांना सुरक्षितपणे हटवणे गरजेचे आहे.
तसेच १० हजाराहून अधिक लोक आणि मृतदेह ढिगाऱ्यांखाली अडकले आहेत. त्यांना बाहेर काढणे देखील मोठे आव्हान ठरमार आहे. ही सर्व परिस्थिती पाहता गाझामध्ये पुन्हा नवे जीवन उभं करण अत्यंत कठीण राहणार आहे. शिवाय अद्यापही हमास आणि इस्रायलमधील तणाव निवळलेला नाही. यामुळे पुन्हा युद्ध सुरु होण्याची देखील भीती निर्माण झाली आहे.