
israel netanyahu new oil pipeline plan arabian peninsula hormuz strait alternative
Netanyahu Pipeline Plan Arabian Peninsula : मध्य-पूर्वेतील (US-Israel Iran War) धगधगत्या युद्धात आता एका अशा ‘आर्थिक’ शस्त्राची एन्ट्री झाली आहे, ज्याने इराणच्या पायाखालची जमीन सरकली आहे. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी जागतिक ऊर्जा बाजाराचा चेहरामोहरा बदलून टाकणारा एक ऐतिहासिक प्रस्ताव मांडला आहे. इराण वारंवार होर्मुझची सामुद्रधुनी (Strait of Hormuz) बंद करण्याची धमकी देऊन जगाला ओलीस धरतो, पण आता इस्रायलने याला कायमचा छेद देण्याचे ठरवले आहे.
नेतान्याहू यांनी जाहीर केलेल्या योजनेनुसार, अरबी द्वीपकल्पातून (Arabian Peninsula) थेट इस्रायलच्या बंदरांपर्यंत एक भव्य पाईपलाईन नेटवर्क उभारले जाईल. ही पाईपलाईन अरबी देशांतील तेल आणि वायू पश्चिमेकडे असलेल्या इस्रायली बंदरांपर्यंत आणि तिथून थेट भूमध्य सागरी बंदरांपर्यंत पोहोचवेल. याचा अर्थ असा की, आखाती देशांतील तेल आता जहाजांनी होर्मुझच्या धोक्याच्या मार्गातून नेण्याऐवजी सुरक्षित जमिनीवरून इस्रायलमार्फत युरोप आणि अमेरिकेपर्यंत पोहोचू शकेल.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Hormuz Strait : नेतान्याहू यांचा ‘तो’ दावा आणि इराणची कोंडी; होर्मुझ संकटाच्या काळात इस्रायलने जगाला दिली गुड न्यूज
हा प्रस्ताव अशा वेळी आला आहे जेव्हा इस्रायलने इराणची आर्थिक नाडी असलेल्या ‘साउथ पार्स’ या जगातील सर्वात मोठ्या गॅस क्षेत्रावर भीषण हल्ला केला आहे. या हल्ल्यामुळे इराणची मोठी हानी झाली असून जागतिक बाजारात कच्च्या तेलाचे दर प्रति बॅरल ११९ डॉलर्सपर्यंत भडकले आहेत. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी तेलाच्या वाढत्या किमतींमुळे इस्रायलवर दबाव टाकला असला, तरी नेतान्याहू यांनी भविष्यातील सुरक्षिततेचा विचार करून हा ‘ऊर्जा कॉरिडॉर’ जगासमोर ठेवला आहे.
होर्मुझची सामुद्रधुनी हा जगातील सर्वात संवेदनशील जलमार्ग आहे. जगाच्या एकूण तेल वाहतुकीपैकी २० टक्क्यांहून अधिक वाहतूक याच अरुंद मार्गातून होते. इराणचे यावर नियंत्रण असल्याने ते वारंवार हा मार्ग रोखण्याची भाषा करतात. नेतान्याहूंच्या नव्या पाईपलाईनमुळे इराणचा हा ‘हुकमी एक्का’ आता निकामी ठरणार आहे. ही योजना केवळ इस्रायलसाठीच नाही, तर युरोप आणि आशियाई देशांसाठीही (ज्यामध्ये भारताचा समावेश आहे) ऊर्जा सुरक्षेचे कवच ठरेल.
🚨🇮🇱🇮🇷Israeli PM Benjamin Netanyahu proposed a game-changing alternative to Iran’s Hormuz threats: new oil and gas pipelines running through Arabian countries directly to Israeli ports, bypassing the Strait entirely.pic.twitter.com/nODEVqOV7q https://t.co/43BN8xu8X1 — Corefrontline (@corefrontline) March 19, 2026
credit – social media and Twitter
नेतान्याहू यांनी असा दावा केला आहे की, २० दिवसांच्या युद्धानंतर इराणकडे आता क्षेपणास्त्रे बनवण्याची किंवा युरेनियम संवर्धनाची ताकद उरलेली नाही. जरी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्थेचे (IAEA) राफेल ग्रोसी या दाव्यावर साशंक असले, तरी नेतान्याहूंच्या आक्रमक पवित्र्यामुळे इराणमध्ये सरकारविरोधी उठाव होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. नेतान्याहू यांनी जमिनीवर कारवाई करण्याचे संकेत दिल्याने हे युद्ध दीर्घकाळ चालण्याची चिन्हे आहेत.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Global Security: UAEचा दुबईत ‘सर्जिकल स्ट्राईक’! एकही गोळी न झाडता इराणला फोडला घाम; हिजबुल्लाहचं ‘साम्राज्य’ ‘असं’ केलं उद्ध्वस्त
जर ही पाईपलाईन प्रत्यक्षात आली, तर मध्य-पूर्वेतील राजकारण पूर्णपणे बदलेल. इस्रायल हा केवळ लष्करी देश न राहता जागतिक ऊर्जेचा मुख्य केंद्रबिंदू बनेल. इराणची ‘दादागिरी’ संपवण्यासाठी आणि जगाला स्वस्त व सुरक्षित इंधन पुरवण्यासाठी ही योजना गेमचेंजर ठरू शकते.
Ans: अरबी द्वीपकल्पातून इस्रायली बंदरांपर्यंत तेल आणि गॅस पोहोचवण्यासाठी जमिनीवरून पाईपलाईन टाकणे, जेणेकरून इराणच्या होर्मुझ मार्गावरील अवलंबित्व संपेल.
Ans: होय, पुरवठा साखळी सुरक्षित झाल्यामुळे युद्धाच्या काळातही इंधनाचे दर स्थिर राहण्यास मदत होईल आणि इराणचा धोका टळेल.
Ans: ट्रम्प यांनी तेलाच्या वाढत्या किमतींमुळे इस्रायलला हल्ले थांबवण्याचे आवाहन केले आहे, मात्र नेतान्याहू यांनी पाईपलाईनच्या माध्यमातून दीर्घकालीन तोडगा काढण्याचे सुचवले आहे.