Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Holi
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

World War 3: इराणचा सूर्य मावळणार? अमेरिकन शक्तीसह इस्रायलचा इराणवर क्षेपणास्त्र महाप्रहार; खामेनींचा राजवाडा, तेहरानही मातीमोल

Iran Israel War : इस्रायलने इराणच्या सर्वोच्च नेत्याच्या अधिकृत निवासस्थानावर आणि कार्यालयावर हल्ला केला आहे. इराणच्या सर्वोच्च नेत्याचे अधिकृत निवासस्थान आणि कार्यालय तेहरानमधील जमहूरी स्ट्रीटवर आहे.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Feb 28, 2026 | 01:25 PM
israel missile attack iran supreme leader ali khamenei residence tehran war updates

israel missile attack iran supreme leader ali khamenei residence tehran war updates

Follow Us
Close
Follow Us:
  • सर्वोच्च लक्ष्यावर प्रहार
  • खामेनी थोडक्यात बचावले
  • पूर्ण युद्धाची ठिणगी

Israel missile attack on Khamenei residence Tehran : मध्यपूर्वेतील तणाव आता एका अशा वळणावर आला आहे जिथून मागे परतणे अशक्य वाटते. आज शनिवारी इस्रायलने इराणविरुद्ध थेट आणि ‘पूर्ण युद्ध’ (Full Scale War) सुरू केल्याची घोषणा केली. इस्रायली हवाई दलाने अमेरिकेच्या सक्रिय पाठिंब्याने इराणची राजधानी तेहरानवर क्षेपणास्त्रांचा पाऊस पाडला आहे. या हल्ल्याचे सर्वात मोठे आणि धक्कादायक वैशिष्ट्य म्हणजे इस्रायलने थेट इराणचे सर्वोच्च नेते अली खामेनी (Ali Khamenei) यांच्या अधिकृत निवासस्थानाला आणि कार्यालयाला लक्ष्य केले. जमहूरी स्ट्रीटवरील हे निवासस्थान या हल्ल्यात पूर्णपणे उद्ध्वस्त झाले असून, खामेनी यांच्या जीवावर बेतण्याची ही पहिलीच वेळ आहे.

खामेनी थोडक्यात बचावले; बंकरमध्ये घेतले आश्रय

‘ISNA’ या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, इस्रायली हल्ल्याचा धोका ओळखून अली खामेनी यांनी काही वेळ आधीच आपले निवासस्थान सोडले होते. सध्या त्यांना एका गुप्त आणि अत्यंत सुरक्षित अशा दुर्गम बंकरमध्ये हलवण्यात आले आहे. ज्या निवासस्थानावर हल्ला झाला, त्याचे नियंत्रण सध्या त्यांचा धाकटा मुलगा मोजतबा (Mojtaba) याच्याकडे आहे. मोजतबा हेच सध्या सर्वोच्च नेत्याच्या वतीने सर्व महत्त्वाचे निर्णय घेत आहेत. या हल्ल्यापूर्वी इराणमधील विरोधी गट ‘पीपल्स मुजाहिदीन’च्या लढाऊंनीही या ठिकाणी हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता, जो सुरक्षा दलांनी मोडून काढला होता. मात्र, इस्रायली क्षेपणास्त्रांनी हे सुरक्षित मानले जाणारे ठिकाण चकाचक करून टाकले.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Israel Attacks Iran: युद्ध पेटले! इस्रायलचा इराणवर विध्वंसक युद्धजन्य हल्ला; तेहरानमध्ये स्फोटांची मालिका अन् आकाशात धुराचे लोट

अमेरिका आणि इस्रायलची संयुक्त रणनीती

इस्रायली माध्यम ‘येदियोथ अहरोनोथ’च्या अहवालानुसार, हा केवळ लष्करी तळांवरील हल्ला नव्हता. तेल अवीव आणि वॉशिंग्टनने मिळून इराणची महत्त्वाची मंत्रालये आणि वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्यांना लक्ष्य करण्याची योजना आखली होती. इस्लामिक रिपब्लिकच्या सर्व सुरक्षा प्रतिष्ठानांना मुळासकट नष्ट करणे, हा या मोहिमेचा मुख्य उद्देश आहे. अमेरिकेने या हल्ल्यात इंटेलिजन्स आणि लॉजिस्टिक सपोर्ट देऊन इस्रायलची ताकद दुपटीने वाढवली आहे, ज्यामुळे तेहरानमधील अभेद्य मानली जाणारी सुरक्षा यंत्रणा पत्त्यासारखी कोसळली.

#Breaking #War #News🚨 As indicated here in past days,#Israel🇮🇱 & #USA 🇺🇸 preemptively strike #Iran#Khamenei‘s residence in #Tehran has been destroyed by missiles. Strike priority is destroying #command & #control of #IRGC terrorists pic.twitter.com/Ph2huR3QwI — Dan Thom,B.S.,J.D.⚖️⚖️⚖️ 🖤💙🖤 (@WB6DYN) February 28, 2026

credit – social media and Twitter

इराणचा ‘विनाशकारी’ प्रत्युत्तराचा इशारा

आपल्या सर्वोच्च नेत्याच्या निवासस्थानावर झालेल्या या हल्ल्यामुळे इराणमध्ये प्रचंड संतापाची लाट उसळली आहे. रॉयटर्सशी बोलताना एका वरिष्ठ इराणी अधिकाऱ्याने सांगितले की, “इस्रायलने सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत. आता शब्दांची वेळ संपली असून कृतीची वेळ आली आहे. आम्ही या हल्ल्याला अत्यंत विनाशकारी प्रत्युत्तर देऊ आणि हे प्रत्युत्तर तात्काळ असेल.” इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड्सनी (IRGC) आधीच क्षेपणास्त्र युनिट्सना हाय अलर्टवर ठेवले असून, इस्रायलच्या तेल अवीव आणि हायफा सारख्या शहरांवर प्रतिहल्ला होण्याची दाट शक्यता आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Pak-Afg War: ‘हल्ले ताबडतोब थांबवा, नाहीतर…’ पाक-अफगाणिस्तान युद्धात UNची एन्ट्री; अँटोनियो गुटेरेस यांचा हादरवणारा इशारा

तेहरानमध्ये दहशतीचे वातावरण

हल्ल्यानंतर तेहरानमधील जोमहौरी स्ट्रीट आणि आसपासच्या परिसरात धुराचे लोट आणि आगीच्या ज्वाळा दिसत आहेत. नागरिकांमध्ये घबराट पसरली असून अनेकजण शहराबाहेर पडण्याचा प्रयत्न करत आहेत. संयुक्त राष्ट्रांनी दोन्ही देशांना संयम राखण्याचे आवाहन केले असले तरी, ज्या प्रकारे थेट सर्वोच्च नेत्याला लक्ष्य करण्यात आले आहे, ते पाहता मध्यपूर्वेतील हे युद्ध आता जागतिक महायुद्धाचे रूप घेऊ शकते, अशी भीती तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: अली खामेनी यांच्या निवासस्थानावर हल्ला झाला तेव्हा ते कोठे होते?

    Ans: हल्ल्याच्या काही वेळ आधीच सुरक्षेच्या कारणास्तव खामेनी यांनी निवासस्थान सोडले होते. ते सध्या एका गुप्त आणि सुरक्षित बंकरमध्ये आहेत.

  • Que: या हल्ल्यात इस्रायलला कोणी मदत केली?

    Ans: हा हल्ला अमेरिकेच्या सक्रिय पाठिंब्याने आणि गुप्तचर माहितीच्या आधारे करण्यात आला असल्याचे अहवालात म्हटले आहे.

  • Que: इराणची या हल्ल्यावर काय प्रतिक्रिया आहे?

    Ans: इराणने या हल्ल्याचा तीव्र निषेध केला असून, इस्रायलला तात्काळ आणि विनाशकारी प्रत्युत्तर देण्याची अधिकृत घोषणा केली आहे.

Web Title: Israel missile attack iran supreme leader ali khamenei residence tehran war updates

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 28, 2026 | 01:25 PM

Topics:  

  • Iran Vs America
  • Iran-Israel War
  • World War 3

संबंधित बातम्या

Israel Attacks Iran: युद्ध पेटले! इस्रायलचा इराणवर विध्वंसक युद्धजन्य हल्ला; तेहरानमध्ये स्फोटांची मालिका अन् आकाशात धुराचे लोट
1

Israel Attacks Iran: युद्ध पेटले! इस्रायलचा इराणवर विध्वंसक युद्धजन्य हल्ला; तेहरानमध्ये स्फोटांची मालिका अन् आकाशात धुराचे लोट

Pak-Afghan War: तालिबानचा पाकिस्तानवर ‘ड्रोन’ स्ट्राइक! अबोटाबाद, नौशेरा लष्करी तळ धडाधडले; रणांगणाचे LIVE VIDEO VIRAL
2

Pak-Afghan War: तालिबानचा पाकिस्तानवर ‘ड्रोन’ स्ट्राइक! अबोटाबाद, नौशेरा लष्करी तळ धडाधडले; रणांगणाचे LIVE VIDEO VIRAL

Afganistan vs Pakistan War: लष्कर आणि शस्त्रांस्त्रांच्या बाबतीत कुणाची ताकद सर्वात जास्त?
3

Afganistan vs Pakistan War: लष्कर आणि शस्त्रांस्त्रांच्या बाबतीत कुणाची ताकद सर्वात जास्त?

PakAfgWar: युद्धाचा भडका! अफगाणिस्तानचा पाकिस्तानवर सर्वात मोठा हवाई हल्ला; इस्लामाबाद, अबोटाबाद हादरले, लष्करी तळांवर बॉम्बवर्षाव
4

PakAfgWar: युद्धाचा भडका! अफगाणिस्तानचा पाकिस्तानवर सर्वात मोठा हवाई हल्ला; इस्लामाबाद, अबोटाबाद हादरले, लष्करी तळांवर बॉम्बवर्षाव

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.